‘पूगं गुरू हिमं रूक्षं

कषायं कफपित्तजित्।

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
arvind kejariwal latest news
“तुरुंगातून टोळ्या चालवल्या जातात, सरकार नाही” भाजपा खासदार मनोज तिवारी यांची तिखट प्रतिक्रिया!
sangli lok sabha marathi news, mla vinay kore marathi news
सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाला मित्र पक्षाकडून आव्हान

मोहनं दीपनं रूच्यमास्य

वैरस्यनाशनम्।।’

भारतीय संस्कृतीत विविध धार्मिक कार्यक्रमांना अग्रक्रमाचे स्थान आहे. धार्मिक कार्यक्रमाचे मार्गदर्शन करणारे गुरुजी, यजमानांना विडय़ाच्या पानावर सुपारी ठेवून शुभारंभ करण्यास सांगतात. समुद्रकाठच्या प्रदेशात खूप मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या सुपारीस कोकणात पोफळ, पुगफल (संस्कृत), छालिया, सुपारी (हिंदी), सोपारी (गुजराती), पोपल (फारसी) अशा विविध नावांनी संबोधले जाते. ‘पुगीफल ताम्बुलं समर्पयामि।’ अशी ओळखली जाणारी सुपारी तुरट आणि किंचित मधुर रसाची असते. गुरू व एकाच वेळी रूक्ष गुणाची आहे. तिच्या मादक व रुचिकर गुणामुळे तिला षोडशगुणी विडय़ात मानाचे स्थान आहे.

सुपारी स्वतंत्रपणे एकेकाळी खूप मंडळी येता-जाता खात असत. त्यासाठी विविध धातूंचे अडकित्ते घरोघर असत. युनानी मतानुसार सुपारी तोंडातील फाजील थुंकी दूर करण्यात खूप उपयोगी ठरते. आधुनिक वैज्ञानिकांच्या मते कच्च्या सुपारीच्या सेवनाने चपटे कृमी मरून जातात. श्री चरकसंहितेत सू. अ. ४ यातील ५० महाकषायामध्ये कृमीनाशक गणात सुपारीला अग्रस्थान आहे. कारण सुपारी शीतगुणाची आहे. मेघालय या हिमालयातील राज्यात शिलाँग या राजधानीत जवळपास ९० टक्के लोक दिवसभर कच्च्या सुपारीचे सेवन करत असतात. त्यातील परम खेदाची बाब अशी की ही ‘खासी’ मंडळी एकीकडे चुना-तंबाखू मळत असतात आणि दुसरीकडे रस्तोरस्ती भिंती, बसस्टँड किंवा कुठेही मोकळ्या जागी हातावरचा चुना फासत असतात.

मी भारतीय विमानदलात शिलाँग येथील एएमसीसी या युनिटमध्ये असताना ‘कच्च्या कच्ची’ सुपारी कचकावून खाताना आदिवासी मंडळींना बघताना अचंबित होत असे. बाजारात सुपारीचे दोन प्रकार मिळतात. खरी खवय्या मंडळी सुपारीचा रोठा खाणे पसंत करतात. सौम्य प्रकृतीची मंडळी पाण्यामध्ये उकळून लाल रंगाची झालेली सुपारीची खांडे पानाबरोबर खातात.

हरी परशुराम औषधालयाच्या दशमूलारिष्ट या काढय़ात आणि जखम चटकन भरून येण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या एलादि तेलात सुपारीचा समावेश आहे.