14 August 2020

News Flash

आयुर्मात्रा : केसांसाठी उपचार

केस खूप खसखसून पुसू नये. खप घट्ट बांधू नयेत. रासायनिक शांपू किंवा साबणाने केस धुऊ नयेत.

वळय़ापासून तयार केलेली तेले रोज रात्री केसांच्या मुळांशी बोटांनी मॉलिश करून जिरवावी

* केस गळत असतील, टक्कल पडत असेल तर ‘वटजटादि’ किंवा ब्राह्मी, माका, आवळय़ापासून तयार केलेली तेले रोज रात्री केसांच्या मुळांशी बोटांनी मॉलिश करून जिरवावी.
* केस काळे दिसण्यासाठी आवळा पावडर, त्रिफळा चूर्ण, जास्वंदीच्या फुलांचा रस लोखंडाच्या भांडय़ात गरम करून चहाच्या उकळवलेल्या पाण्यातून केसांना लावून ठेवावे.
* केसातील कोंडा जाण्यासाठी खोबरेल + कापूर, करंज तेल, खोबरेल + वेखंड पावडर केसांच्या मुळांशी जिरवून ६ ते ८ तासांनी आवळा, शिकेकाई, रिठा यांनी बनविलेल्या शाम्पूनी धुवावेत.
* केसांत उवा होत असतील तर करंज किंवा नीम तेलात कापूर घालून रात्रभर केसांच्या मुळाशी लावून ठेवून सकाळी वर सांगितलेल्या शांपूने केस धुवावेत. सीताफळाच्या बियांचे चूर्णही खोबरेल तेलातून लावता येते.
* केसात पाणी राहू देऊ नये. केस खूप खसखसून पुसू नये. खप घट्ट बांधू नयेत. रासायनिक शांपू किंवा साबणाने केस धुऊ नयेत. मशीनने केस वाळवणे किंवा सरळ करणे टाळावे. केसांच्या सर्वच विकारांसाठी खारट, आंबट व मसालेदार पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

मोजमाप आरोग्याचे : भारतातील कर्करुग्ण
वर्ष           कर्करुग्ण
२०१३     १०,८६,७८३
२०१४    ११,१७,२६९
२०१५        ११,४८,६९२
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण
वर्ष           रुग्ण
२०१२       ७६,७८३
२०१३       ७९,८३३
२०१४        ८३,०३५
देशात सर्वाधिक कर्करुग्ण या प्रकारातील : स्तन, मान आणि तोंड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2016 12:22 am

Web Title: hair treatment
Next Stories
1 मूत्रपिंडाचे आरोग्य जपा!
2 मासिक पाळीतील जंतुसंसर्ग
3 रोज खाओ अंडे!
Just Now!
X