|| वैद्य विक्रांत जाधव

दुधी भोपळा लॅटिन नाव : Lagenaria Vulgaris / siceraria

chetan vadnere rujuta dharap are now married shared wedding photos
चेतन वडनेरे आणि ऋजुता धारप अडकले लग्नबंधनात; शेअर केले खास फोटोज
amruta bane and shubhankar ekbote wedding
गुलाबी साडी, पुणेरी थाट अन्…; ‘कन्यादान’ फेम अभिनेता झाला मुंबईचा जावई, अमृता-शुभंकरचं थाटात पार पडलं लग्न
Marathi Joke
हास्यतरंग : मॅच लाव!…
Rutuja Bagwe commented on Gauri Nalawades pool photo went viral
“काश मैं लडका होता” असं ऋतुजा बागवे गौरी नलावडेचा फोटो पाहून का म्हणाली?

लौकी, जंगली खाद्डू, दुधी भोपळा, रान भोपळा, कटूतुम्बी, तुम्बी, कडवी ही काही भोपळ्याची पर्यायी नावे आहेत. याची वेल असून फळामध्ये ९० टक्के आद्र्रता असते तर बियांमध्ये स्थिर तेल असते. आयुर्वेददृष्टय़ा रूक्ष, लघु आणि तीष्ण गुणांचे हे फळ आहे. हे कडू, तिखट, तुरट विपाकाचे असून कडू दुधी हे कफ पित्त शोधन करणारे आहे.

अलाबू कथितातुम्बी दीर्घादिर्याच वर्तुला।

मिष्टतुम्बिफलमं हृद्य पित्तश्लेश्मापहम गुरू

वृष्यं रुचीकर प्रोक्तंधातुपुष्टी विवर्धनम।।

हे वर्णन गोड दुधी भोपळ्याचे असून हृदयाला प्रिय, बल्य, पित्त तसेच कफनाशक, पचायला जड, वीर्यवर्धक, रुचीकारक, धातूंची पुष्टी करणारा असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.

(संदर्भ भावप्रकाश संहिता शाक वर्ग श्लोक ५७)

आता कडू भोपळ्याचे वेगळे वर्णन चरक संहितेमध्ये सांगितले आहे.

कासश्वासविषछर्दीज्वरारार्ते कफकर्शिते। प्रताम्याती नरेचैव वमानार्थ तदिष्यते।। (च.क.)

खोकला, श्वास, उलटी, विष, ताप, कफावर उपयुक्त. मळमळ करणारे असल्याने वमनासाठी (उलटी) वापरले जाते, मात्र त्याचा योग्य मात्रेशिवाय उपयोग करू नये.

तुम्बी.. स्नेहास्तीकशाया अधोभाग दोषहरा:। कृमिकफकुष्ठनीलहरा दुष्ट व्रणशोधनाश्च।। (सुश्रूत.सु.)

सुश्रूत संहितेमध्ये कडू आणि तुरट रसाचे वर्णन असून अधोभागातील दोषांचे शोधन करणारा आहे म्हणजेच रेचन करणारे आहे. यावरून सहज लक्षात येते, की कडू भोपळा हा अयोग्य प्रमाणात चुकीच्या अवस्थेत सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम घडू शकतात.

कडू दुधीचे फळ, बिया आणि पाने सर्व वामक व रेचक आहेत. म्हणजे उलटी व जुलाब करणारे आहेत. म्हणूनच याचा उपयोग शास्त्राने विशिष्ट अवस्थेमध्ये वैद्यांना करायला सांगितला आहे. कडू दुधीच्या रसाचा उपयोग काविळीमध्ये नाकात टाकून पित्त काढण्यासाठी आणि कावीळ कमी करण्यासाठी केला जातो. भोपळ्याची मोठी फळे थंड, लघवी वाढवणारी, पित्त कमी करणारी तर लहान फळ हे मात्र कडू, उलटी करणारे व जुलाब करणारे आहे (हा फरक ध्यानात घ्यावा) भोपळ्याचा गर विविध विषावर गुणकारी असून विंचवाच्या विषावरसुद्धा गुणकारी आहे. तसेच कडू फळाची राख करून मधातून घेतल्यास रातांधळेपणावर उपयोगी ठरते. भोपळ्याच्या पानांचा काढा करून काविळीवर देण्याची प्रथा आहे.

