साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान डेमोसेल क्रेन या स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे राजस्थानातील खिचन या गावी येतात. तेथे नेहमी दिसणाऱ्या पक्ष्यांसाठी धान्य टाकण्याची जागा कुडाघर म्हणून ओळखली जाते. तेथेच या पक्ष्यांचे थवेही उतरतात. अतिशय सावधपणे, भोवतालचा अंदाज घेत मगच हे थवे धान्य खाण्यासाठी जमिनीवर उतरतात.