वैद्य विक्रांत जाधव

मूत्रकृच्छ म्हणजे लघवीला अडथळा, मूत्र प्रवृत्तीचा त्रास. लघवी कमी प्रमाणात होण्याचा त्रास अनेकांना उतार वयात आणि काहींना तरुण वयात होतो. या विकारात काय टाळावे हे आपण मागच्या लेखात पाहिले. अशा वेळेस नेमक्या पदार्थाचे सेवन केल्यास निश्चितच चिकित्सेला मदत करणारे ठरते. एवढेच नव्हे तर त्या व्याधींचे पुनरागमन टाळण्यात यश मिळते. थंड पाण्याचे सेवन लघवीचे प्रमाण वाढवण्यात मदत करते, तर धने, जिरे यांनी संस्कारित पाणी, खदिर/खैर साल पाण्यात टाकून उकळून गार केलेले पाणी निश्चितच लाभदायी ठरते. दुधाच्या पदार्थाचा उत्तम उपयोग लघवीच्या त्रासामध्ये होताना आढळतो.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

दही (घुसळलेले), ताक यामध्ये कोथिंबीर, धने-जिऱ्याची पूड, कढीपत्ता टाकून या व्यक्तींनी सेवन केल्यास अत्यंत गुणकारक ठरते. स्त्रियांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये लोण्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते. या व्यक्तींनी प्रकृती अभ्यास करून तुपाचे नियमित प्रमाणबद्ध सेवन केल्यास लघवीचा त्रास कमी होण्यास खूपच मदत होते. असंख्य व्यक्तींना ताकाचा उत्तम अनुभव असून हे रुग्ण एकमेकांना सल्लाही देताना आढळतात.

लघवीच्या त्रासामध्ये द्राक्ष, द्राक्षांचा रस व मनुक्यांचाही उत्तम फायदा होताना दिसतो. या व्यक्तींनी खूप प्रमाणात द्राक्ष खावीत. परंतु द्राक्ष सेवनानंतर त्यावर पाणी ताबडतोब न घेता काही काळाने घ्यावे. हाच नियम कलिंगडाच्या सेवनानंतर पाळावयाचा असून कलिंगड व त्याचा रस बिया काढून सेवन केल्यास उत्तम लाभ होतो. या रुग्णांनी ओल्या व वाळलेल्या खजुरांचे सेवन नियमित करावे. शरीरास बल प्राप्त होऊन लघवीचे प्रमाण वाढून मूत्रउत्पत्ती उत्तम होण्यास मदत होते. गर्भवतींना त्रास असताना खजूर व मनुक्याचे एकत्रित सेवन विशेष उपयुक्त ठरते. त्यामध्ये फालसा, आमसूलही टाकून सेवन करता येते. अत्यंत चवदार आणि भूक वाढवणारे हे पेय आहे.

काकडी लघवी जास्त करण्यास मदत करते. कोहळ्याचा रस लघवीचे प्रमाण वाढवून रुग्णाला शक्ती देतो, तर नारळाचे पाणी लघवी वाढवून रुची निर्माण करणारे ठरते. नारळाच्या पाण्यामध्ये आल्याचा रस व लिंबाचा रस टाकल्यास एकूणच गुण वृद्धी होते. कुळीथाच्या काढणाचा (वा पिठीचा) चांगलाच औषधी उपयोग होतो. कुळीथ मूत्रनिर्मितीच्या ठिकाणची विकृती कमी करण्यासही गुणकारक ठरते. या व्यक्तींनी मूग नियमित खावे. त्यातही हिरव्या मुगाचा लाभ अधिक प्रमाणात होताना दिसून येतो. पालेभाज्यांमध्ये तांदुळका, पडवळ व लाल माठ यांचे सेवन अत्यंत गुणकारी ठरणारे असून रक्तवृद्धीसाठीही या रुग्णांमध्ये उपरोक्त भाज्यांची मदत होताना आढळते.

माठाच्या इतर प्रकारांचाही उत्तम फायदा होतो तर मुळ्याच्या पानांचा चांगला लाभ होतो. या रुग्णांनी ‘मुळा’ नुसता आहारात धनेजिरे पूड टाकून सेवन करावा. मुळाच्या कंदाबरोबरच केळीच्या कंदाच्या भाजीचाही चांगलाच गुण येतो. म्हणून केळफुलाची भाजीही लाभकारक ठरताना दिसते. आले व आल्याचा रस उष्ण असूनही मूत्राचे प्रमाण वाढवणारे असून स्वयंपाकाव्यतिरिक्त केवळ आले आहारात असावे. ओल्या हळदीचा वापर या रुग्णांमधील आहारात नियमित केल्यास फायदा होतो. आल्याचे व ओल्या हळदीचे लोणचे खूपच गुणकारक ठरणारे असून बाराही महिने टिकून राहणारे व सहज सेवन करता येणारे आहे. मांसाहारामध्ये बोकडाचे व कोंबडीचे मांससेवन उपयुक्त ठरते.

आहार कसा असावा?

  • लघवीचे त्रास असणाऱ्या व्यक्तींनी गहू आणि सातूचा आहारात अधिक प्रमाणात उपयोग केल्यास लाभदायक ठरते.
  • लाल, जुना तांदूळ सेवन करावा. या तांदळाचे सूप धने, जिरे पूड टाकून घेतल्यास अधिक फायदा होताना दिसतो.
  • लघवीच्या त्रासामध्ये उसाचा चांगला लाभ होतो.
  • आहारात या रुग्णांनी कोथिंबिरीचे प्रमाण वाढवावे. सब्जा पाण्यात टाकून तेच पाणी दिवसभर सेवन करावे. त्रास कमी होण्यास मदत होते.
  • या रुग्णांनी चहामध्ये गवती चहा टाकून नियमित सेवन करावा. खूप प्रमाणात बरे वाटते. इतर चहामध्ये किंचित सूंठ टाकून घेतल्यास व्यक्तींना लाभ होतो.
  • गाईच्या दुधामध्ये ज्येष्ठमध टाकून सेवन केल्यास शक्ती येऊन लघवीचा दाहही कमी होण्यास मदत होते.
  • अळीव व खोबऱ्याचे लाडू या व्यक्तींनी नाश्त्याला सेवन केल्यास बळ तर वाढतेच, परंतु लघवीचे प्रमाणही वृद्धिंगत होते.
  • स्त्रियांमध्ये हा त्रास झाल्यास तळहात आणि तळपायाला तसेच डोक्याला मेंदी लावल्यास बरे वाटते.
  • दिवसभराच्या पाण्यात दुर्वा टाकून किंवा दुर्वाचा रस टाकून सेवन केल्यास चांगला फायदा होतो. याच पाण्यात चंदन टाकल्यासही बरे वाटते.
  • या त्रासाच्या रुग्णांनी वेलदोडे चावून खाल्ल्यास गुणकारी ठरते. किंबहुना जमेल तेथे वेलदोडे टाकावेत. फायदा संभवतो.
  • या रुग्णांनी गरम पाण्याने स्नान न करता थंड पाण्याने स्नान करावे. विशेषकरून गार पाण्याच्या टबमध्ये बसल्यास बरे वाटते. थंड पाण्याच्या घडय़ा पोटाच्या खालच्या भागात ठेवल्यास फायदा होताना दिसतो.