आल्याला दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकविले की सुंठ तयार होते. सुंठीला ‘विश्वभेषज’ म्हणजे संपूर्ण जगाचे औषध असे म्हटले आहे. नुसत्या अनुपान भेदानेसुद्धा वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमुळे निर्माण होणाऱ्या विविध रोगांवर सुंठ उपयोगी पडते. सुंठीचे प्रमुख होते ते पचन संख्येच्या सर्व विकारांवर!
* पाव चमचा सुंठ पावडर+ छोटय़ा सुपारीएवढा गुळाचा खडा व ते एकत्र करायला लागेल एवढे घरचे तूप, अशी गोळी करून ती नाश्ता आणि दोन्ही जेवणापूर्वी चावून खाऊन वर कोमट पाणी प्यावे. भूक न लागणे, अ‍ॅसिडिटी, अपचन, मळमळ, पोट दुखणे, पोट जड होणे, गॅस, पोटात मुरडून संडासला होणे अशा सर्व तक्रारींवर अत्यंत उपयोगी आहे.
* सुंठ घेतल्यावर पित्त होते, हा गैरसमज आहे. सुंठ फक्त चवीला तिखट आहे. ती पचल्यावर तिचे कार्य हे मधुर (गोड) गुणाने होते आणि मधुर रस हा पित्तशामक आहे. आम्लपित्तात तर सुंठ हा हुकमी एक्का आहे.
* सुंठीचे इतर अनेक उपयोग पुढल्या काही भागांमध्ये बघू.