* भारतामध्ये ५० टक्के लोक गंभीर मानसिक आजारांच्या (एसएमडी) उपचारांकडे दुर्लक्ष करतात, तर ९० टक्के लोक सामान्य मानसिक आजारांच्या (सीएमडी) उपचारांकडे दुर्लक्ष करतात.
* भारतामध्ये सहा ते सात कोटी लोक मानसिक आजाराने (एसएमडी व सीएमडी) त्रस्त आहेत.
* देशभरात सरकारकडून चालविण्यात येणारी मानसिक आरोग्यासंदर्भातील रुग्णालये किंवा वैद्यकीय संस्था केवळ ४३ आहेत.
* वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्यासंदर्भातील विभाग २८९ आहे. त्यापैकी पदव्युत्तर शिक्षणासाठी ८५ विभाग आहेत.
* सरकारी मानसिक रुग्णालयांमध्ये केवळ ३०,००० खाटा उपलब्ध आहेत.
* देशभरात ११,५०० मानसिक विकारतज्ज्ञांची आवश्यकता असताना केवळ ३८०० तज्ज्ञ उपलब्ध आहेत. १७,२५० दवाखान्यांची आवश्यकता असताना ८९८ उपलब्ध आहेत.
* मानसिक आरोग्यासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची गरज २३,००० आहे, पण प्रत्यक्षात ८५० कार्यकर्ते कार्यरत आहेत, तर यासंदर्भातील परिचारिकांची संख्या केवळ १५०० आहे. प्रत्यक्ष गरज ३०००ची आहे.
* भारतात केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावरील खर्चात ०.०६ टक्के खर्च मानसिक आरोग्यावर केला जातो. अमेरिकेत हा खर्च ६.२ टक्के, तर ब्रिटनमध्ये १०.८२ टक्के आहे.

आयुर्मात्रा : त्वचारोगाविषयी
* थंडीत किंवा अन्य काही कारणांनी होणाऱ्या सर्वसाधारण त्वचारोगांविषयी आपण पुढील काही आठवडय़ांत माहिती घेऊ.
* खाज-खरूज, नायटा-गजकर्ण, गळवे-पुरळ, कुष्ठरोग-नारू हे सर्व रोग सूक्ष्म जीवजंतूंच्या संसर्गामुळे होतात. यातले बरेचसे आजार हे संसर्गाने वाढतात. या सर्व आजारांचा मूलभूत उपाय म्हणजे स्वच्छता!
* कोरडी त्वचा असणाऱ्यांनी तेलाचे मॉलिश करून आंघोळ करावी. साबण वापरू नये.
* तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आंघोळीच्या वेळी बेसन किंवा मसुराच्या डाळीच्या पीठाने आंघोळ करावी.
* वरील त्वचाविकारांमध्ये खाज कमी होण्यासाठी ‘करंज तेल’ किंवा ‘नीम तेला’मध्ये कापूर मिसळून त्वचारोगावर हलक्या हातांनी चोळावा.
* दूध-अंडे, दूध-मासे, दूध-फळे, दूध-खिचडी, मिठाईच्या पदार्थाबरोबर आंबट पदार्थ.. असे पदार्थ एकत्र करून खाऊ नये. आयुर्वेदात याला ‘विरुद्ध आहार’ असे म्हटले जाते. विरुद्ध आहाराने त्वचाविकार निर्माणही होतात आणि वाढतातही.
* ज्या विकारांमध्ये लस किंवा पाणी किंवा पू वाहतो अशा त्वचारोगांमध्ये मीठ व खारट पदार्थ वज्र्य करावे.
– वैद्य राजीव कानिटकर