जगातल्या तीन प्रोढ व्यक्तींपैकी  एकाला उच्च रक्तदाब असतो आणि दर दहा जणांपैकी एकाला मधुमेह असतो.

दरवर्षी सुमारे एक कोटी नवीन लोकांना उच्च रक्तदाबाने होणारे आजार होतात.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०३०पर्यंत उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या हृदयविकारामुळे आणि अर्धागवायूमुळे सुमारे अडीच कोटी लोक मृत्युमुखी पडतील.

१४० सिस्टॉलिक आणि ८५ डायस्टॉलिक हे रक्तदाबाचे उचित प्रमाण मानले गेले आहे. यापेक्षा जर ते जास्त असेल, तर त्याला उच्च रक्तदाब असते म्हणतात.

२५ वष्रे वयावरील ४० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाबाने ग्रासले आहे.

आयुर्मात्रा : आंबा

सध्या या फळांच्या राजाबद्दल प्रत्येक वृत्तपत्रामध्ये बरेच काही छापून येतच आहे, तरीही आंब्याबद्दल थोडी वेगळी माहिती-

  • उत्तम शक्तिवर्धक कितीही खाल्ला तरी भूक कमी करत नाही. याने भूक व चव वाढते.
  • कच्च्या आंब्याच्या फोडी वाळवून ‘आंबोशी’ करून ठेवतात. ती वर्ष-दोन वर्ष टिकते. या आंबोशीची पावडर करून भाजी आमटीत ‘आमचूर’ म्हणून चिंच-कोकमाऐवजी वापरतात. जिथे चिंच खाऊ नका सांगतात, तिथे या आंबोशीचे लोणचे चालते. हेही भूक व चव वाढवणारे आहे.
  • दूध व फळे एकत्र करून खाणे हा ‘विरुद्धाहार’ आहे. त्यामुळे आंब्याच्या फोडी कयन खाव्या किंवा तूप-मिरपूड घालून आमरस खावा. मिल्कशेक नको.
  • आंब्याच्या कोयीचे भाजून किंवा वाळवून केलेले चूर्ण (आम्रमज्जा) हे आव पडणे, जुलाब होणे यावर उत्कृष्ट औषध आहे. त्याने पोटातील जंतही जातात.
  • एप्रिल-मे महिन्याशिवा हापूस आंबा खाऊ नये. पहिला पाऊस पडल्यावर हापूस आंबा बंद करावा.
  • आंब्याच्या रसावर पाणी पिऊ नये. गरम पाण्यात थोडावेळ ठेवून मग वापरला तर आंबा लवकर पचतो.

-वैद्य राजीव कानिटकर