कच्चे किंवा अर्धवट शिजलेल्या मांसातून शरीरात जात असलेल्या ‘टी सोलिअम’ जंतूंमुळे आकडी येत असल्याचा समज होता. मात्र पालेभाज्यांमधूनही हा जंतू शरीरात जाऊन मृत्यू येत असल्याची घटना मुंबईत उघडकीस आली. आकडीवर पूर्ण उपचार अजूनही उपलब्ध नाहीत, त्यामुळे याबाबत प्रतिबंधात्मक काळजी घेणे अधिक हितावह आहे.

निहार ठकार हा १७ वर्षांचा तरुण. फूटबॉलपटू असलेल्या निहारला आकडी आली. मात्र जन्मापासून अगदी निरोगी असलेल्या मुलाला काय होते आहे हे समजून घेऊन रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी विलंब झाला. उपचारांदरम्यान निहारचा मृत्यू झाला, तेव्हा चर्चा सुरू झाली ती भाज्यांमधून शरीरात गेलेल्या टी सोलिअम या जंतूंच्या संसर्गाची. कच्चे मांस खाल्ल्याने टी सोलिअम या जंतूचा प्रादुर्भाव होतो, असे अनेकदा दिसून आले आहे. मात्र निहारच्या आहाराचा अंदाज घेता त्याला कच्च्या भाज्यांमधून या जंतूचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या ग्लोबल रुग्णालयातील डॉ. नितीन संपत यांनी सांगितले. निहारला तीव्र स्वरूपाची आकडी आल्याने मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबला. रुग्णालयात आल्यानंतर तातडीने त्याला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले, मात्र त्याला वाचविण्यात यश आले नाही. या घटनेनंतर पुन्हा एकदा भाज्यांची स्वच्छता, रेल्वेलगतच्या अस्वच्छ पाण्यातील भाज्या, कच्चा भाज्यांचे सेवन हे मुद्दे चर्चेत आले आहेत.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

टी-सोलिअम जंतू कुठे आढळतो?

डुकरांच्या संसर्गातून किंवा डुकराच्या मांसातून टी-सोलिअम या जंतूचा प्रामुख्याने प्रसार होतो. त्यामुळे डुकराचे मांस खाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या देशांमध्ये टी सोलिअमचा संसर्गही अधिक आढळतो. आता मात्र भाजीपाल्यामधूनही या जंतूचा संसर्ग होत असल्याचे दिसते. रेल्वेलगत भाज्यांची शेती करण्यासाठी दूषित पाण्याचा वापर केला जातो. त्या पाण्यात डुक्कर किंवा अन्य प्राण्यांची विष्ठा किंवा दूषित घटक मिसळले जातात. अर्धकच्च्या फळभाज्या आणि पालेभाज्यांमुळेही या जंतूंचा फैलाव होऊ शकतो, असे मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयातील मेंदूविकार विभागप्रमुख डॉ. आलोख शर्मा यांनी सांगितले.

टी सोलिअममुळे आकडी येण्याचे कारण

फळभाज्या आणि पालेभाज्या स्वच्छ न करता खाल्ल्याने किंवा अर्धवट उकडल्यामुळे त्यावर राहिलेला टी सोलिअम हा जंतू पोटात जातो. पोटात गेल्यावर बहुतांशवेळा पचन यंत्रणेमार्फत हा जंतू निघून जातो. काही वेळा मात्र हा जंतू पोटापासून मेंदूपर्यंत जातो. मेंदूच्या पेशींना या जंतूच्या संसर्गामुळे सूज येते आणि त्यातच रुग्णाला आकडी येते. अनेकदा हा जंतू मेंदूमध्ये गेल्यानंतर अनेक जंतूंची पैदास होते. जंतूंची वाढ झाल्यानंतर उपचार करणे अशक्य असल्याचे केईम रुग्णालयाच्या मेंदूविकार विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता रावत यांनी सांगितले. टी सोलिअम मेंदूत जाण्याच्या प्रक्रियेला न्युरोसिस्टीसरकोसिस म्हटले जाते. बऱ्याचदा रुग्णाच्या मेंदूमध्ये अनेक जंतू आढळतात. हे जंतू त्यानंतर डोळे, स्नायू, मेंदू किंवा शरीराच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात.

प्रतिबंधात्मक उपाय

मांस स्वच्छ धुऊन आणि पूर्णपणे उकडून खावे. पालेभाज्या आणि फळभाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवावे आणि नीट शिजवावे. काकडी, टोमॅटोसारख्या फळभाज्या कोशिंबिरीद्वारे कच्च्या स्वरूपात खाल्ल्या जातात. आहारविज्ञानाचा विचार करता हे योग्य असले तरी या भाज्या स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बाहेर कच्चे सॅलड खाणे हे आरोग्यास श्रेयस्कर नसून अहितकारकच ठरू शकते. टी सोलिअमचा संसर्ग झाला नाही तरी कच्च्या भाज्यांतून इतर जिवाणू-विषाणूंचा संसर्ग होण्याचीही शक्यता असते. त्यासोबतच जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. पावसाळ्यात सर्वच भाज्यांवरील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

आकडी येण्यामागची कारणे-

  • सर्व रुग्णांमध्ये आकडी येण्याचे नेमके कारण सांगणे अद्यापही कठीण असून दहापैकी सहा जणांना कोणतेही स्पष्ट कारण दिसत नसतानाही आकडी येते. बहुतांश वेळा आकडी ही आनुवंशिक असल्याचे आढळले आहे.
  • आकडी येण्यामागचे निदान करता आले तर त्याला सेकंडरी किंवा सिम्पटोमॅटिक एपीलेप्सी म्हटले जाते.

आकडीमागील ज्ञात कारणे-

  • प्रसूतीपूर्व किंवा जन्माच्या दरम्यान मेंदूला दुखापत होणे, मेंदूला ऑक्सिजनची कमतरता, जन्माच्या वेळी मेंदूवर आघात होणे, जन्माच्या वेळी वजन कमी असणे.
  • जन्मजात विकृती, आनुवंशिक मेंदू विकृती
  • मेंदूला तीव्र झटका किंवा धक्का बसणे.
  • स्ट्रोक किंवा फटक्यामुळे मेंदूला ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा होणे.
  • मेंदूच्या बाहेरील आवरणाचा दाह, मेंदूची सूज, टीसोलिअम जंतूंमुळे मेंदूला सूज येणे या प्रकारच्या संसर्गामुळे.
  • काही आनुवंशिक आजार.
  • मेंदूत येणारी गाठ.

आकडीवरील उपचार पद्धती

टी सोलिअम जंतूच्या प्रादुर्भावामुळे डोके दुखणे, अवयव काम न करणे, आंधळेपणा, मेंदूच्या पेशींना सूज येणे, सतत आकडी येणे यांसारखे परिणाम जाणवतात. हा जंतू मुख्यत: मेंदूमध्ये आढळल्याने सिटी स्कॅन किंवा एमआरआय करून जंतूची पाहणी केली जाते. एखादा जंतू असेल तर औषधांच्या साहाय्याने त्यावर नियंत्रण आणले जाते. मात्र या जंतूचा नाश झाल्यानंतर त्या जागी कॅल्शिअमची गाठ तयार होते. ही गाठ औषधांनी कमी करणे शक्य नसल्यामुळे आकडी येण्याचे प्रमाण वाढते.

– मीनल गांगुर्डे

meenal.gangurde@expressindia.com