21 September 2020

News Flash

आयुर्मात्रा : इसबगोल

शौचास साफ होण्यासाठी अनेक औषधांमध्ये इसबगोल हा प्रमुख घटक असतो.

बाजारात मिळणारी ‘इसबगोलची भुशी’ सर्वाना परिचयाची आहे. शौचास साफ होण्यासाठी अनेक औषधांमध्ये इसबगोल हा प्रमुख घटक असतो. थंड गुणाचे असून प्रामुख्याने शौचाच्या अनेक विकारांवर उत्तम कार्य करते. ‘कोलायटीस’चे हे उत्तम औषध आहे.

  • जुलाब थांबवण्यासाठी इसबगोल पाण्यात भिजवून ते मिश्रण खिरीसारखे झाल्यावर त्यात खडीसाखर घालून घ्यावे किंवा दही किंवा ताकातून इसबगोल घेतल्यास अतिसार थांबतो. हाच उपाय स्त्रियांच्या श्वेतपदरावर (अंगावर पांढरे जाणे)सुद्धा होतो.
  • याउलट २ ते ४ चमचे इसबगोल रात्री झोपताना गरम पाण्यातून घेतल्यास सकाळी पोट साफ होते.
  • संधिवात किंवा गाऊट (वातरक्त) विकारांमध्ये सांध्यावर येणाऱ्या सुजेवर इसबगोल पाण्यात कालवून त्याच्या लगद्याचा लेप द्यावा.
  • लघवीला आग, घशाला कोरड पडणे, मुळव्याधीचा त्रास, पोटांत मुरडून संडासला होणे, आतडय़ांमध्ये व्रण होणे या सर्वावर कोमट पाणी, कोमट दूध किंवा ताकातून इसबगोल घेतले असता खूप फायदा होतो.

-वैद्य राजीव कानिटकर
hlt05

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 3:35 am

Web Title: isabgol bhusi
Next Stories
1 तरुणपणीच ‘बीपी’
2 प्रकृ‘ती’ : स्तनांचे आजार
3 उदरभरण नोहे.! : कशाबरोबर काय खावे?
Just Now!
X