News Flash

फेस्टिव्ह टुरिझम : राजस्थानचे महोत्सव

एक ते तीन डिसेंबर यादरम्यान कुंभालगड फेस्टिव्हल साजरा होत आहे.

राजस्थानातील पाली या जिल्ह्यत रांकापूर येथे साजरा होणारा रांकापूर महोत्सव हा राजस्थान पर्यटन विभागातर्फे २१ डिसेंबरला होणार आहे.

गुलाबी थंडीत राजस्थानातील भटकंतीची मजा काही औरच असते. याच काळात येथे कुंभालगड फेस्टिव्हल, विंटर फेस्टिव्हल, कॅमल फेस्टिव्हल असे अनेक उत्सव होत असतात.

एक ते तीन डिसेंबर यादरम्यान कुंभालगड फेस्टिव्हल साजरा होत आहे. अरवली पर्वतराजीत काहीसा उत्तरेला असलेल्या उदयपूर येथे कुंभालगड हा किल्ला या महोत्सवासाठी सजलेला असतो. राजस्थान पर्यटन विभागातर्फे हा तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो, ज्याद्वारे राजस्थानचा सांस्कृतिक वारसा मांडला जातो. दिवसा आणि रात्री विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव साकारला जातो. असंख्य दिव्यांची आरास, रंगीबेरंगी कपडय़ांनी नटलेले स्थानिक आणि त्यांनी सादर केलेली कला हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणावे लागेल. उदयपूर हे जवळचे विमानतळ असून राजस्थान पर्यटन विभागाच्या फेसबुक पेजवर अधिक माहिती मिळू शकते.

१६ आणि १७ डिसेंबर या दोन दिवसांत पुष्कर येथे पवित्र संगीत महोत्सव हे पुष्करचे नवीन आकर्षण आहे. पारंपरिक संगीत, गायन, नृत्य आणि भक्ती गीतांचा आनंद या दोन दिवसांत अजमेर आणि पुष्कर या दोन ठिकाणी घेता येईल.

राजस्थानातील पाली या जिल्ह्यत रांकापूर येथे साजरा होणारा रांकापूर महोत्सव हा राजस्थान पर्यटन विभागातर्फे २१ डिसेंबरला होणार आहे. राजस्थानी कला व संस्कृतीचा अनोखा उत्सव असे याचे वर्णन करता येईल. जगभरातील पर्यटकांना राजस्थानची अनोखी ओळख याद्वारे करून दिली जाते.

वर्ष अखेरीस साजरा होणारा माऊंट अबू येथील विंटर फेस्टिव्हल  म्हणजे राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणीच म्हणावा लागेल. २९-३० डिसेंबरला होणारा हा महोत्सव राजस्थानाची कला, संस्कृती, खाद्यजीवन, साहित्य अशा अनेक घटकांना स्पर्श करतो. कवी संमेलन, खाद्यपदार्थाचे विशेष स्टॉल्स, तलावात सोडलेले अनेक दिवे आणि शोभेच्या दारूची रोषणाई असं सारं वातावरण अत्यंत रोमांचकारी असते. उदयपूर हे जवळचे विमानतळ असून ते १७५ किलोमीटरवर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2017 12:08 am

Web Title: famous fairs and festival of rajasthan
Next Stories
1 भूतानचे पक्षीवैभव
2 वन पर्यटन : गुरेघर वनसंशोधन केंद्र
3 जायचं, पण कुठं? : पाचगणी
Just Now!
X