News Flash

वर्षां भटकंती

मुख्य गुहेच्या प्रवेश द्वारावर गणेश पट्टी कोरलेली आहे.

थिटबी / कळू धबधबा

माळशेज घाटातून दिसणारा, हरिश्चंद्र गडाच्या पोटातून कोकणात कोसळणारा प्रचंड प्रपात म्हणजेच कळू धबधबा होय. कोकणातील थिटबी गावातून साधारण तासाभराच्या चालीने या धबधब्याच्या तळाशी जाता येते. माळशेज घाटाच्या पायथ्याच्या सावर्णे गावा शेजारून डावीकडे (मुंबईहून नगरकडे जाताना) वळणाऱ्या छोटय़ा सडकेने ३ किलोमीटर अंतर पार करून थिटबी गावात पोहोचावे. धबधब्याच्या नजीक जाताच लक्षात येते की जमिनीपर्यंत पोहोचायला या प्रपाताला तीन टप्प्यात उडय़ा घ्याव्या लागतात. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्याच्या थेट खालपर्यंत जाता येत नसले तरी तीन टप्प्यात कोसळणारा हा प्रचंड झोत, आजूबाजूचे हिरवेखच जंगल आणि त्यातून उसळून वाहणारा याचा प्रवाह हा सगळाच देखावा मंत्र मुग्ध करून जातो.
गणपती गडद

सोनावळ्याची लेणी अथवा गडदची लेणी या नावानेही प्रसिद्ध असलेली ही लेणी मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावानजीकच्या डोंगरात आढळतात. मुंबई-मुरबाड-धसई-पळू/सोनावळे असा साधारण ११० किलोमीटरचा प्रवास करून सोनावळ्यात पोहोचायचे. गावापासून सुरू होणारी ठळक पायवाट आहिस्ते आहिस्ते चढत साधारण पाउण तासात आपल्याला लेण्यानपाशी नेऊन सोडते. इतर छोटय़ा मोठय़ा कक्षांच्या शृंखलेतील सर्वात मोठय़ा गुंफेत गणपतीचे शिल्प असल्यामुळे याला गणपती गडद असे नाम प्राप्त झाले. मुख्य गुहेच्या प्रवेश द्वारावर गणेश पट्टी कोरलेली आहे. छताचा भार सांभाळणाऱ्या खांबांवरही थोडे नक्षीकाम पाहायला मिळते. लेण्याच्या शेजारी पाण्याची टाकी खोदलेली आहेत. पावसाळ्यात मुख्य लेण्याच्या दारात मोठा प्रपात कोसळत असतो. हिरवळ, जंगल, धबधबा, सोपा रस्ता अशा घटकांमुळे पावसाळी भटकंतीसाठी गणपती गडद हा एक उत्तम पर्याय आहे.

patel.priti.28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2016 6:07 am

Web Title: famous monsoon trekking
Next Stories
1 ऑफबीट क्लिक
2 लडाखमधील खरेदी
3 दुचाकीवरून : टूर-डी-फ्रान्स
Just Now!
X