भारतात २०११च्या लोकसंख्येनुसार आठ टक्के लोक हे वयाच्या ६० वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील आहेत. महाराष्ट्रात ही संख्या लोकसंख्येच्या तुलनेत ९.३ टक्के आहे. वृद्धावस्थेत प्रत्येक व्यक्तीत मानसिक व शारीरिक बदल मोठय़ा प्रमाणावर घडून येतात. त्याकडे लक्ष न दिल्यास त्याचे रूपांतर नैराश्यामध्ये होण्याची दाट शक्यता असते. नैराश्य वाढल्यामुळे देशात वृद्धांच्या आत्महत्याही मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. हा प्रकार थांबवण्याकरिता वृद्धांची प्रत्येक व्यक्तीने काळजी घेत त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

वृद्धांमधील नैराश्य म्हणजे काय?
बहुतांश व्यक्तींमध्ये वाढत्या वयानुरूप त्यांच्या शरीरामध्ये मानसिक बदलांसह इतरही काही बदल मोठय़ा प्रमाणात घडून येतात. वयाच्या ६० वर्षांपर्यंत मेंदू क्षीण होण्याचे प्रमाण कमी असले तरी त्यानंतर ते वाढते. वयाच्या साठीनंतर वृद्ध व्यक्तींमध्ये कोणत्याही गोष्टीत रस नसणे, कामात उत्साह कमी होणे, विचार करण्याचे प्रमाण वाढणे, कामाची गोष्ट विसरणे, प्रत्येक गोष्टीची जास्त चिंता करणे यासह विविध कारणे निदर्शनात आल्यास त्याला नैराश्य असल्याचे स्पष्ट होते.

According to the United Nations Population Fund UNFPA report the estimated population of India is 144 crores
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट
mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

मेंदूत होणारे बदल
वाढत्या वयानुरूप मानवी शरीरात बदल घडून येतात. भारतात ६० वर्षे व त्यावरील वयाच्या लोकांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ८.० टक्के आहे. वयाच्या २५ वर्षांपासून ते वयाच्या ६० वषार्ंपर्यंत प्रत्येक दशकाने नैसर्गिकरीत्या सूक्ष्म प्रमाणात अगदी हळुवारपणे मेंदूचा आकार (ब्रेन टिश्यू) घटण्याची क्रिया सुरू होते. यालाच सेरेब्रल अ‍ॅथ्रोप्सी किंवा ब्रेन अ‍ॅथ्रोप्सी असे म्हणतात. वयाच्या ६० वर्षांपासून प्रत्येक वर्षांला ०.५ टक्के ते १.० टक्के याप्रमाणे मेंदूची घट होते. वयाच्या ७५ वर्षांनंतर जवळपास ७.५ ते १५ टक्के मेंदूचा आकार २५ वर्षे वयाच्या तुलनेत कमी झालेला असतो. पुरुषामध्ये मेंदूचा आकार कमी होण्याचे प्रमाण स्त्रीच्या तुलनेत जास्त असते.
(शब्दांकन- महेश बोकडे)

वृद्धांमधील नैराश्याचे कारण
’ पती किंवा पत्नीचा मृत्यू ’ गंभीर आजाराने ग्रस्त ’ आर्थिक अडचण ’ घरातील सदस्यांकडून दुर्लक्ष ’ दैनंदिन आवश्यक असलेल्या क्रियेसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे

लक्षणे
’ अशक्तपणा ’ चिडचिड ’ कमी बोलणे
’ जास्त विचार करणे ’ कामात उत्साह राहात नाही ’ एकाच ठिकाणी जास्त बसणे ’ लवकर थकवा येणे ’ झोप न लागणे ’ भूक मंदावणे वा जास्त भूक लागणे ’ जास्त वेळ अंथरुणावर पडून राहणे ’ रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

उपाय
’ वृद्धांच्या भावना समजून घेऊन त्यांना सहकार्य करणे ’ वृद्धांसोबत प्रेमळपणे वर्तणूक करणे ’ वृद्धांना मानसिक आधार देणे ’ शारीरिक हालचाली कमी होत असल्याने त्यांना मदत करणे ’ नियमित डॉक्टरांकडून वृद्धांची तपासणी करून घेणे ’ स्मरणशक्ती कमी असल्यास वेळोवेळी औषध घेण्याची आठवण करून देणे ’ वाढत्या वयात पचनशक्ती कमी होत असल्याने आहाराकडे विशेष लक्ष देणे ’ वृद्धांच्या रुचीबाबत लक्ष ठेवून त्यांना करमणुकीचे साधन उपलब्ध करून देणे
’ वेळोवेळी कुटुंबासोबत सहलीसह सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे समाजातील गैरसमज
’ नैराश्यामुळे वृद्धाला पागल समजणे
’ नाटक करत असल्याचे समजणे
’ विनाकारण चिडचिड करीत असल्याचा समज ’ बुद्धीचा कमी वापर करीत असल्याचा भ्रम
’ जाणीवपूर्वक कामाची गोष्ट विसरण्याचा समज ’ एकच बाब वारंवार सांगत असल्याचा समज

डॉक्टरांकडून अपेक्षा
’ गरजू वयोवृद्ध लोकांसाठी तपासणी शुल्कामध्ये सूट देणे ’ अतिगरीब गरजू वयोवृद्ध लोकांना मोफत उपचार देणे ’ वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना सेवा देणे ’ रुग्णालयात वृद्धांना वेळीच सेवा व मार्गदर्शन करण्याकरिता अतिरिक्त मनुष्यबळ ठेवणे ’ पॅथोलॉजी लॅबमध्ये त्यांच्या तपासण्यांमध्ये काही प्रमाणात सूट देणे

सेवानिवृत्तीनंतर नैराश्याचे प्रमाण जास्त
मानवाच्या सर्व क्रिया मेंदूद्वारे नियंत्रित होत असल्याने थोडय़ाफार प्रमाणात या वयोगटातील काही लोकांमध्ये मानसिक अवस्थेवरसुद्धा फरक पडलेला दिसून येतो. मात्र सर्वच वृद्ध अवस्थेतील लोकांमध्ये हा फरक दिसूनच येतो असे नाही. या मानसिक अवस्थेतील बदलामध्ये सर्वात जास्त प्रमाण नैराश्य म्हणजे उदासीनता दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार वृद्धावस्थेतील नैराश्याचे प्रमाण हे या वयोगटातील लोकांमध्ये १० ते २० टक्के आहे. भारतामध्ये केलेल्या अभ्यासानुसार योग्य प्रमाण हे या वयोगटातील लोकांमध्ये १३ ते २५ टक्के आढळून आले आहे. शासकीय व खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यावर कामाचा अवाका अचानक कमी झाल्यावर वृद्धांमध्ये नैराश्य जास्त येत असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे.