हल्ली प्रत्येकाच्या तोंडी सहज एक वाक्य येते, ‘आज-काल फारच थकायला होत आहे.’ का बरे थकवा येत असावा? या थकण्याने आपले बालपण हरवले, तरुणपण मरगळून गेले आणि म्हातारपण असह्य झाले. थकवा येण्याची कारणे काय? का वाटत नाही उत्साह? जाणून घेऊ यामागील कारणे आणि त्यावर उपचार करू.

थकवा म्हणजे काय ?

Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?

एखाद्य विशिष्ट मांसपेशीची किंवा एकपेक्षा अनेक मांसपेशीची ताकद कमी होणे म्हणजे थकवा. काम करण्यास उत्साह न वाटणे,

थोडय़ाशा परिश्रमानंतर दमून जाणे म्हणजे थकवा. हा थकवा शरीराचा असतो, तसाच मनाचाही असतो आणि म्हणून रडल्यानंतर थकल्यासारखे जाणवते. आपल्या बोलीभाषेत अनेक गोष्टी थकवा म्हणूनच आपण गृहीत धरतो. आळस आणि थकवा यात फरक आहे. आळसात आपली क्रियाशक्ती पुरेशी असते, तर थकण्यामध्ये शक्तिपात होतो आणि इच्छा असूनही पुरेशा प्रमाणात क्रिया करता येत नाहीत.

भारतात ३०-६० वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये या दुर्लक्षित थकव्याचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. अर्थात वयोपरत्वे शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे जाणवणारा थोडा थकवा हा नैसर्गिक असतो.

प्रमुख कारणे आणि प्राथमिक उपाय.

झोपेच्या तक्रारी 

विचित्र वेळी झोपणे, झोपेत खूप घोरणे, झोपताना जाणवणारा दम्याचा त्रास, सारखी स्वप्ने पडणे.. एक ना अनेक कारणांनी पुरेशी व शांत झोप होऊ  शकत नाही. यामुळे मेंदूला व शरीराला पूर्ण विश्रांती मिळणे कठीण होते. दिवसभर मग थकवा जाणवतो.

*   शारीरिक व मानसिक तक्रारींवर योग्य औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. योग, ध्यान-धारणा, प्राणायाम शिकून घेऊन करावे.

*   झोपताना गैरम दुधात मध टाकून घ्यावे. दुधात ट्रीप्टोफन असते, यामुळे झोपेसाठी उपयोगी पडणारे सिरोटोनिन द्रव्य अधिक प्रमाणात तयार होते. मधातील कबरेदके ही द्रव्ये मेंदूपर्यंत वेगाने पोहोचवतात.

*   खसखस व जायफळ घालून केलेली दुधाची खीर रात्री झोपताना घ्यावी.

*   झोपताना थोडे वाचन करावे / शांत संगीताचा उपयोग करावा.

*   खोलीतील तापमान, दिव्यांचा प्रखर उजेड, आवाज या सर्वाची नोंद घ्यावी. अंधाराने मेलाटोनिन नावाचे द्रव्य मेंदूत तयार होते, ज्यामुळे नैसर्गिक झोप येण्यास मदत होतो.

*    भीतीदायक / संशयास्पद असे कार्यक्रम रात्री झोपेच्या वेळी बघू नयेत.

रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया)

लाल रक्तपेशी ऑक्सिजनचे वहन करीत असतात. लोह हा त्यांचा महत्त्वाचा घटक असतो. जेव्हा लोहाचे प्रमाण कमी होते, तेव्हा हा प्राणवायू पेशींपर्यंत कमी प्रमाणात पोहचतो. पेशींना पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने पेशींमधील थकवा आपणास जाणवू लागतो. चालून/जिना चढून धाप लागते. कामाची इच्छा होत नाही. सतत झोपावेसे वाटते. श्वास कष्टप्रद होतो.

*   लोहयुक्त गोळ्या किंवा पातळ औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. लोहयुक्त औषधाने बरे न वाटल्यास पुढील तपासणी करणे गैरजेचे असते.

*   आहारात हिरव्या पालेभाज्या, खजूर, बीट, काळ्या मनुका, डाळी, अंडी, मासे इत्यादीचे प्रमाण वाढवावे. लोहाच्या शोषणासाठी ‘क’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. त्यासाठी वरील पदार्थावर लिंबू पिळून घ्यावे. संत्री, मोसंबी, टोमॅटो, अननस इत्यादींचा आहारात समावेश करावा.

*    आवळ्याचा कोणताही पदार्थ रोज चालेल.

