वस्तू जितकी लहान तितकी ती स्मार्ट, असं जणू समीकरणच झालं आहे सध्या. तळहातावर विसावलेला स्मार्टफोनच आता कैक मोठय़ा उपकरणांचे काम करू लागला आहे. म्हणूनच की काय मजबूत आणि आडदांड दिसणाऱ्या घोडा सायकली आता नकोशा वाटतात.

अनेक वेळा सार्वजनिक किंवा खासगी वाहनांमधून मोठय़ा सायकली नेता येत नाहीत किंवा परवानगी नसते अशा वेळी या दुमडणाऱ्या सायकलींना सहज परवानगी दिली जाते.  सार्वजनिक किंवा खासगी वाहन, विमान, बोट अशा कुठल्याही वाहतुकीच्या साधनाने सायकल घेऊन प्रवास करणं सुलभ होण्यासाठी दुमडणारी सायकल चांगला पर्याय ठरू शकतो. सामान्य सायकलप्रमाणे या सायकलमध्येही दुमडण्याचे प्रकार, वजन, वेग आणि किंमत या गोष्टींमध्येही फरक आहे. खरंतर सामान्य सायकलच्या तुलनेत या सायकलच्या बांधणीमध्ये कुशलता आहे. कारण सायकल दुमडणे आणि दुमडलेली सायकल सोप्या पद्धतीने उघडून काही क्षणात चालवण्यासाठी सज्ज व्हावी लागते.

Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
Facebook Update video player In vertical full screen That Offers alongside video playback controls
फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! आता एक्सवर येणार ‘ॲडल्ट कन्टेन्ट ग्रुप’; जाणून घ्या सविस्तर…

आपल्याला बऱ्याचदा दुमडायची सायकल हे आधुनिक प्रकरण वाटतं. परंतु, फ्रेंच लष्करामध्ये अठराव्या शतकात ‘सायकल दल’ होतं. मिकाइल पेडरसेन या डॅनिश संशोधकाने दुमडणाऱ्या सायकलचा शोध लावला आणि इंग्लंडमधील डर्सले शहरात या सायकलची निर्मिती झाली. विशेष म्हणजे १८९० मध्येच त्याने इग्लंडमध्ये या सायकलचं पेटंट घेऊन सायकलचा पहिला सांगाडा हा लाकडाचा केला होता. त्यानंतर त्याने ‘पेडरसेन सायकल कंपनी’ची स्थापना करून इतर उत्पादकांनाही ती तयार करण्याचे हक्क दिले. त्यातून १९२० पर्यंत जवळपास ३० हजार सायकलींची निर्मिती केली गेली. दुसऱ्या महायुद्धातही ब्रिटिश लष्कराकडून ‘एअरबस बीएसए’ या दुमडणाऱ्या सायकलींचा वापर झाला होता.

दुमडणाऱ्या सायकलला त्रिकोणी फ्रेम नसून (काही अपवाद वगळता) दोन चाके सर्वसाधारणपणे एका दांडय़ाने जोडलेली असते. ही दांडी साधारण सायकलच्या तुलनेने जाड असून ती जमिनीपासून कमी उंचीवर असते आणि याच दांडीला असलेल्या दुमडण्याच्या सुविधेमुळे सायकल मधोमध दुमडली जाते.

सध्या दुमडणाऱ्या सायकल महाग आहेत. तसंच भारतीय रस्त्यांचा दर्जा पाहता दुमडणाऱ्या सायकल खड्डेयुक्त रस्त्यांवर किती वेगात पळू शकतील हीदेखील एक शंकाच आहे. युरोप किंवा अमेरिकेत दैनंदिन वापरासाठी सायकल चालवणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे तेथे त्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो व त्या सहज उपलब्धही आहेत. भारतात सध्या तशी परिस्थिती नाही. गावं सोडा, पण शहरातही नाहीच नाही.

दुमडणाऱ्या सायकलचे प्रकार

अर्धी किंवा मधोमध दुमडणारी सायकल – सीटखाली असलेली तारेने जोडलेली एक कळ सैल करून ही सायकल मधल्या दांडय़ातून दुमडता येते. समोरचे हँडल हे मुख्य फ्रेमला दांडीच्या साहाय्याने जोडलेले असते. ती दांडी दुमडून खाली मागच्या बाजूला वळवून सायकलच्या टायरच्या बाजूला नेऊन हँडल लॉक करता येते.

उभी दुमडणारी सायकल – मधोमध दुमडणाऱ्या सायकलच्या तुलनेत ही सायकल लहान आणि वजनाला हलकी असते. यामध्ये मधली दांडी ही बाजूला न दुमडता खालच्या बाजूला दुमडली जाऊन पुढचा टायर मागच्या टायरच्या बाजूला येऊन स्थिरावतो. हँडललासुद्धा दुमडण्याची सोय असल्याने तेदेखील टायरच्या बाजूला लॉक करता येते. त्यानंतर सीटची उंची कमी करता येते. या सायकलचे पेडल वेगळे करून त्यांना सायकलच्या फ्रेमलाच मागच्या बाजूला लावण्याची सोय करण्यात आलेली असते.

त्रिकोणी बिजागराची सायकल – या सायकलही मधोमध दुमडल्या जात असल्या तरी अनेकदा या सायकलच्या जोडणीकरिता कडय़ा असतात.

मॅग्नेट फोल्डिंग आणि सस्पेंशन सिस्टम – या सायकलमध्ये मधल्या दांडय़ाजवळ नव्हे तर मागचा टायर आणि मुख्य फ्रेमला जोडणाऱ्या दांडय़ामध्ये असलेल्या मॅग्नेटद्वारे ही सायकल जोडलेली असते. हेच मॅग्नेट, सस्पेंशनचंही काम करतं. सायकल मधल्या फ्रेममधून दुमडता येत नसल्याने इतर दुमडणाऱ्या सायकलच्या तुलनेत याची घडी मोठी दिसते.

ब्रेक अवे आणि इतर स्टाइल – या सायकल अध्र्या फोल्ड होऊन त्याचे काही भाग (टायर, पेडल, सीट) पूर्णपणे वेगळे करता येतात. रोड, माउंटन आणि हायब्रीड सायकलींचाही यामध्ये समावेश करता येऊ  शकतो.

prashant.nanaware@expressindia.com