‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असं म्हणून वृक्षांशी नातं जोडणाऱ्या वृक्षप्रेमींनी आपल्या हातांनी झाडं लावून वाढवली आणि आपल्या आसपास सुंदर पर्यावरण निर्माण केलं. यातून राखीव वनक्षेत्राची निर्मिती झाली. बोरगड संवर्धन राखीव हे असंच लोकसहभागातून उभं राहिलेलं वन. नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या बोरगड किल्ला समूहाच्या पोटात बोरगड संवर्धन क्षेत्र हे ३५० हेक्टरचं विस्तृतपणे पसरलं आहे. वन विभाग आणि नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या संस्थेच्या अविरत प्रयत्नांनी, लोकसहभागातून हा भाग घनदाट अरण्यात रूपांतरित झाला. झाडं आली की फुलं, पानं, पशू-पक्षी, फुलपाखरं आणि इतर वन्यजीवही आले. वनपर्यटकांची पावलंही आपोआप तिकडे वळू लागली. मोरापासून गवताळ प्रदेशातील पक्ष्यांपर्यंत साधारणत: ६० प्रकारचे पक्षी इथे बघायला मिळतात. शेजारी असलेल्या रामशेज किल्ल्याच्या कडय़ांमध्ये घर करून राहणारे गिधाड पक्षी, जे नामशेष होण्याच्या मार्गावर होते ते आता इथे पुन्हा नव्याने वास्तव्यास आलेले दिसून येतात. काळटोप कस्तूर हा विणीसाठी जोडीने येणारा स्थालांतरित पक्षी बोरगड राखीव वनात अधिवास करून राहताना दिसतो.

बोरगड क्षेत्रात कायमचा अधिवास असणाऱ्या पक्ष्यांत शृंगी घुबड, विशालकाय आकाराचा बोनोलीचा, गरुड, देव ससाणा, वेगवेगळ्या प्रकारच्या वटवटय़ा, विविध रंगांचा सातभाई, नारंगी डोक्याचा कस्तूर, पांढऱ्या पोटाचा अंगारक, पाहायला मिळतो. ऊंच उडणाऱ्या स्थालांतरित पक्ष्यांमधला अमूर ससाणा इथून जाताना आढळतो. स्थालांतरित छोटय़ा आकाराच्या वटवटय़ा पक्ष्यांच्या तीन-चार जाती इथे आहेत. यात मोठय़ा चोचीचा  पर्ण वटवटय़ा, साइक्स वटवटय़ा, काळटोप वटवटय़ा, टिकेलचा पर्ण वटवटय़ा दिसून येतो.

onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
AIMIM Pune, pune. lok sabha pune
पुण्यात एमआयएम कोणती भूमिका घेणार ?
what is ring of fire
यूपीएससी सूत्र : भूकंपप्रवण क्षेत्र असलेले ‘रिंग ऑफ फायर’ अन् कचाथीवू बेटाचा वादग्रस्त इतिहास, वाचा सविस्तर…

समृद्ध प्राणी आणि पक्षी जीवनाचा अधिवास असलेल्या या जंगलात जवळपास ७६ प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती आढळतात. बोरगड संवर्धन राखीव क्षेत्र हे भोरकडा या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं वन आहे. पायथ्याशी तुंगलदरा ही िदडोरी तालुक्यात येणारी वाडी आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीअंतर्गत येथे रहाडबंदी, चराई बंदीसारखे आदर्श उत्स्फूर्तपणे घातले गेले आहेत. स्थानिक लोकांमधून येथे वनसंरक्षक दलही सज्ज करण्यात आलं आहे. बोरगड डोंगरावर भारतीय हवाईदलाचे प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने माथ्यावर जाण्यास मनाई आहे. पण पायथ्याशी असलेल्या तुंगलदरा वाडीपासून खाली पसरलेल्या विस्तृत अशा बोरगड राखीव संवर्धन प्रकल्पाला आपण भेट देऊ शकतो. पावसाळ्यात हे वन हिरवकंच असतं तर उन्हाळ्यात त्यावर सोनेरी मुलामा चढतो. विविध ऋतूंत फुलणारी फुलं, गवताळ प्रदेश आणि बहरलेले डेरेदार वृक्ष आपल्याला साद घालत राहतात.

कसे जाल?

जवळचे विमानतळ : मुंबई</p>

जवळचे रेल्वे स्थानक : नाशिक रोड

नाशिक ते बोरगड अंतर १६ किलोमीटर

नाशिक ते तुंगलदरा अंतर १४ किलोमीटर

मुंबई ते बोरगड अंतर १९५ किलोमीटर

drsurekha.mulay@gmail.com