18 February 2020

News Flash

आडवाटेवरची वारसास्थळे : नितांतसुंदर कनकेश्वर

इथला अनोखा नजारा म्हणजे पश्चिम दिशेला मुंबईच्या कुलाबा भागातील टोलेजंग इमारती क्षितिजावर उगवलेल्या दिसतात.

रम्य निसर्ग, शांत ठिकाण आणि अनोखा देखावा पाहायचा असेल तर कनकेश्वरला जायलाच हवं. अलिबागपासून फक्त १० किलोमीटरवर दोन हजार फूट उंचीच्या एका डोंगरावर कनकेश्वर वसलेले आहे. पायथ्याच्या मापगावपर्यंत उत्तम डांबरी सडक आहे. झिराड या गावावरून डोंगरातून एक वाट कनकेश्वराला जाते, तर मापगावपासून अंदाजे ८०० दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. वाटेत अनेक ठिकाणी विश्रांतीसाठी कट्टे बांधलेले आहेत. त्या ठिकाणांना गायमुख, व्याघ्रमुख अशी सुंदर नावे दिलेली दिसतात. पायऱ्या संपून वर गेल्यावर एक सुंदर पुष्करणी समोर येते. माथ्यावरून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे. त्याच्या समोरच रामदर्णेचा डोंगर आहे. कनकेश्वर हे खरे तर शंकराचे स्वयंभू स्थान आहे. परंतु, इथे एक सुडौल, देखणी गणपतीची प्रतिमासुद्धा पाहण्याजोगी आहे. वडोदरा येथील गोपाळराव मराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आज्ञापत्र या प्रख्यात ग्रंथात शिवराजनीती सांगणारे रामचंद्रपंत अमात्य हे पुढे शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्षांत कोणाची बाजू घ्यायची यावरून द्विधा मन:स्थितीत सापडले. शेवटी त्यांनी संन्यास घेतला आणि ते या कनकेश्वरी येऊन राहिले होते. इथले शंकराचे मंदिर आणि त्यावरील मूíतकाम मुद्दाम पाहण्याजोगे आहे. हे ठिकाण उंचावर असल्यामुळे इथे भन्नाट वारा असतो. इथला अनोखा नजारा म्हणजे पश्चिम दिशेला मुंबईच्या कुलाबा भागातील टोलेजंग इमारती क्षितिजावर उगवलेल्या दिसतात. क्षितिजावर ही अशी इमारतींची रेषा फारच अप्रतिम दिसते. इथे पायथ्याशी कुलाबा किल्ला आणि समोर समुद्रात खांदेरी-उंदेरी हे जलदुर्ग लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या शिखरावरील एक शिल्प पाहण्याजोगे आहे. शिखरावर चढणारा एक माणूस दाखवला आहे. त्याच्या पायात असलेला दगडी वाळा हा सुटा असून गोल फिरतो. कनकेश्वरला जेवणाखाण्याची सोय होते. एक सुंदर ठिकाण, उंचावर असल्यामुळे असलेला बेफाट वारा, आणि मुंबापुरीच्या वैभवाचे एका निराळ्या बाजूने होणारे दर्शन घेण्यासाठी कनकेश्वरला नक्कीच आले पाहिजे.

पाहता पाहता वर्ष कसं सरलं समजत नाही. या वर्षीचा सूर्यास्त कुठून पाहावा याचा विचार करताना अनेक ठिकाणांची मनात गर्दी होते. वर्षभर आपण विविध ठिकाणे पाहिली, त्यांचा परिचय करून घेतला. या वर्षीचा शेवटचा सूर्यास्त यातल्या कुठल्या ठिकाणी जाऊन बघायचा असा विचार मनात येणं साहजिक आहे. अर्थात जे ठिकाण आपल्याला जवळचं तेच निवडलं जातं. महाबळेश्वर, पन्हाळा, कोकण इथे पर्यटकांची झुंबड असणार हे तर अगदी नक्कीच. अशा वेळी आपला सखा सह्यद्री आपल्या पाठीशी उभा आहे. त्याच्या सान्निध्यात अनेक अनगड ठिकाणे वसली आहेत. पर्यटक शक्यतो अशा ठिकाणी नसतात अशी अनेक ठिकाणे या सह्यद्रीच्या अंगाखांद्यावर वसली आहेत. यापकी कुठेही जावे आणि तिथून या सरत्या वर्षांला निरोप द्यावा, आणि येणाऱ्या वर्षांचे स्वागत या सह्यद्रीच्याच साथीने करावे. यासाठी गिर्यारोहणच केले पाहिजे असे काही नाही. सह्यद्रीच्या सान्निध्यात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे सर्वसामान्य लोकसुद्धा जाऊ शकतील. उदाहरणार्थ- रतनगडच्या पायथ्याचे रतनवाडी किंवा भंडारदरा, कोकणात असाल तर टिकलेश्वर-भवानीगड, प्रतापगडच्या पायथ्याचे रामवरदायिनीचे ठाणे असलेले पारगाव, ही ठिकाणे सरसकट सर्वाना जाता येतील अशी आहेत. पण खरे विचाराल तर एखाद्या किल्ल्यावरून सरत्या वर्षांला निरोप देण्यासारखे सुख कोणतेही नसेल. मग तो किल्ला कोणताही असो. ऐन थंडीत भणाणत्या वाऱ्यात एखाद्या बुरुजावर बसून नववर्षांचे स्वागत करणे यासारखी दुसरी चन नाही. सह्यद्रीच्या अफाट पसरलेल्या रांगा आणि त्यावर डौलाने उभे असलेले दुर्ग यांच्या सान्निध्यात नवीन वर्षांचे स्वागत जरूर करावे. धाकोबा, हाटकेश्वर, चकदेव, पर्वत यांसारख्या एखाद्या गिरीस्थानावरून स्वागत करावे. कोयना, दाजीपूरसारख्या जंगलातून स्वागत करावे. रायिलगच्या पठारावर समोर िलगाणा सुळक्याच्या साक्षीने नववर्षांला सामोरे जावे. सह्यद्रीच्या कुशीत कुठेही जा, शेकडो रमणीय स्थाने आपल्याला सापडतील.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

First Published on December 28, 2016 3:10 am

Web Title: kankeshwar temple near alibaug
Next Stories
1 मॉस्कोतला हिवाळा
2 दुचाकीवरून : बीआरएम म्हणजे काय?
3 दुर्लक्षित विष्णुमूर्ती
Just Now!
X