सारिवायुगलं स्वादु स्निग्धं शुक्रकरं गुरू। अग्निमांद्यारूचिश्वासकासामविषनाशनम्।।

दोषन्नयास्त्र प्रदर ज्वरातिसार नाशनम्।

Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
Trimbakeshwar taluka, nashik district, water scarcity
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी टंचाईमुळे स्थिती बिकट
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

(भा. प्र.)

एकेकाळी भारतभर ‘सार्सापरिला’ याची औषधी विश्वात खूप चलती होती. याचे कारण भारतात सर्वत्र विविध त्वचाविकार, रक्तविकार, उष्णतेचे विकार यांमुळे बहुसंख्य प्रजेला पिडले जातेच. किमान दीडशे वर्षांपासून मध्य अमेरिकेतील जमैका द्वीपसमूहातून सर्वत्र अनंतमूळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुळीची निर्यात होत आहे. ही वेल सर्वत्र डोंगराळ प्रदेशात होते. कोकणात श्वेत सारिवा रानोमाळ बघावयास मिळते. याची वेल बारीक असते. जमिनीवर बोटभर लांबीची पाने असतात आणि जमिनीत खूप सुगंध असलेल्या बारीक मुळ्या असतात. याउलट आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये लाल वर्णाच्या बोटभर जाडीच्या तपकिरी रंगाच्या उपळसरीची मोठय़ा प्रमाणावर लागवड होते. कोकणातील पांढऱ्या उपळसरीसारख्या सुगंधी मुळ्या आंध्र प्रदेशात नसतात. उपळसरी जुनी झाली की ती नि:सत्त्व होते, वास गमावून बसते. त्यासाठी नेहमी ताजीच उपळसरी मुळे वापरावीत.

अनन्ता, उत्त्पलसारिवा, अनंतमूळ, उपरसाळ, दूधसाली, सुगंधिबल्ली अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या उपळसरीच्या मुळांमध्ये एक सुगंधी आणि वाफेबरोबर उडणारे द्रव्य आहे. या द्रव्यावर उपळसरीचे गुणधर्म अवलंबून असतात. म्हणून ती उकडू नये. हे द्रव्य मुळांच्या सालीत असते, आतल्या लाकडात नसते, म्हणून नेहमी बारीक मुळे शोधून विकत घ्यावीत. मुळे जाड असल्यास त्यांची फक्त साल वापरावी. उपळसरी मूत्रविरेचन, मूत्रविरजन, स्वेदजनन, क्षुधावर्धक, बल्य त्वग्दोषहर आणि रसायन आहे. हिचा मूत्रविरेचन धर्म फार स्पष्ट आणि उत्कृष्ट आहे. फांटाने लघवीचे प्रमाण तिप्पट, चौपट वाढते, तरी मूत्रपिंडास काही त्रास होत नाही. उपळसरीबरोबर गुळवेल, वाळा, चंदन अशी सुगंधी द्रव्ये वापरल्यास रक्तशुद्धी होऊन अनेक त्वचाविकारांवर मात करता येते. उपळसरीचे प्रमुख कार्य बारीक रक्तवाहिन्यांवर होते. उपदंश, गंडमाळा, तारुण्यपीटिका, त्वचेतील काळसरपणा, लघवीतून रक्त जाणे आणि कोडासारख्या खूप गंभीर समजल्या जाणाऱ्या रोगात उपळसरी चूर्ण दररोज सकाळी एक चमचा घेतल्याने खात्रीचा गुण मिळतो.

एका रुग्णमित्राच्या पावलाच्या वरच्या भागात, तळपायासारखा छोटा खड्डा पडला होता. त्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालय आणि वानवडीचे लष्करी रुग्णालय याांनी शस्त्रकर्माचा सल्ला दिला होता. शस्त्रकर्माला घाबरून हे गृहस्थ माझ्या काष्ठौषधीच्या दुकानात आले. फार विचारपूस न करता त्यांना बाहेरून लावण्याकरिता उपळसरी मुळीचा लेप आणि पोटात घेण्यासाठी उपळसरी चूर्ण घ्यावसाय सांगितले. अहो आश्चर्यम्! महिनाभरातच पावलाचा खड्डा भरून आला. ससूनमधील त्वचारोगतज्ज्ञांनाही आनंदमिश्रित धक्का बसला. मी या रुग्णाला शरीरातील रक्ताभिसरण सुधारावे आणि त्याच वेळी उष्णताही कमी व्हावी या उद्देशाने उपळसरीची ही विनामूल्ये चिकित्सा केली होती. कोणालाही कोडासारखे पांढरे चट्टे अंगावर दिसावयास लागले की त्याचे स्वास्थ्य कायमचे जाते. अशा व्यक्तीला उपळसरी चूर्ण सकाळी एक चमचा काही काळ दिल्यास कोडाचे डाग बऱ्याच प्रमाणात कमी होतात. तरुण मुला-मुलींच्या तारुण्यपीटिका, चेहरा आकर्षक नसणे ही वाढती समस्या आहे. त्यासाठी उपळसरी मुळीचा लेप बाहेरून लावावा आणि पोटातही याचे चूर्ण घ्यावे. माझ्या वापरात चंदनादिवटी, चंद्रकलारस, हेमांगीचूर्ण, चंदनबलालाक्षादि तेल आहे. यातील अनेक प्रमुख घटकद्रव्य उपळसरी आहे. सारिवाद्यासव हा काढा अनेक वैद्यांच्या वापरात आहे. त्यातील प्रमुख घटक उपळसरी आहे.