वैद्य प. य. वैद्य खडीवाले

खदिर: शीतलो दन्त्य: कण्डुकासारूचिप्रणुत्।

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Benefits of Millets
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

तिक्त: कषायो मेदोघ्न: कृमीमेहज्वरव्रणान्।

श्वित्रशोथमपित्तास्त्र पान्डु कृष्ठकफान् हरेत्।   (भा. प्र.)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक कदाचित वाचकमित्रांनी वाचले असेल. त्यात सुरुवातीलाच पुढीलप्रमाण शेर आहे..

‘..खर मांगे जानकी, माझीयो में भू रहेगी जबतक इमानकी।

तबतक लंडनतक्र चलेगी तेग हिंदुस्तानकी।।’

ज्या वेळी खर या वृक्षाचे नाव संभाषणात घेतले जाते, त्या वेळेस मला या ओळींची आठवण होते. इंग्रज फौजेने शेवटचा मोगल बादशाह बहादूर शहा याला पकडल्यानंतर त्याने वरीलप्रमाणे त्यांना सुनावले होते..

खराचा वृक्ष मोठा आणि पांढऱ्या सालीचा असतो. त्याची साल, ती उकडून काढलेला कात (सार) आणि गोंद (निर्यास) औषधांत वापरतात. सालीमध्ये कषायद्रव्य ९७ टक्के आणि कात ३९ टक्के असते. सालीचा काढा थंडावला म्हणजे कात तळाशी बसतो. चांगल्या काताची राख पाच टक्के पडते. खराला खदिर (संस्कृत), खर (हिंदी), खेर (गुजराती) अशा विविध नावांनी ओळखले जाते. खरसालीस किटसाल असेही नाव आहे. काताच्या दोन जाती आहेत. एक पांढरा आणि दुसरा काळा. चांगला कात सुरत जिल्ह्यात तयार केला जातो. सालीचा काढा उकडताना पांढरा कात काढतात. काढा थंडावल्यावर काळा कात मिळतो.

उदी रंगाचा कात औषधांत वापरण्यास चांगला. हा कात झाड जिवंत असताना लाकडाच्या फटीत आपोआप बनतो. याचे लहान तुकडे वेडेवाकडे लाकडाच्या भुशाबरोबर मिसळलेले असतात.

खर तुरट, कडू चवीचा असून मधुर गुणांचा आहे. त्याच्या वापराने कफ सुकतो, पाचन होते, शुक्र धातूतील ओलावा कमी होतो. त्यामुळे शीघ्रपतन टळते. कफ आणि पित्तप्रधान विकारांमध्ये कफ, खोकला, विविध त्वचाविकार, वारंवार मल-मूत्रप्रवृत्ती, अंगाला खाज सुटणे, लहान-मोठय़ा जखमा, अरुची, लठ्ठपणा, मधुमेह, ताप, कोडाचे पांढरे डाग, आमांश, रक्तविकार आणि पांडुता या विकारांत खराचे योगदान खूपच आहे.

जीर्णज्वरांत खरसाल आणि चिराईनच्या काढय़ाने प्लीहावृद्धी कमी होते. रक्तपित्तांत सालीच्या काढय़ाने दातांतून रक्त वाहणे कमी होते. त्वग्रोगांत रक्त व लस वात असल्यास खर सालीने व्रण धुवावे. वरून कात लावावा. कुष्ठविकारांमध्ये खराला खूप श्रेष्ठ मानले जाते. स्त्रियांच्या गर्भाशयाच्या शिथिलतेमुळे उद्भवलेली धुपण व रक्तस्रावाकरिता कातबोळ सत्वर गुण देतो. घशाच्या शिथिलतेमुळे होणाऱ्या त्रासाकरिता कात हे रामबाण औषध आहे.

हरी परशुराम औषधालयाच्या स्व. दंतमंजन, खदिरादी वटी, खदिरारिष्ट, दशमूलारिष्ट, कठपुतळी या औषधांखेरीज ‘इरिमेदादि तेल’ या मौलिक औषधांत खर साल आणि काताचा मोठाच सहभाग आहे.