तंबूचे भाग
आऊटर : दोन कनाती असलेल्या तंबूमध्ये (टेंट) इनर आणि आऊटर असे भाग असतात. आऊटरचा वापर इनर सुरक्षित राहावे म्हणून होतो. आऊटर हे जलरोधक असते. आऊटर लावताना ते इनरपासून वर लावले जाते. ते चिकटलेले राहिल्यास इनर ओले होऊन टेंटमध्ये पाणी येऊ शकते.
इनर : दुहेरी कनात असलेल्या टेंटमध्ये इनर हा वेगळा भाग असतो. तो जलरोधक असतोच असे नाही. त्यामुळे त्यावर आऊटर लावले जाते. ते जलरोधक असते. एकेरी कनात असलेले टेंट हे थ्री सीजन असल्यास जलरोधक असतात.
एक्स्टेंशन : टेंटच्या प्रवेशभागाकडे पुढे छतासारखा भाग काढलेला असतो. त्याचा उपयोग जेवण बनविणे, बूट, सॅक ठेवण्यासाठी केला जातो.
ग्राऊंड शीट : टेंट लावण्यासाठी जाड प्लॅस्टिक शीट जमिनीवर अंथरली जाते. टेंटला असलेली ग्राऊंडशीट खराब होऊ नये तसेच ओली होऊ नये म्हणून त्याचा उपयोग केला जातो.
पोल : तंबू पोलच्या साहाय्याने उभा केला जातो. पोल हे फायबरग्लास किंवा धातूपासून तयार केले जातात.
टेंट पेग : हवेने टेंट उडू नये म्हणून ते पेगच्या साहाय्याने जमिनीला दोरीने बांधले जातात. पेग प्लॅस्टिक किंवा धातूचे असतात.
स्टफ सॅक (Stuff Sack: प्रवासादरम्यान टेंट सुरक्षित राहावा म्हणून स्टफ सॅकचा वापर होतो. स्टफ सॅकमध्ये इनर, आऊटर व पोल व पेग वेगवेगळे पॅक करावेत.
तंबूची काळजी
टेंट उभारण्याच्या पद्धतीचा सराव करावा. यामुळे अंधारात किंवा पावसाच्या माऱ्यात तो उभारताना त्याचे फॅब्रिक, पोल यांना नुकसान होणार नाही.
* व्यवस्थित कोरडा करून टेंट पॅक करावा.
* टेंट ठेवण्यासाठी स्टफ सॅकचा वापर करावा.
* टेंटचा वापर झाल्यानंतर स्वच्छ करावा.
* झिपला माती लागणार नाही किंवा त्यावर जड सामान पडणार नाही याची काळजी घ्यावी.
* जेवणाचे पदार्थ टेंटमध्ये ठेवू नयेत. ते आत ठेवल्यास त्याकडे प्राणी आकर्षित होऊन टेंट फाडण्याची शक्यता असते.
मेणबत्ती, लायटर यांसारख्या वस्तू आत पेटवू नयेत.
* टेंट लावण्याआधी जमीन साफ करावी. दगड, लाकडांचे तुकडे किंवा झुडपांचे टोकदार बुंधे काढून टाकावेत.
ashok19patil65@gmail.com