प्रयोगशील लोकांची जगात वानवा नाही. वेगवेगळे प्रयत्न करणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. मुख्य म्हणजे प्रयोगशील असण्यासाठी कुठल्याही पदवीची किंवा तुम्ही विशिष्ट गटातील असण्याची आवश्यकता नाही. हे प्रयोग केले जातात ते समस्यांवर मात करण्यासाठी किंवा गोष्टी सोप्या करण्यासाठी. अशाच अनेक प्रयोगशील लोकांनी कधी पोटापाण्यासाठी तर कधी समाजहितासाठी म्हणून सायकलच्या बाबतीतही अनेक प्रयोग केले. तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी अनेक जण सायकलचा वापर आपल्या व्यवसायासाठी मोठय़ा खुबीने करायचे. चाकूला धार काढणारा, गुलाबी रंगाचा खाण्याचा कापूस बनवणारा, फुगेवाला, पाववाला, पोस्टमन, आइसक्रीम कँडीवाला, मुंबईचा डबेवाला, दूधवाला, हॉटेल डिलिव्हरी अशा अनेक गोष्टींसाठी सायकलमध्ये आवश्यकतेनुसार बदल करून त्याचा यशस्वीरीत्या वापर केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. मात्र, ही प्रयोगशीलता एवढय़ावरच थांबत नाही. तर अनेकांनी पर्यावरणपूरक असलेली सायकल आणखी कशी फायदेशीर ठरेल आणि त्याच्या साहाय्याने काही गोष्टी अधिक सुकर करता येतील का, यासाठी संशोधन केले आणि ते आजही जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे.

क्रेग कॅल्फी हा अमेरिकेतील कॅलिफोíनयामध्ये राहणारा एक इंजिनीअर. कॅलिफोíनयामध्येच क्रेगचे सायकली बनवण्याचे वर्कशॉप आहे. या सायकलवेडय़ाचे वैशिष्टय़ म्हणजे क्रेग हा बांबूचा वापर करून सायकली बनवतो. साधारण वीस वर्षांपूर्वीच त्याने हा प्रयोग केला होता. मात्र, गोल बांबूच्या मध्यभागी चिरल्या जाण्याच्या अंगभूत गुणधर्मामुळे या सायकलीला मजबुती येत नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी क्रेग बांबूला धुरी देऊन ते तापवू लागला. त्यानंतर बांबूचे तुकडे एकमेकांस जोडण्यासाठी क्रेगने एक खास पद्धत विकसित केली. एपॉक्सी रेझिनने माखलेल्या अंबाडीच्या दोऱ्यांनी तो बांबूचे तुकडे एकमेकांस जोडतो. विशेष म्हणजे, कार्बन फायबर फ्रेमपेक्षा ही फ्रेम जास्त दणकट असल्याचा क्रेगचा दावा आहे. बांबूच्या फ्रेमची शक्कल चांगली असली तरी त्याच्या निर्मितीचा खर्च इतर फ्रेमच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे त्याचं आíथक गणित उलगडायला अजून थोडा वेळ लागेल असं दिसतंय. परंतु, पशाचा गुणाकार साधता आला तर ती मोठी क्रांती असेल हे नक्की. या प्रकल्पावर सध्या युगांडा, लायबेरिया, फिलिपाइन्स व न्यूझीलंड या देशांमध्येही काम सुरू आहे. क्रेगसोबतच स्लोवाकियामधील इंजिनीयर ब्रेनो मेअर्स, कॅलिफोíनयामधीलच निकोलस फ्रे आणि जर्मनीतला निकोलस मेयर ही मंडळीदेखील हरित सायकली बनवण्यात गुंतली आहेत. मुख्य म्हणजे भारतातही गोदरेज कंपनीने बांबूची सायकल तयार केली असून त्याची नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आली. दोन मराठमोळ्या सायकलस्वारांनी कन्याकुमारी ते खार्दुगला हा जवळपास साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास या सायकलवरून केला.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

बांबू सायकलच्या या प्रयोगासोबतच ऊर्जा निर्मितीसाठीही सायकलची कशी मदत होईल याबाबत डोकं लढवलं जात आहे. अमेरिकेतील एका संस्थेने लॅपटॉप आणि तत्सम उपकरणांच्या चाìजगसाठी सायकलच्या पेडलमध्ये विशेष बदल केले आहेत. या पॅडल पॉवरने फक्त वीजनिर्मितीच नव्हे, तर वॉटर पंिपग, अन्न दळणासारखी कामेसुद्धा करता येतील. मुंबई आयआयटीमधील एका तरुणानेही सौरऊर्जेवर चालणारी सायकल बनवली आहे. त्याने तामिळनाडूतील हुलीक्कल इंडिया या ई-बाईक कंपनीकडून सौर ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल तयार करून घेतली आहे. २१ गिअर्सच्या या सायकलला दोन चाकी ट्रेलर जोडण्यात आलेला आहे. त्यावर तीन किलो वजनाचे आणि २४० वॉटचे सौरऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहे. तसेच रिअर हबला (म्हणजे सायकलच्या मागच्या चाकाजवळ) २५० वॉट्सची मोटरही आहे. ४८वी लिथियम लॉन बॅटरीही लावण्यात आलेली आहे. सायकलवरील सौरऊर्जा पॅनलद्वारे दररोज दोन युनिट सौरऊर्जेची निर्मिती करता येते. ज्याचा उपयोग सायकलच्या बॅटरीसाठी होतो. अशाच प्रकारे प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी थायलंड येथील लाइटफॉग क्रिएटिव्ह अँड डिझाइन या कंपनीने शुद्ध हवा पुरवणाऱ्या सायकलचे आरेखन तयार केले आहे. पर्यावरणपूरक अशी ही सायकल अपारंपरिक ऊर्जेच्या साहाय्याने ऑक्सिजनची निर्मिती करणार आहे. लिथिअम आयन बॅटरीच्या ऊर्जेवर पाण्याचे विघटन करून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून ऑक्सिजन तयार केला जाईल. हा ऑक्सिजन सायकलच्या हँडलवर बसविलेल्या गाळण यंत्रणेतून बाहेरील गाळलेल्या हवेसह सायकल चालविणाऱ्या व्यक्तीला पुरवला जाईल. ही गाळण यंत्रणाही सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर चालणारी असेल, असा कंपनीचा दावा आहे.

प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com