इंडोनेशियाचा विस्तार प्रचंड आहे. अर्थातच विविधतादेखील. बांडुग हे त्यांचं हिल स्टेशन. फार उंच नाही. पण ज्वालामुखीचे विवर आणि विवराकाठच्या समृद्ध संस्कृतीची अनुभूती घेण्यासाठी तेथे भेट द्यायला हवी.

एक हिल स्टेशन म्हणून असायला हव्या अशा सर्व सुविधा बांडुग येथे आहेत. पण केवळ हिल स्टेशन म्हणून तेथे जायचं का? तर नाही. तशी आपल्याकडे भरपूर हिल स्टेशन्स आहेत. पण इंडोनेशियातील बांडुग येथे जायचे ते तेथील डोंगरात दडलेल्या ज्वालामुखीच्या विवरासाठी. हे येथील खास वैशिष्टय़.

economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..

जगात काही ठरावीक ठिकाणीच अशी नसíगक रचना असणारी विवरं आढळतात. इंडोनेशियात ती भरपूर आहेत. एका आकडेवारीनुसार इंडोनेशियात जिवंत वा मृत ज्वालामुखीची १२७ विवरं आहेत. एके काळी ज्वालामुखीने या देशात अनेक उलथापालथी केल्या आहेत. प्रांतच्या प्रांत उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातून ही विवरं तयार झाली. मात्र या देशाने त्यांचादेखील पर्यटनामध्ये अगदी खुबीने वापर केला आहे. बांडुगपासून ३० किमीवर असणाऱ्या तांकुबन पराहू डोंगररांगेत उंचच उंच पाइन वृक्षांमधून विवरापर्यंत जाणारा व्यवस्थित रस्ता तयार करण्यात आल्याने या रस्त्याने प्रवास करत आपण संरक्षित अभयारण्याच्या हद्दीत प्रवेश करतो. वाटेत एका वाहनतळावर सर्व जड वाहने थांबवावी लागतात. तेथून पुढील प्रवासासाठी तेथील स्थानिकांच्या वाहतूक सेवेचा आधार घ्यावा लागतो. जड वाहनांची घाटरस्त्यावरील गर्दी टाळण्याचा हा अगदी साधा सोपा पर्याय प्रभावीपणे वापरला आहे. या वाहनतळावरून घाटवाटेने दहा मिनिटांत विवराच्या काठावरील डोंगरावर पोहोचता येते.

विवराच्या बाजूने अगदी व्यवस्थित लाकडी भक्कम कुंपण मार्ग संरक्षित केला आहे. साधारण एक-दोन किलोमीटरचा परिघ असावा. मध्येच जागोजागी निरीक्षण मनोरे आहेत. त्यावर चढून विवराचे विहंगम दृश्य अनुभवता येते. पर्यटकांच्या सुविधेसाठी इतका सरळ साधा असा हा उपाय. विशेष म्हणजे या मार्गावर शेकडो दुकानं असूनदेखील कमालीच्या स्वच्छतेची नोंद घ्यावी लागेल.

प्रशिक्षित मार्गदर्शक येथे आहेत. खास माहिती केंद्र आहे, पण स्थानिक विक्रेत्याशी जरा सलगी केली की आपोआपच चार गोष्टी अधिक कळतात. विवराच्या पलीकडल्या अंगाला त्यांचं गाव आहे. अडीचेक हजार वस्तीचं. हे सारं गाव या विवराच्या काठाने विविध वस्तूंची विक्री करून गुजराण करते. पर्यटनाचा थेट फायदा स्थानिकांना होतो.

