18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

पिंपळपान : धने

धन्याला कीड लवकर लागते. त्यामुळे धने नेहमी ताजे, नवे वापरावे.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: October 12, 2017 12:32 AM

‘धान्यकं तुवरं स्निग्धमवृष्यं मूत्रल लघु तिक्तं कटुकमुष्णं च दीपनं पाचनं स्मृतम्।।

ज्वरघ्नं रोचनं ग्राहि स्वादुपाकि त्रिदोषनुत। तृष्णादाहवमिश्वासकासामर्श: कृमिप्रणुत्।।’

(भा. प्र.)

स्वयंपाकघरात धने व ताज्य कोथिंबिरीला अढळस्थान आहे. तीव्र उन्हाळ्यात पुणे मंडई परिसरात कोथिंबिरीचे भाव जेव्हा गगनाला भिडले, त्या वेळेस जेवणातली मजा कशी निघून जाते, हे मी अनुभवले आहे. उत्तम चविष्ट स्वयंपाक करताना भाजी, आमटी यात जशी कोथिंबीर हवी, तशीच महती मसाल्यात समाविष्ट असणाऱ्या धन्याला आहे. कोथिंबीर चटकन खराब होते. त्यामुळे ती आपण गरजेपुरतीच आणतो व स्वच्छ धुवून वापरतो. धन्याला कीड लवकर लागते. त्यामुळे धने नेहमी ताजे, नवे वापरावे.

धान्यक (संस्कृत), धनिया (हिंदी), धने (बंगाली), कोत्तुंरि (कन्नड), कोत्तिमिरि (तेलुगू), कोत्तंबरि (तुळु), कॉरिअेन्डर (इंग्रजी) अशा विविध नावांनी धने व कोथिंबीर ओळखली जाते. धन्याची लागवड सर्वत्र होते. धन्याचे तेल काढले जाते आणि विविध हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आणि काही औषधांकरिताही याचा वापर केला जातो. धने दीपन, मधुर, शीत, कषाय, रूक्ष, मूत्रविरजनीय, पिपासाघ्न, दाहप्रशमन, वायुनाशी आणि अभिष्यंदप्रशम आहेत. समस्त ज्वरविकारात शरीरातील जलद्रव्य कमी होते, शोष पडतो अशा वेळेस धन्याच्या पाण्याचा फार उपयोग होते. धने कधीही पाण्यात उकळवू नये. कारण त्यातील उडनशील तेल वाफेबरोबर उडून जाते. त्याकरिता एक चमचा धने ठेचून रात्री एक कप पाण्यात भिजत टाकावे. सकाळी ते चावून खावे आणि वर तेच पाणी प्यावे. अंगाला खूप खाज येत असल्यास असे धनेपाणी सत्वर खाज थांबवते हे सांगावयास नकोच. काही कारणाने बिब्बा अंगावर उतल्यास त्या जागेवर कोथिंबीर वाटून त्याचा लेप करावा. त्यादिवाशी पूर्णपणे आळणी जेवावे. लघवी खळखळून होत नसल्यास घरगुती आौषध म्हणून पूर्वी सांगितल्याप्रमाणेच धन्याचे पाणी सकाळी-सायंकाळ घ्यावे.

धन्याच्या विविध नावांच्या निरुक्तीस अनेक अर्थ आहेत. धान्यक म्हणजे क्षुद्र धान्यासारखे बी असणे. धत्रा म्हणजे छत्राकार फूल असणारी कोथिंबरी, कुस्तुम्बुरू म्हणजे कुत्सिक रोग समुहे म्हणजे जी खूप त्रास देणाऱ्या रोगांना तुंबते, वितुन्नक म्हणजे ज्यामुळे दु:ख कायम दूर होते, कष्ट दूर होतात.

हरी परशुराम औषधालयाच्या अभयारिष्ट, पिप्पलादि काढा, महारास्नादि काढा, चंद्रप्रभावटी, अश्वगंधापाक, जपाकुसुमादि तेल, रक्तशुद्धी काढा अशा विविध औषधांत धने व कोथिंबिरीचे मोठेच योगदान आहे.

खवय्या मंडळींना कोथिंबिरीच्या गरम गरम वडय़ा दिल्यास जेवणाची रंगत खूप वाढते.

First Published on October 12, 2017 12:32 am

Web Title: information on coriander seeds