30 October 2020

News Flash

आडवाटेवरची वारसास्थळे : कलाकारांचे गाव रघुराजपूर

जगन्नाथ मंदिराच्या इतिहासाशी निगडित आणि तेवढीच पुरातन अशी ही कला आहे.

जगन्नाथपुरी या ओदिशातील तीर्थक्षेत्रापासून अवघ्या १० किलोमीटरवर असलेले अत्यंत सुंदर ठिकाण म्हणजे रघुराजपूर. ओदिशा सरकारने या गावाला ऐतिहासिक वारसा ग्राम असा दर्जा दिलेला आहे. सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचे हे जन्मगाव. या गावात १२० घरे आहेत. गावातील सर्व मंडळी कलाकार. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी मंदिरांची एक रांग आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला घराच्या रांगा. शिल्पकार, चित्रकार, लाकडावर काम करणारे कारागीर, रंगकाम करणारे आणि पट्टचित्र हे खास ओदिशाचे वैशिष्टय़ असलेली कला जोपासणारे लोक गावात भेटतात. इथे सर्व घरांच्या बाह्य भागावर सुंदर चित्रे साकारण्यात आली आहेत. पाहताच क्षणी प्रेमात पडावे, असे हे गाव.

जगन्नाथ मंदिराच्या इतिहासाशी निगडित आणि तेवढीच पुरातन अशी ही कला आहे. इथे अगदी छोटी चित्रे काढण्यासाठी उंदरांच्या केसाचा ब्रश वापरला जातो. काही चित्रे अगदी हुबेहूब वारली चित्रासारखी दिसतात. साबुदाणा भिजवून त्याचा डिंक कापडाला लावून त्यावर रामायण, महाभारत आणि जगन्नाथाची चित्रे काढली जातात. चित्रांसाठी वापरण्यात येणारे सगळे रंग नैसर्गिक असतात. हिंगुळनामक दगडाची पावडर करून त्याचा लाल रंग तयार केला जातो आणि तो चित्रांसाठी वापरला जातो. तसेच निळय़ा रंगासाठी काही स्फटिक आणून ते दळून त्याची भुकटी केली जाते आणि त्यात पाणी घालून त्यांचा रंग तयार केला जातो. त्याचबरोबर हळद, समुद्राचा फेस, खडूची भुकटी, चिंचेचा डिंक, काजळ या वस्तू पट्टचित्र कलेमध्ये वापरल्या जातात. डॉ. जगन्नाथ महापात्रा यांनी जात्रीपटी ही अनोखी शैली विकसित केली आहे. या शैलीनुसार बरेचसे पट्टचित्राचे काम केले जाते.

आपल्याकडील दशावताराप्रमाणेच इथे गोट्टिपो नावाचा प्रकार आहे. गुरू मागुणीदास यांनी हा प्रकार इथे रूढ केला. इथे बरेच परदेशी कलाकार शिकायला येतात.

ashutosh.treks@gmail.com

आवाहन

वाचक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा वारसा असणारं मंदिर. कदाचित ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहीत नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.

ऑफबीट क्लिक : हल्लीच्या भटकंतीत, भटकंती कमी आणि छायाचित्रण अधिक असंच झालंय. पण त्यापलीकडे जाऊन काहीतरी अनोखं फ्रेममध्ये उतरवणारे असतातच. कधी ती फ्रेम अचानक मिळते, तर कधी बरीच प्रतीक्षा करावी लागते. असं एखादं छायाचित्र तुमच्याकडे असेल तर लगेच आम्हाला पाठवा.

भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात. अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता.

आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.

ई-मेल – lokbhramanti@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 4:34 am

Web Title: artists village raghurajpur
Next Stories
1 ट्रेकिंग गिअर्स : प्रस्तरारोहण
2 थोडीशी काळजी.. भरपूर आनंद!
3 दुचाकीवरून : सायकलवर बसून तर पाहा!
Just Now!
X