वाढत्या उकाडय़ाने अगदी अंगाची लाहीलाही होत आहे. निथळणाऱ्या घामाच्या धारांमुळे सारेच त्रस्त आहेत. घाम हा सर्वानाच येतो, काहींना कमी, काहींना जास्त. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम येत असला तरी अतिरिक्त घाम येणे किंवा घामच न येणे हे आरोग्यासाठी बाधक आहे.

घामामुळे त्वचेचे विविध विकारही उद्भवतात. त्यामुळे शरीराची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

घाम का येतो?

उष्णतात नियमन : शरीराचे तापमान नियमित करण्यासाठी.

हाता-पायांच्या तळव्यांचा ओलावा, मऊपणा टिकवण्यासाठी.

विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकण्यासाठी : लहान मुलांमधील ‘अटोपिक डरम्याटायटिस’मध्ये घाम रोगप्रतिकारक शक्तीच्या रूपात महत्त्वाचे काम करतो, असे अलीकडील संशोधनात आढळले आहे.

विविध कारणांनी विविध जागी येणारा घाम –

सर्वागाला : उष्ण दमट वातावरणात व्यायामामुळे, पॅरासिटामॉलसारख्या औषधाने, ताप तसेच हायपर थायरॉइड, कर्करोग, मधुमेह, मणक्याची दुखणी यात सर्वागाला घाम आलेला आढळतो.

विविष्ट स्थानी येणारा घाम : नागीन, कानाभोवती, मेंदूला येणारी सूज यात विशिष्ट ठिकाणी घाम येतो.

विकार आणि उपाय

हातापायाच्या तळव्यांना येणारा घाम – हातापायाला येणाऱ्या घामाने कधी कधी लाजिरवाणे वाटते. लहानपणी किंवा कुमारवयात हे आढळून येते.

उपाय- अल्युमिनियम हाइड्रोक्लोराइट लोशन, बोटॉक्स इंजेक्शन

काखेत येणारा घाम –

१५ ते १८ वयोगटात साधारणपणे हे दिसून येते. यात विशिष्ट प्रकारची दरुगधी व सेकंडरी इन्फेक्शन (दुसऱ्यांदा होणारा संसर्ग) आढळते हे आनुवांशिकही असू शकते.

उपाय : अँटिफंगल पावडर किंवा बोटॉक्स इंजेक्शन

तिखट गरम जेवण टाळल्यास त्यामुळे येणारा घाम टाळता येऊ शकतो.

रात्री येणारा घाम : क्षय, कर्करोग, मधुमेह, रजोनिवृत्तीपूर्वीच्या व्यक्तींमध्ये रात्री घाम येण्याचे प्रमाण आढळते.

उपाय : अँटिकोलिनेर्जिक ड्रग्स जसे की अ‍ॅट्रोपीन अ‍ॅनालॉग्स, सिडेटिव्हज ट्रॅम्क्वीलायझरस, क्लोरिडाइन हायड्रोक्लोराइड, आयोन्टोफोरिसिस बोटॉक्स किंवा बोटुलियम टॉक्झिन सर्जरी.

हायपोहायड्रोसिस : हे फार क्वचितच आढळते. औषधांच्या सेवनामुळे घर्मग्रथींचे नुकसान होते आणि हा विकार होतो. कोरडी त्वचा असेल तरी हा विकार होतो.

उपाय : थंड पाण्याची बंडी डॉक्टर वापरायला सांगतात.

नायटा (फंगल इन्फेक्शन) : वाढते तापमान, दमट हवा यामुळे येणारा घाम व उष्णता त्यातून होणारे घर्षण यामुळे नायटाचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या युगात घट्ट जीन्स घालण्याचे प्रमाण वाढले आहे. ही विजार नायटा येण्यास कारणीभूत ठरते.

थोडक्यात घाम हे शरीरातील नैसर्गिक कार्य आहे. कधी कधी अतिघामाने त्रासदायक व लाजिरवाणे वाटते, तरी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन उपाय केल्यास उद्भवणाऱ्या समस्येवर मात करता येईल.

विविध शारीरिक प्रेरणांमधून घाम येतो, जसे की..

  • उष्णतामान : कमी-अधिक शारीरिक उष्णतेने चेहरा आणि शरीराला घाम येतो.
  • भावनिक बदल : भीती किंवा तणावाने मुख्यत: परीक्षेला जाणारे विद्यार्थी, प्रसंगाला सामोरे जाणारी व्यक्ती यांच्यी तळहाताला किंवा तळपायाला घाम सुटतो.
  • स्वादइंद्रिय : तिखट चमचमीत, गरम जेवताना बऱ्याचदा कपाळ, नाक व ओठाच्या जवळपास घाम येतो.

घामातील घटक :

सोडियम, पोटॅशियम, क्लोराइट, लॅक्टेट, युरिया, अमोनिया, अमायनो अ‍ॅसिड.

बाह्य़ त्वचा वृद्धी घटक : अनियंत्रित मधुमेहींमध्ये त्वचा संक्रमण आढळून येते.