• पाचक द्रव्यांमध्ये सुंठ, आले, ओव्यानंतर लिंबाचा क्रमांक लागतो.
  • उलटय़ा थांबवण्यासाठी लिंबू कापून त्यात खडीसाखरेचे खडे भरून ते चोखावे किंवा कापलेल्या लिंबात सुंठ-साखर घालून ते चोखावे.
  • अपचन, अजीर्ण, पोट जड-फुगणे, करपट ढेकर, मळमळ या सर्वासाठी आले-लिंबू समप्रमाणात रस काढून त्यात सवीपुरते सैंधव मीठ घालून ते दोन चमचे, कोमट पाण्याबरोबर दर चार तासांनी घ्यावे.
  • वारंवार होणारी पोटदुखी झाल्यास लिंबाचा रस, साखर घालून घ्यावा. अतितहान लागणे या विकारावरही हे उपयोगी.
  • बरेच दिवस राहणारा किंवा औषध थांबवल्यावर पुन्हा येणाऱ्या खोकल्यामध्ये बऱ्याचदा कफापेक्षा पित्ताचा संबंध असतो. अशा वेळी मध+लिंबू रस समप्रमाणात एकत्र करून दिवसातून चार वेळा चाटण करावे.
  • आम्लपित्ताच्या सर्व तक्रारींमध्ये सुतशेखराच्या गोळय़ा लिंबाच्या सरबतातून घ्याव्यात. भूक न लागणे, पोट साफ न होणे या तक्रारींमध्येही रात्रीच्या जेवणानंतर काही दिवस रोज, साध्या पाण्यात लिंबू सरबत घेऊन बघावे.

chart