18 November 2017

News Flash

सायकल डायरी : ‘दो पहिया’ चित्रपट महोत्सव

फिल्मशी संबंधितांशी उपस्थितांना संवाददेखील साधता येईल.

Updated: May 17, 2017 2:28 AM

 

मुंबईमध्ये शनिवार, २७ मे रोजी पहिला सायकल फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सायकिलगशी निगडित फिल्म एकत्रितरीत्या पाहण्याची संधी पहिल्यांदाच उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमात या

फिल्मशी संबंधितांशी उपस्थितांना संवाददेखील साधता येईल. हौशी सायकलस्वारांनी तयार केलेल्या फिल्मदेखील या फेस्टिव्हलमध्ये दाखवण्याची संधी मिळणार आहे. शहर, महानगर, निमशहर, ग्रामीण भाग, डोंगर-दऱ्या, देश-विदेश कुठेही तुम्ही सायकलवरून भटकंती करतानाचा आनंद, साहस, समाधान, आव्हानं, अडचणी असं सारं जर तुम्ही चित्रित केलं असेल त्याची संकलित अशी छोटी चित्रफीत (तीन ते पाच मिनिटे कालावधीची) तुम्ही या फेस्टिव्हलसाठी पाठवू शकता. त्या संदर्भात dopahiyafilmfestival@gmail.com या मेलवर आयोजकांशी संपर्क साधता येईल. २७ मे रोजी हा फेस्टिवल ‘द लिटिल हाऊस’, समीर अपार्टमेंटच्या समोर, मंदिर मस्जिद गल्ली, यारी रोड, वर्सोवा, मुंबई येथे होणार आहे. फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८१६९४ ५६११३ किंवा ९८९२९ ४२६२८.

First Published on May 17, 2017 2:28 am

Web Title: first cycle film festival