आधुनिक आरोग्यशास्त्रानुसार दुधी भोपळ्यात ‘अ’ जीवनसत्त्व शरीराच्या दिवसाच्या गरजेपेक्षा २०० पटीने अधिक आहेत तर १९ टक्के ‘सी’ जीवनसत्त्व आहे. यामध्ये ‘पोटेशियम’ अधिक असल्याने, ‘सोडियम’ प्रमाणाने अत्यंत कमी असल्याने हृदयाला फायदेशीर ठरतात. ‘पोटेशियम’मुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. या प्रकारापेक्षा कोहळा हा वेगळ्या जातीचा असून त्यापासून पेठा तयार करतात. कोहळ्याला हिंदीमध्ये ‘पेठ’ असेच म्हटले असून कच्चा पेठ हा थंड आणि पित्तशामक आहे. मध्यम पेठ हा कफकारक असून पिकलेला पेठ थंड नाही. अग्नी वाढवणारा, स्वाद आणणारा आणि मानसिक व्याधीमध्ये उपयुक्त ठरणारा आहे.

कच्च्या भाज्या खाताना कोणती खावी आणि कोणती खाऊ  नये याचे भान ठेवावे लागते. भाज्यांवर संस्कार (फोडणी, उकडणे इ.) करून त्या खाण्याचा सल्ला शास्त्राने दिला आहे. कडू भोपळा जर गोड भोपळ्याप्रमाणे प्रक्रिया करून खाल्ला तर तो त्याचे गुणधर्म दाखवतो. याचा अतिरेक झाल्यास उलटी व जुलाब होतात किंवा त्यावर केलेल्या प्रक्रियेनुसार तसेच व्यक्तीनुसार त्याची लक्षणे दिसून येतात. व्यक्तीची प्रतिकारक्षमता कमी असल्यास तीव्र लक्षणे उदयास येतात. त्यामुळे कोणतीही वनस्पती, फळ, पाने, मुळे यांचे गुणधर्म माहिती असल्याशिवाय ती न खाण्याचा सल्ला आयुर्वेदाने दिला आहे. आज समाजमाध्यमांवरून रोज शेकडो संदेश येतात आणि त्याचे प्रयोग हजारो करतही असतील. अशा प्रकारे त्यांचे सेवन वैद्यकीय सल्ल्याशिवाय करणे अत्यंत घातक आहे.

केळफूल ही अत्यंत उत्कृष्ट भाजी असली तरी ती निवडताना त्यामधील मुळाशी असलेला एक लहानसा तुकडा न काढल्यास संपूर्ण भाजी कडू होते आणि नाहक दुष्परिणाम भोगावे लागतात. भाज्यांचा रस करताना काय काय रसामध्ये उतरते आहे याची नोंद घ्यावी अन्यथा अनर्थ होऊ शकतो.

कच्च्या भाज्याचे, फळांचे सेवन करण्यासाठीही फळे, सलाड म्हणजे त्याची पाने, बीट, काकडी (हीसुद्धा कडू नको हे ध्यानात असावे), मुळा, मुळ्याची पाने उकडून घ्यावीत. पाश्चात्त्य देशांनी त्यामध्ये विविध ‘सॉसेस’ टाकून त्याला संस्कारित केले असून देशकालाप्रमाणे त्याचे सेवन केले जाते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

कच्च्या भाज्या करताना त्याचा चीक नाही ही काळजी घ्यावी. कच्ची केळी, कुयरी, कच्ची पपई यांसारख्या भाज्या शिजवताना विविध संस्कार सांगितले आहेत, ते त्याचे दुष्परिणाम काढण्यासाठी. प्रथम मीठ आणि हळदीच्या पाण्यात ते भिजवून ठेवावे. शिजवताना काळे मिरे, कोथिंबीर, ओला नारळ, पुदिना घालून संस्कार करावेत. सुरणाच्या भाजीत टाकले जाणारे आमसूल हे त्याचे उदाहरण आहे. असेच अळूच्या भाजीचे आहे, त्याला चिंचेने भावित करताना आरोग्य विचार ठेवला आहे. भारतीय आहार संस्कृतीमध्ये विविध मसाले, त्याचे वाटप, शिजवण्याची वेळ, त्यावरून टाकली जाणारी इतर द्रव्ये – कोथिंबीर, खोबरे, पुदिना आदींचा उपयोग सजवण्यासोबतच गुण बदलण्यासाठी आहे आणि हाच आहारीय विचार हे भारताचे वैशिष्टय़ आहे. अयोग्य पद्धतीने सेवन केलेले अमृतही विष ठरते हे शास्त्रीय विधान आपण विसरलो होतो. भोपळ्याच्या निमित्ताने त्याचे स्मरण झाले तरी अनेकांचे आरोग्य बिघडणार नाही.

vikrantayur@gmail.com