इंडोनेशियन खाद्यपदार्थाची (मस्त कडक कॅफी, भाजलेली कच्ची केळी) येथे रेलचेल तर आहेच, पण त्याचबरोबर कलाकुसरीचे विणकाम असणाऱ्या वस्तू, कपडे आणि खास बांबूची वाद्यं आणि वस्तू येथे मिळतात. या विवराच्या काठावरच एक भन्नाट बांबू वाद्य तुमचे लक्ष वेधून घेते. अंकलुंग असं या वाद्याचं नाव. तेथील विक्रेता अगदी तन्मयतेने ते वाजवत असतो; पण हे वाद्यवादन किती सोपं आहे याचा प्रत्यय बांडुगमधल्याच ‘साँग अंकलुंग उदजो सेंटर’मध्ये मिळू शकतो. हा देश जरी मुस्लीम असला तरी त्यांच्या आजवरच्या साऱ्या संस्कृतीचं त्यांनी जतन केलं आहे. रामायण यांना भारी प्रिय आहे. संपूर्ण देशभरात रामायणाचे वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण होत असते. उदजो सेंटरमध्ये तर चक्क रामायणाचा पपेट शोच केला जातो. लहान मुलांनी सादर केलेली सर्व बेटांवरची पारंपरिक नृत्यं अनुभवता येतात. या सांगीतिक कार्यक्रमाचा परमोच्च िबदू असतो तो म्हणजे अंकलुंग वादन. विवरांच्या तीरावर पाहिलेले हेच ते बांबूचे वाद्य. हे येथील सर्वात प्राचीन वाद्य. इतर अनेक वाद्यं आहेत, पण याची मजा काही औरच आहे. ती आणखीन खुलते ती कॅथी मयांगसरी या शिक्षिकेमुळे.

अंकलुंग या वाद्यामध्ये बांबूची विशिष्ट रचना असणारे आणि क्रमाक्रमाने आकाराने लहान होत जाणाऱ्या सात आयताकृती चौकटी असतात. कॅथी लोकांच्या सोयीसाठी या प्रत्येक चौकटीला इंडोनेशियातील एकेका बेटाचं नाव देते. अर्धगोलाकार रचनेत बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रत्येक आडव्या रांगेला १०० सेटमधील एकाच बेटाचं नाव असणारी चौकट दिली जाते. प्रत्येक बेटासाठी हाताची एक विशिष्ट खूण ठरवली जाते. त्या खुणेनुसार त्या त्या रांगेतील लोकांनी आपल्या हातातील वाद्याची विशिष्ट पद्धतीने हालचाल करायची. सातही खुणा एका विशिष्ट क्रमाने वाजवल्यावर आपोआपच सप्तसुरांची एक मस्त लकेर तयार होत होती. हे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पाच मिनिटांतच  दोन गाणीदेखील कॅथी सर्वाकडून वाजवून घेते. भाषा कोणतीही असो, पण एका क्षणात त्यांच्या संस्कृतीशी जोडले जाण्याची ही भावना त्या संगीतातून निर्माण तयार होते. अगदी सहज आणि सोप्या प्रकारे संगीत कसं शिकवावं याचं हे मूíतमंत उदाहरण. आयुष्यात कधीच कोणतेही वाद्य न वाजवलेल्या व्यक्तीकडूनदेखील त्या सप्तसूर अगदी लीलया वाजवून घेतात.

बांडुग हे प्रचंड मोठं आहे. खरेदीसाठी येथे मोठमोठाले मॉलदेखील आहेत आणि मुंबईच्या महंमद अली रोडवर किंवा अब्दुल रहमान स्ट्रीटवर गल्लीबोळात विस्तारल्याप्रमाणे पारंपरिक मार्केटदेखील येथे आहे. बांडुगमध्ये पाहण्यासारखे दुसरे ठिकाण म्हणजे आशिया-आफ्रिका स्ट्रीट. या दोन खंडांच्या परिषदेमुळे या रस्त्याला हे नाव मिळालं आहे. सर्व राष्ट्रांचे झेंडे तर येथे आहेतच, पण रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर मोठय़ा तोफगोळ्यांप्रमाणे दगडी गोळ्यांवर प्रत्येक देशाचे नाव कोरले आहे. विशेष म्हणजे याच सदैव गर्दीच्या रस्त्यावर सायकलसाठी खास माíगकादेखील आहे आणि त्यात घुसखोरी होत नाही.

तसं हे गजबजलेलं शहर. आधीच प्रचंड भौगोलिक विस्तार, त्यात पर्यटकांची गर्दी आणि मूळ बांडुगची विस्तारित लोकसंख्या यामुळे आजूबाजूची खेडीदेखील समाविष्ट झाली आहेत. पण, विवराबरोबरच कला-संस्कृती अनुभवायची तर बांडुग हे उत्तम ठिकाण आहे.

सुहास जोशी suhas.joshi@expressindia.com