लसीकरण म्हणजे शरीरातील विशिष्ट रोगजंतूंवर प्रक्रिया करून तयार केलेले द्रव्य टोचून प्रतिकारकशक्ती वाढवणे. ही क्रिया अगदी नवजात अर्भकापासूनच सुरू होते. अशा द्रव्यास लस म्हटले जाते. ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीला उत्तेजित करून आजाराविरुद्ध प्रतिबंधके तयार करू शकते. याचा कालावधी ठरावीकच असतो. संसर्गजन्य रोगांसाठी असे द्रव्य अत्यंत उपयोगी ठरते. स्त्रियांच्या जीवनात याचे किती महत्त्व आहे हे जाणून घेऊ.

स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर लसीकरणाच्या वेगवेगळ्या दिशांची माहिती करून घ्यायला हवी. अतिशय महत्त्वाचे म्हणजे गोवर, गालगुंड, रुबेला, पितज्वर या लस गर्भवती स्त्रियांनी कधीच घेऊ नयेत.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

धनुर्वाताची इंजेक्शन याने एक ते दोन वष्रे रोगप्रतिकारकशक्ती राहते. गरोदरपणी ही इंजेक्शन फक्त चौथ्या व पाचव्या महिन्यांत दिली जातात. पूर्वी तीन डोस होते ते आता दोनच देतात.

ह्यूमन पॅपिलोमा व्हॅक्सिन- योनीमार्गाचा रोगजंतुसंसर्ग वारंवार होऊन पांढरे पाणी जाण्याची समस्या असलेल्यांनी ही लस जरूर घ्यावे. तसेच आई, आजी यांना ग्रीवेचा कर्करोग झाला असेल तर त्यांनी सव्‍‌र्हायकल किंवा ह्यूमन पॅपिलोमा व्हॅक्सिनचे तीन डोस जरूर घ्यावेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून

२६ वर्षांपर्यंत घेतल्यास अधिक गुणकारी ठरते. परंतु काही वेळेस २६ वर्षांनंतरही घेतले जाते. गरोदरपणी हे दिले जात नाही. परंतु प्रसूतीनंतरच्या काळात घेतल्यास अपाय नसतो हे निदर्शनास आले आहे.

’ गोवर, गालगुंड, रुबेला व्हॅक्सिन १९५७ नंतर जन्म घेतलेल्यांनी ही लस घेतली पाहिजे. विशेषत: ज्यांना देशी-परदेशी प्रवास करावयाचा असतो त्यांनी घेणे आवश्यक आहे.

’ कांजण्या व तत्सम संसर्गजन्य रोग- याच्यासाठीही हल्ली लस तयार केली आहे. मात्र या लस घेतल्यावर प्रतिकारक्षमता केवळ चार आठवडय़ांपर्यंतच राहते.

’ इन्फ्ल्युएंझा व्हॅक्सिन- हल्ली फ्ल्यू व्हॅक्सिन म्हणून प्रसिद्ध झालेली ही लस प्रसूती असतानाही देता येते. त्याने तापाच्या साथीतही आपली रोगप्रतिकारकशक्ती व्यवस्थित राखली जाते.

’ न्यूमोकॉकल व्हॅक्सिन – श्वसनरोग वा यकृताचा आजार आहे वा ज्यांची प्लिहा काढून टाकली आहे अशा लोकांना हे उपयोगी आहे. प्लिहा काढून टाकणे गरजेचे असलेल्या लोकांना दोन आठवडे आधी ही लस देऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवता येते. तसेच रुग्णालयात, अतिदक्षता विभागात काम करणारा कर्मचारी वर्गासाठी ही लस उपयुक्त असून पुढील पाच वष्रे रोगप्रतिकारक

शक्ती राहते.

’ हेपॅटायटीस ‘ए’ – रक्तघटकांची कमतरता असल्यामुळे रक्तघटक बाहेरून दिले जातात, यकृताचे गंभीर आजार, पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये काम करणारे स्त्री-पुरुष, तसेच ज्यांची मुळातच गंभीर आजारामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली आहे तसेच लहान मुले यांना ही लस उपयोगी पडू शकते.

’ मेिनगोकॉकल व्हॅक्सिन –  ज्यांना परदेशी वारंवार जावे लागते वा प्लिहा शस्त्रक्रियेने काढून टाकली आहे. त्यांना हे रोगप्रतिकारकशक्ती कायम राखण्यास मदत करते.

हर्पिस झोस्टर –  ६० वष्रे वयांवरील सर्वासाठी असून एकच डोस पुरेसा ठरतो.

लसीकरण असे नानाविध कारणांसाठी केले जाते. हे करताना तज्ज्ञ डॉक्टरांकडून विचारणा करूनच घ्यावे. काही वेळेस ज्या पद्धतीने लसीकरण केले जाते त्याचा दुष्परिणाम म्हणजे पूर्ण अंगावर पुरळ येणे, ताप येणे, ती जागा सुजून येणे असे प्रकार घडू शकतात. काळजी घेऊन लसीकरण केले गेले तर त्याचा फायदाच अधिक होईल. संगणकावरील ज्ञानावर न जाता डॉक्टरांच्या अनुभवांवर अधिक विश्वास ठेवा.

डॉ. रश्मी फडणवीस – rashmifadnavis46@gmail.com