उन्हाळय़ात कितीही पाणी प्यायले तरी तहान भागत नाही. जेवढी थंड पेये पिऊ तेवढा घशाचा शोष वाढतच जातो. त्यासाठी थंड पिण्याऐवजी कोणतेही कोमट किंवा गरम पेय घ्यावे. याशिवाय..
* साध्या पाण्यात लिंबाचे, आवळय़ाचे, कोकमाचे, वाळय़ाचे सरबत किंवा कैरीचे पन्हे चालेल. फक्त या सर्वामध्ये थोडा आल्याचा वापर करावा.
* शहाळय़ाचे पाणी किंवा धने-जिरे व खडीसाखर यांचे पाणी चालेल. आले-लिंबू घातलेला पण बर्फाशिवाय उसाचा रस चालेल.
* घसा खूप सुकत असेल तर खडीसाखर किंवा गूळ चघळून वर पाणी प्यावे किंवा साध्या थंड दुधात घरचे लोणी विरघळवून प्यावे.
* दुधाचा मसाला घालून थंड दूध किंवा धने-जिऱ्याची पावडर टाकून ताक प्यावे.
* सायीसकट दूध + आंब्याचा रस + खडीसाखर + वेलची पूड मिक्सरमध्ये एकत्र करून ते फ्रीजमध्ये न ठेवता प्यावे.
* सर्दी-खोकला, दमा नसलेल्यांनी किंवा सहा वर्षांखालील मुलांनी सोडून, समोर काढून दिलेल्या ताज्या फळांचा, बर्फ न घालता रस घ्यावा.
* उन्हाळय़ातील तहान भागविण्यासाठी मातीच्या भांडय़ातील (माठातील) पाणी केव्हाही चांगले!
– वैद्य राजीव कानिटकर

मोजमाप आरोग्याचे : राज्यातील आरोग्य संस्था
आरोग्य संस्थेचा प्रकार संख्या
* उपकेंद्रे १०,५८०
* फिरती आरोग्य पथके १३
* प्राथमिक आरोग्य केंद्रे १,८११
* ग्रामीण रुग्णालये (३० खाटा) ३६०
क्षमतेनुसार उपजिल्हा रुग्णालये
अ) ५० खाटा ५८
ब) १०० खाटा २८
* सामान्य रुग्णालये ४
* अस्थिरोग रुग्णालये १
* जिल्हा रुग्णालये २३
* सुपर स्पेशालिटी रुग्णालये २
* मनोरुग्णालये ४
* स्त्री रुग्णालये ११
* क्षयरोग रुग्णालये ४
* कुष्ठरोग रुग्णालये ४
* आरोग्य व कुटुंब कल्याण
प्रशिक्षण संस्था
(स्रोत : आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य.)