डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ
स्थूलपणा म्हणजे काय?
स्थूलपणा मोजण्यासाठी बॉडी मास इंडेक्सचे सूत्र वापरले जाते. वजनाला उंचीच्या (मीटर) वर्गाने भागले की बीएमआय मिळतो. अर्थात दोन वर्षे वयोगटाखाली या सूत्रानुसार स्थूलतेचे निदान न करता फक्त वजनाचाच विचार करण्यात येतो. स्थूलपणा हा विकसित देशांसह विकसनशील देशांतही वाढत आहे. बहुतांश देशातील अभ्यासानुसार १०० पैकी १६ ते २४ मुलांमध्ये स्थूलपणा आढळतो. दिल्लीतील शाळांमध्ये झालेल्या स्थूलतेच्या अभ्यासानुसार खासगी शाळेतील एकूण मुलांपैकी २९ टक्के विद्यार्थ्यांत तर शासकीय शाळेतील एकूण मुलांतील ११.१३ टक्के विद्यार्थ्यांमध्ये स्थूलपणा आढळून आला आहे.

स्थूलपणा होण्याची कारणे?
आई-वडिलांसह कुटुंबातील कुणाला डाऊन सिंड्रम, टर्नर सिंड्रमसह आनुवंशिक आजार असल्यास.
मुलांच्या संप्रेरक (हार्मोन्स) बदलामुळे.
महिलांच्या बीजांड कोषातील आजारांमुळे.
वातावरणातील बदलामुळे.
विशिष्ट प्रकारच्या काही औषधांचे सेवन करीत असल्यास.
कॉल्टीसॉलसारख्या स्टिरॉईडच्या औषध सेवन करणाऱ्यांना.
मानसोपचारातील काही औषधांमुळे किशोर अवस्थेत स्थूलपणा होऊ शकतो.
शारीरिक श्रम कमी व आहाराच्या अतिसेवनाने, बैठी दिनचर्या.
पिझ्झा, बर्गर, चिप्ससारख्या फास्ट फूडच्या अतिसेवनाने.
मैदानी खेळ, सायकिलगसारख्या शारीरिक घाम गाळणाऱ्या पद्धतीचा अवलंब न केल्यास.

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Secret History of the First Microprocessor
चिप-चरित्र : पहिली ‘बहुउद्देशीय’ चिप!
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

सध्याच्या स्थूलपणाची महत्त्वाची कारणे
वातावरणातील बदल व वाढत्या शहरीकरणाने, बैठी जीवनशैली.
यांत्रिकीकरणाने श्रम कमी झाल्याने स्थूलपणा वाढला आहे.
क्रयशक्ती वाढल्याने वस्तूंची उपलब्धता वाढून अन्नपदार्थ सेवनाची क्षमता वाढली.
शाळेतील शैक्षणिक स्पर्धेमुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष.
शाळा परिसरात स्थूलता वाढवणाऱ्या अन्नपदार्थाची सहज उपलब्धता.
स्थूलपणाचे दुष्परिणाम
अतिस्थूलपणाची पहिली पायरी
मधुमेह (टाइप- २) आणि रक्तदाबासारखे आजार होण्याची शक्यता.
शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढते.
मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता वाढते.
प्रजनन क्रिया व जननेंद्रियाशी संबंधित आजार जडू शकतात.
मोठेपणातील हृदयरोग होण्याची शक्यता.
श्वसनाशी संबंधित दम्यासारखे आजार.
स्थूलपणामुळे लहानपणीच मुलींसारख्या स्तनांची वाढ होणे.
मुलांची साधारण वाढ तसेच स्नायूंची वाढ खुंटते.
झोपेचे आजार होण्याची जास्त शक्यता असते.
पायात वाकडेपणा येण्यासारखे हाडांचे आजार.
स्थूलपणाची तपासणी व निदान
रुग्णाची व्यवस्थित विचारपूस करणे.
रक्त, लघवीच्या तपासण्या.
शरीरातील स्थूलतेचे प्रमाण तपासणे.
सीटी स्कॅन, एमआरआयसह विविध तपासणी करून अनैसर्गिक वाढ तपासणे.

स्थूलपणाचे उपचार व उपाय
प्रत्येकाला आरोग्य शिक्षण.
मुलांच्या आहाराचे नियोजन.
नित्याने शारीरिक व्यायाम करणे.
संतुलित आहाराचे सेवन करणे.
फास्ट फूड, पिझ्झा, चिप्स, फ्रेंच फ्रायसारख्या स्थूलपणा वाढवणाऱ्या अन्नपदार्थाचे सेवन टाळणे.
साखरेचे प्रमाण जेवणात एकूण ऊर्जेच्या ५ ते १० टक्केच्या आत आणणे.
गॅस्ट्रोप्लास्टी आणि गॅस्ट्रोबाईंिडगसारख्या महागडय़ा शस्त्रक्रिया करणे (आतडय़ांशी संबंधित शस्त्रक्रिया.)

स्थूलपणाची लक्षणे
(यापैकी काही लक्षणे असू शकतात)
मुलांची उंची कमी दिसते.
शुष्क त्वचा.
मलबद्धता.
लवकर थकवा येणे.
वारंवार तहान व भूक लागणे.
शरीराच्या कोणत्याही भागात स्थूलपणा असणे
(पोट, मानसह इतर भाग)
पोट, खांदे इत्यादींवर स्ट्रेचमार्क येणे.

(शब्दांकन- महेश बोकडे)