शीत पित्त
अंगावर पित्ताच्या गांधी उठणे, शरीरावर सूज येणे, तो भाग लाल व गरम होणे, अंगाला खूप कंड येणे म्हणजे शीत पित्त होय. त्यावरील काही उपाय..
’ खोबरेल तेलात कापूर घालून ते तेल चोळणे.
’ तूप पातळ करून त्यात मिरपूड घालून ते तूप चोळणे.
’ दिवाळीचे उटणे गरम दुधात मिश्रण करून ज्या शितपित्तामध्ये त्वचेची खूप आग होत असेल त्यावर चोळावे.
’ रक्तचंदन उगाळून त्यात कापूर घालून त्वचेवर चोळावे.
’ कोकम (आमसुले) पाण्यात कुसकरावी. त्या पाण्यात कापूर किंवा मिरपूड घालून ते पाणी पित्ताच्या गांधीवर चोळावे.
’ खोबरेल तेलात किंवा पातळ केलेल्या तुपात वेखंडाची पावडर घालून किंवा वेखंड व शंखजीरं पावडर एकत्र करून ते खाज येत असलेल्या भागावर चोळावे.
’ कडूनिंब व तुळशीच्या पानांचे चूर्ण किंवा ताजी पाने वाटून त्याचा रस चोळावा.
’ पोटात घेण्यासाठी गुलकंद, हळद घालून गरम दूध, पोट साफ होण्यासाठी त्रिफळाचूर्ण, आल्याचा रस, मध, कोरफडीचा रस, आवळा-कोकम सरबते यांचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याने करावा.
– वैद्य राजीव कानिटकर

मोजमाप आरोग्याचे
लसीकरणाचे प्रमाण
५८.५ टक्के : ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण
६७.४ टक्के : शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण :
१२६१.०१ कोटी : १९९५-९६ ते २०१५ पर्यंत बालकांचे लसीकरण

लसीकरण कार्यक्रमासाठी केंद्राचा निधी
२०१२-१३ २२१.७० कोटी
२०१३-१४ १८८.९१ कोटी
२०१४-१५ १८९.२६ कोटी

लसीकरणाचे भारतातील प्रमाण
बीसीजी ७३ टक्के
तिहेरी लस ६४ टक्के
पोलिओ ७० टक्के
गोवर ५६ टक्के

७१ टक्के : भारतात गरोदरपणात धनुर्वात लस मिळणाऱ्या महिलांचे प्रमाण.