थेट आकाशातच दोन हॉट एअर बलूनना बांधलेल्या दोरावरून चालत जाणारा साहसवीर, सागराच्या प्रचंड लाटांवर स्वार होत केलंलं सìफग, दोहो बाजूंनी कातळकडे असणाऱ्या एडन नदीच्या वेगवान प्रवाहात झेललेलं रािफ्टगचं आवाहन, दऱ्याखोऱ्यात डोंगरांवर केलेली सायकल भटकंती, बर्फाच्या उभ्या भिंतीवरचे आरोहण आणि सरळसोट कातळकडय़ावरून सायकलवर बसून केलेले पॅराग्लायिडग असा सारा साहसाचा भन्नाट थरार अनुभवायचा असेल तर टेल्युराइड माऊंटन फिल्म फेस्टिव्हल ही आपल्यासाठी खास संधी आहे. काहीशा अत्रंगी म्हणाव्या अशा साहसपटांचा टेल्युराईड फिल्म फेस्टिव्हलमधील निवडक चित्रपट दरवर्षी जगभरात दाखवण्यासाठी निवडले जातात. त्यापैकी नऊ साहसपट मुंबईत २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० ते ९.४५ या वेळेत प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे दाखवण्यात येणार आहेत.

हिमालयन क्लबच्या वतीने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. साहसपटांचा अनुभव घेण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल. संपर्क – ०२२ – २४९१२८२९.

नेचर लव्हर्सतर्फे ३९ वे निसर्ग साहस शिबीर

मुंबईतली ४१ वर्षे जुन्या अशा नेचर लव्हर्स या गिर्यारोहण संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही खास लहान मुलांसाठीच्या निसर्ग साहस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५ मे ते ८ मे या काळात कोलाड परिसरात होणारे हे शिबीर ८ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी  प्रवेश देण्यात येईल. पूर्वनोंदणी आवश्यक.  संपर्क – ९८२१३४२७०२, ९३२१५१३०७०.