hlt03थंडीत वाढणारा आणखी एक रोग म्हणजे त्वचाविकार. थंडीत त्वचा कोरडी पडत असल्यामुळे अंगावरच्या कातडीवर खवले पडणे, ओठ फाटणे, डोक्यात कोंडा होणे, तळपायाला भेगा, एवढेच नव्हे तर सर्वाना माहीत असलेला सोरायसिस हासुद्धा या ऋतूत बळावतो. थंडीत त्वचेच्या रक्षणासाठी करावयाचे काही सर्वसामान्य उपचार..
* त्वचेला कायम स्निग्ध ठेवणे. यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा त्वचेला तेल, तूप (साधे किंवा औषधीयुक्त) याचे मॉलीश करून ते त्वचेत जिरवत रहावे.
* रोज अंगाला उटणे लावून अंघोळ करावी.
* त्वचा कोरडी पडत असल्यास केवळ थंडी आहे म्हणून डिंक, तीळ, अहाळीव, खोबरे, खजूर यांसारखे उष्ण पदार्थ खाणे टाळावे. याचबरोबर गोड, आंबट, खारट पदार्थाचा अतिरेक टाळावा.
* सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा कमी कपडय़ात घराबाहेर फिरू नये. शाल, मफलर, स्वेटर, कानात कापूस, संपूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावे.
* लक्षात ठेवून पाणी भरपूर प्यावे. गरम पाणी पिणे केव्हाही उत्तम.
* सर्वच त्वचा विकारांत रोजच्या रोज पोट साफ होते ना याकडेही लक्ष ठेवावे.