हिमाचलमधील एक शांत, निसर्गसंपन्न छोटेखानी गाव म्हणजे डलहौसी. रावी नदीच्या काठी २००० मीटर उंचीवर पाच टेकडय़ांवर चंबा खोऱ्यात हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. ब्रिटिश गव्हर्नर डलहौसी याने हे ठिकाण शोधून काढले. म्हणून ते आजही त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. ब्रिटिश स्थापत्यकलेचे नमुने आजही आपणास येथे बघायला मिळतात. तुरळक काही सुरेख चच्रेस, बंगले आपल्याला जुन्या स्वातंत्रपूर्व काळात घेऊन जातात. पाइन, देवदारचे वृक्ष डलहौसीच्या सौंदर्यात भर घालतात. रात्री आजूबाजूला टेकडय़ांच्या उतारावरून लुकलुकणारे दिवे बघितले की एवढी घरे सकाळी कुठे धुक्यात लुप्त होतात कळत नाही. आपल्या पाचगणीसारखी इथे अनेक प्रशस्त पब्लिक स्कूल आहेत.

डलहौसीमध्ये अतिशय दाट, उंच देवदारची झाडे थेट तुमच्या हॉटेलच्या बाल्कनीतून आत डोकावत असतात. झाडावरच्या खारूताई सतत अखंड कामाच्या गडबडीत असल्यासारखे इकडून तिकडे फिरत असताना बघण्यात मोठी गंमत असते. इथली माकडे तुमचे लक्ष नसेल तर खोलीत घुसून नुसता धुमाकूळ घालतात.

Dubai Floods Tesla boat-mode? Dubai hit by two years' worth of rain in a single day
Dubai Flood: दुबईच्या महापुरातही टेस्ला गाडीनं केली कमाल; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

डलहौसी आजूबाजूच्या पाच टेकडय़ांवर पसरलेले आहे. अगदी एका क्षणात धुके तर दुसऱ्या क्षणी हलका पाऊस, मधेच कुठून सुरेख इंद्रधनुष्य तर थोडय़ाच वेळात शुभ्र कापसाच्या मोठय़ा मोठय़ा ढगांनी आसमंत भरून जातो. आकाशाची निळाई तर नुसती पाहतच राहावी, अशी आहे. उंचावरून फक्त आकाशातील तो निळा रंग, धुके आणि हलका पाऊस अनुभवताना वेळ कसा जातो, हे कळतच नाही. जवळच खज्जार नावाचे खोरे आहे. इथे झाडांची दाट गर्दी आहे. डलहौसीपासून एका तासावर असलेले हे खोरे दिवसाच पाहावे. संध्याकाळी चार वाजल्यानंतर कुणीही इथे गाडी घेऊन येण्यास तयार होत नाही. कारण अचानक घाटीमध्ये इतके धुके पसरते की समोरचे काहीही दिसत नाही. चांगल्या मोठय़ा आरामदायी गाडीने प्रवास केला तर घाटाचा, प्रवासाचा अजिबात त्रास होत नाही. कारण हिमाचलमधल्या चंबा खोऱ्यात रस्ते फार सुरेख आहेत.

खज्जार हा प्रदेश म्हणजे बाजूने दाट झाडी व मध्ये विस्तीर्ण हिरव्यागार गवताचे कुरण. त्या भल्या मोठय़ा हिरव्या गालिच्यावर मग कुणी भुट्टा विकतो, कुणी फोटो काढून देत असतो. मग सुंदर गोजिरवाण्या पांढऱ्या शुभ्र सशांची जोडी घेऊन मागून एक छोटा मुलगा येतो. सशांसोबत २० रुपयांत फोटो काढण्याची विनवणी करतो. हे सगळे बघत बाजूच्या धाब्यावर गरम गरम दाल-तडका आणि तंदुरी रोटी कधी फस्त होऊन जाते कळतच नाही.

घोडेस्वारी करण्यासाठी ही उत्तम जागा. ज्यांना घोडेस्वारी आवडते त्यांनी इथे मनसोक्तपणे ती करावी. खज्जार इथे काही हेरिटेज हॉटेल्स आहेत. ती वर्षभर फुल असतात. थंडी अनुभवायला इथे जरूर भेट देऊ शकता. पठाणकोट हा जवळचा विमानतळ व रेल्वे स्टेशन आहे. कांगा खोऱ्यातदेखील एक विमानतळ आहे.

बरेच लोक वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन कत्राहून इथे आराम करण्यास येतात. कत्रा ते डलहौसी पाच तासांचा रस्ता आहे. पहाटे निघून दुपारच्या जेवणापर्यंत इथे पोहोचू शकतो. दिल्ली व हरयाणाहून अनेक बसेस नियमित इथे येतात. हौसेने पाहण्यासारखे डलहौसी नक्कीच शांत व सुंदर आहे.

सोनाली चितळे sonalischitale@gmail.com