सीटी स्कॅनमध्ये तपासणी केल्यानंतर खरा आजार समजतो, असे आपण अनेकदा ऐकत असतो. परंतु हे यंत्र नेमके काय काम करते. एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एमआरआय यांमध्ये नेमका काय फरक आहे, हे समजून घेऊया केईएम रुग्णालयाच्या मज्जातंतू चिकित्सा (न्यूरोलॉजी) विभागाच्या साहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिधा शाह आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिनव राँवका यांच्याकडून..

सीटी स्कॅन

eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
Black Red or White Pot Matki Which Is Better In Summer How To Make Water Cool Faster
Video: काळा की लाल कोणता माठ वापरावा? ‘ही’ एक वस्तू फ्रीजपेक्षा गारेगार ठेवेल पाणी, मडकं स्वच्छ कसं करावं?
Which Medicine Tablets To Take reduce Acidity First Remedies To Detox Body And Remove Pitta Health Expert Advice
पित्त झाल्यास लगेच कोणती गोळी घ्यावी? डॉक्टरांनी सांगितले, सर्वात आधी घरी काय उपचार करता येईल

सीटी म्हणजे कॉम्प्युटराइज्ड एक्सियल टोमोग्राफी (सीएटीसुद्धा म्हणतात).. सीटी स्कॅन ही तंत्रप्रणाली एक्स-रेचा पुढचा टप्पा आहे. एक्स-रेमध्ये एकाच दिशेने क्ष-किरण सोडले जाऊन त्या माध्यमातून शरीराच्या विशिष्ट भागाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे एक्स-रेच्या माध्यमातून न्युमोनिआ, अस्थिभंग अशा हाडांशी संबंधित आजारांचे निदान करणे शक्य आहे.

मानवी शरीररचना अत्यंत जटिल आहे. तेव्हा ही जटिल व्यवस्था अंतर्भागातून कशी दिसते हे समजल्याशिवाय आजारांचे निदान करणे शक्य नाही. शरीर हे त्रिमितीय मात्र एक्स-रे द्विमितीय येतो. त्यामुळे एक्स-रे तपासणीमधून निदान करताना मर्यादा येतात. एक्स-रे तंत्राचा पुढचा टप्पा म्हणून सीटी स्कॅन तंत्रप्रणाली उदयाला आली. सीटी स्कॅनमध्ये विविध बाजूंनी क्ष-किरण सोडले जाऊन शरीराच्या अंतर्भागाची विविध अंगांनी छायाचित्रे घेतली जातात. संगणकाच्या साहाय्याने या छायाचित्रांच्या माध्यमातून शरीरातील विविध भागांचे त्रिमितीय स्वरूप पाहता येते आणि त्याद्वारे शरीरातील अंतर्भागाचे परीक्षण करता येते.

मेंदूच्या आजारासह मान, मणका, छाती, ओटीपोट, पोट आदी भागांमधील आजारांच्या निदानासाठी सीटी स्कॅनद्वारे तपासणी केली जाते. सीटी स्कॅन ही प्रणाली येण्यापूर्वी लक्षणांवरून केलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान नेमका आजार

कोणता आहे, याचे निदान होत असे. सीटी स्कॅन तंत्रप्रणालीमुळे मात्र आता शरीरातील प्रत्येक अवयवाचे अंतर्परीक्षण करणे सोपे झाल्याने आजारांचे निदान वेळेत करणे शक्य झाले आहे.

सीटी स्कॅन किंवा मॅग्नेटिक रिझोन्स इमेजिंग (एमआरआय) या दोन्ही तंत्रप्रणालीचे बाह्य़स्वरूप आणि त्यातून मिळणारी छायाचित्रे यामध्ये साम्य असले तरी या दोन्ही तंत्रप्रणाली भिन्न आहेत. सीटी स्कॅनमध्ये मेंदूच्या प्रत्येक भागात क्ष-किरण सोडले जाऊन मेंदूची रचना आणि त्यामध्ये होणारे बदल याचा अभ्यास केला जातो.

एमआरआय

एमआरआयमध्ये फार मोठा चुंबक असून त्याची चुंबकीय शक्ती ही १.५ टेस्टला ते ३ टेस्टला इतकी असते. सामान्य भाषेत सांगायचे तर ही चुंबकाची शक्ती पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीपेक्षा २० ते ३० हजार पट अधिक असते. एमआरआय यंत्रामध्ये मेंदूमध्ये असणाऱ्या रसायनांच्या रासायनिक प्रक्रियेवरून (केमिकल कंपोझिशन) मेंदूचा अभ्यास केला जातो. प्रत्येक रासायनिक प्रक्रियेचे चुंबकीय गुणधर्म भिन्न असतात. त्या अतिसूक्ष्म गुणधर्माला विस्तारित करून मेंदूतील रासायनिक प्रक्रिया समजून घेणे शक्य होते. त्यामुळे मेंदूमध्ये जेव्हा अतिसूक्ष्म बदल घडत असतात, तेव्हा त्यांचे निदान पहिल्या टप्प्यामध्ये एमआरआय तपासणीमध्ये समजते. सीटी स्कॅनमध्ये हे बदल पहिल्या टप्प्यात दिसून येत नाहीत.

एक हात हलवताना मेंदूमध्ये होणारे बदल किंवा बोलल्यानंतर मेंदूच्या भागामध्ये होणारे बदल एमआरआयच्या मदतीने थेट पाहता येतात. काही विशिष्ट प्रकारच्या मेंदूमधील गाठींची (टय़ूमर) शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मेंदूचा विशिष्ट भाग काढल्यानंतर मेंदूला किती प्रमाणात नुकसान पोहचेल किंवा रुग्णाच्या कोणत्या हालचालीवर परिणाम होईल याचा अंदाज एका विशिष्ट प्रकारच्या एमआरआयमध्ये करता येतो.

सीटी स्कॅन ही स्वस्त आणि जलद प्रणाली आहे. मेंदूच्या सीटी स्कॅनसाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो, तसेच रुग्णाची प्रकृती गंभीर असली तरी सीटी स्कॅन करणे शक्य आहे. त्यामुळे अत्यंत तातडीच्या वेळेस डोक्याची दुखापत किंवा आकडी, मेंदूला रक्तप्रवाह न होणे, ब्रेन हॅमरेज अशा स्थितीमध्ये त्वरित सीटी स्कॅनची तपासणी करून पुढील उपचार केले जातात.

एमआरआय ही खर्चिक आणि वेळ लागणारी प्रक्रिया आहे. एका एमआरआयला साधारणपणे १५ मिनिटे ते एक तासापर्यंतचा वेळ लागू शकतो. सीटी स्कॅनपेक्षा संवेदनशील असतो. मेंदूमधील अतिसूक्ष्म बदलांचे निदान यामध्ये करता येत असल्याने मेंदूचा टय़ूमर आणि आकडीच्या सुरुवातीच्या लक्षणाचे निदान एमआरआयमुळे करता येते.

सीटी स्कॅन तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करण्यासाठी सीटी स्कॅन प्रणाली योग्य आहे. आपल्याकडे आता पोर्टेबल सीटी स्कॅनरही लवकरच येत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा अन्य ठिकाणी  तातडीने हे यंत्र सहजपणे उपलब्ध करणे आता शक्य होईल.