20 September 2018

News Flash

दुग्धपान : किती आणि कसे?

रात्रीच्या वेळी दूध पिण्याची सवय आरोग्यासाठी उत्तम असल्याने मोठय़ांनी दूध नक्कीच प्यायला हवे.

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय संस्कृतीत दुधाला कायमच संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. विशेषत: फक्त शाकाहार करणाऱ्यांसाठी त्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आयुर्वेदामध्येही पोषक आणि पचनक्रियेसाठी पोषक म्हणून दुधाला खास दर्जा दिला आहे. प्रथिने, ‘अ’, ‘ब १’, ‘ब २’, ‘ब १२’ आणि ‘ड’ जीवनसत्त्व यांच्यासोबतच पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचा स्रोत असलेले दूध हे नक्कीच सर्वोत्तम आरोग्यदायी पेय आहे. अर्थात ग्लासभर दूध एका वेळेस पिणे हे फारच थोडय़ांना जमते, मुलांचे तर विचारूच नका.

HOT DEALS
  • Samsung Galaxy J6 2018 32GB Black
    ₹ 12990 MRP ₹ 14990 -13%
  • I Kall K3 Golden 4G Android Mobile Smartphone Free accessories
    ₹ 3999 MRP ₹ 5999 -33%

रात्रीच्या वेळी दूध पिण्याची सवय आरोग्यासाठी उत्तम असल्याने मोठय़ांनी दूध नक्कीच प्यायला हवे. दुधामध्ये ट्रिप्टोफन नावाचे अमिनो आम्ल असते त्यामुळे लवकर आणि गाढ झोप लागते. ट्रिप्टोफन शरीरात सीरोटोनिन आणि मेलाटोनिनचे प्रमाण वाढवतो. मेंदूला संदेश देणारे हे न्युरोट्रान्समीटर झोपेच्या वेळा आणि प्रमाण ठरवतात. एवढेच नाही तर झोपेच्या तक्रारी असलेल्या रुग्णांनाही दुधाची मात्रा लागू पडते. दुधातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअममुळे झोपेचे आजार दूर होतात, असे आहारतज्ज्ञ डॉ. रिंकी कुमारी यांनी सांगितले.

जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे सकाळी एक ग्लासभर दूध गपागप पिऊन टाकण्याची कल्पना उत्तम वाटत असली तरी आपली पचनसंस्था एवढय़ा दुधाच्या प्रमाणासाठी तयार नसते. त्यामुळे सकाळी दूध प्यायल्यावर पचनसंस्थेवर ताण येतो आणि मग छातीत दुखणे किंवा अपचनाच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे तांदूळ, गळू, मका, ज्वारी-बाजरी अशा अन्नधान्यांच्या पदार्थासोबत (खीर, लापशी) दूध घेणे फायदेशीर मानले जाते.

दूध उत्तम पेय असले तरी त्याचा अट्टहास करणे मात्र टाळले पाहिजे. काही पालक मुलांवर सतत दूध पिण्याची सक्ती करतात. त्यामुळे कंटाळून मुले दूध पिणे टाळू लागतात. मुलांसाठी सकाळी आणि रात्री एक-एक पेलाभर दूध पुरेसे ठरते. दोन पेले दुधापेक्षा जास्त किंवा कमी प्रमाण करू नये. हाडे मजबूत होण्याच्या इराद्याने बहुतांश पालक दुधाचे प्रमाण वाढवतात. मात्र दूध प्रमाणाबाहेर घेतले तर मुलांच्या शरीरात लोहाची तीव्र कमतरता जाणवू शकते, असे डॉ. रिंकी कुमारी म्हणाल्या.

मुलांना दुधाची सक्ती करणारी आई मात्र अनेकदा दूध पिताना दिसत नाही. मुलांप्रमाणेच स्त्रियांनीही त्यांच्या आहारात विशेषत: पाळी गेल्यानंतर दुधाचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. दुधामुळे हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण कमी होते. साधारण पन्नाशीनंतर बहुतांश भारतीय स्त्रियांमध्ये हा जीवघेणा आजार वाढलेला दिसतो. दुधामुळे आवश्यक प्रथिने, कॅल्शिअम, ‘ड’ जीवनसत्त्वाचा शरीराला पुरवठा होतो. त्यामुळे हाडे कमकुवत होण्यापासून वाचतात, असे डॉ. कुमारी म्हणाल्या.

(‘इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखाचा स्वैर अनुवाद)

First Published on July 31, 2018 1:01 am

Web Title: milk benefits health benefits of drinking milk