रक्तातील साखर 

शरीरातील न वापरता येणारी साखर शरीरात थकवा निर्माण करते. रक्तात कमी असलेली साखरेची पातळीही थकवा निर्माण करते. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास पेशींना साखरेद्वारे उद्दीपन मिळणे हे दोन्ही प्रकारांत होऊ  शकत नाही आणि थकवा जाणवतो.

*   मधुमेहींनी औषधाची मात्रा डॉक्टरांकडून बदलून घ्यावी. आहारात योग्य बदल करावेत. पुरेसा व्यायाम करावा.

*    साखरेची पातळी कमी होत असल्यास लगेचच थोडी साखर/ बिस्किटे/ चॉकलेट / फळांचा रस घ्यावा.

थायरॉइड

शरीरातील इंधनातून किती- कशी- केव्हा आणि किती वेगाने ऊर्जानिर्मिती होईल हे थायरॉइड ग्रंथीद्वारे निर्माण होणारे स्रावांचे प्रमाण ठरवत असते. या ऊर्जेद्वारे शरीराची विविध कार्ये घडून येतात. या ग्रंथीचे कार्य जेव्हा काही कारणाने कमी होते, (हायपोथायरॉइडिझम) तेव्हा थकवा येतो. यासाठी रक्त तपासणी करून घेता येते. योग्य औषध योजना (डॉक्टरांकडून), व्यायाम व सकारात्मक दृष्टिकोन असणे गैरजेचे असते. स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात.

कॅफेन

चहा, कॉफी, कोकसदृश पेय घेतल्यावर कॅफेनचे दुष्परिणाम जाणवू लागतात. थोडय़ा प्रमाणात कॅफेन उत्तेजक असले तरी अतिरेकाने मात्र झोप न येणे, छातीत धडधडणे, अस्वस्थ होणे आणि मग थकल्यासारखे वाटणे ही लक्षणे निर्माण होतात. हे कारण अनेकदा थकण्याच्या संदर्भात दुर्लक्षित राहते.

*   हळूहळू करीत प्रमाण कमी करावे. एकदम बंद केल्यास इतर त्रास उद्भवतात.

हृदयरोग

साफसफाई, खरेदी, जिने चढणे अशा लहानसहान गोष्टींनी दम लागतो. या क्रिया करताना हृदयावर रक्ताभिसरणाचा येणारा अधिकचा ताण सहन होत नाही. हाता-पायांपेक्षा महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा केला जातो. यामुळे थकवा जाणवतो. कामे पूर्ण करण्याच्या हट्टापायी स्त्रियांकडे दुर्लक्ष करतात आणि अंगावर काढतात.

*    लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

*   नियमित व्यायाम करणे आणि जंकफूड, तेलकट पदार्थाचा मोह आवरणे गैरजेचे असते.

*   आहारात सुकामेवा, दालचिनी पूड, लसूण, काळ्या मनुका, आले, जवस, टोमॅटो, संत्रे, पालक इत्यादींचा समावेश करावा. ‘ब’ आणि ‘क’-जीवनसत्त्वयुक्त पदार्थ तसेच तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढवावे.

आहार

पुरेसा आहार न घेणे किंवा सकस आहार नसल्यानेही थकवा येतो. चौरस आहार घेणे धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शक्य होत नाही. जंकफूड, गोड पदार्थ, तेलकट पदार्थ वेळी-अवेळी खाणे, तंतुमय पदार्थ आणि सत्त्वांचा अभाव असणारे पदार्थ खाणे यांमुळे थकवा येतो. काही पदार्थ खाल्ल्यावर शरीरात साखर लगेच वाढते आणि थोडय़ा वेळात साखरेची पातळी एकदम कमी होऊन थकवा जाणवतो, झोप येते. काही पदार्थाची अ‍ॅलर्जी असते. ते पचनास त्रासदायक होतात आणि त्यामुळे थकवा जाणवतो. बी-१२ जीवनसत्त्वाची कमतरताही थकवा निर्माण करते.

*   आहारात सर्व भाज्या आलटूनपालटून असाव्यात. उदा. फळभाज्या, शेंगभाज्या, पालेभाज्या

*   पुरेशी व उत्तम प्रथिने – डाळी, उसळी, अंडी, शेंगदाणे, चिकन, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी

*   तीळ + जवस + खोबरे + कढीपत्ता यांची चटणी रोज खावी.

*   पुरेसे पाणी प्यावे.

इतर कारणे : औषधांच्या दुष्परिणाम स्वरूपी, अपघातात, मोठय़ा आजारात (डेंग्यू, टायफॉइड, उलटय़ा-जुलाब इत्यादी) स्त्रियांना पाळीच्या अतिरक्तस्रावामुळे, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, नैराश्यामुळे अनेक कारणांनी थकवा येऊ  शकतो.

dr.sanjeevani@gmail.com