लेणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर अजिंठा, वेरुळ आणि सह्यद्रीच्या कानाकोपऱ्यांत काळ्या बेसॉल्टमध्ये खोदलेली सुबक लेणी येतात. बेसॉल्टव्यतिरिक्त महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात आढळणारा दुसरा दगड म्हणजे जांभा दगड. हा दगड सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने लेणी खोदण्यासाठी हा दगड निकृष्ट प्रतीचा समजला जातो. त्यामुळे जांभा दगडात सहसा लेणी खोदलेली पाहायला मिळत नाहीत. कोकणापासून काहीशे मल दूर असलेल्या लातूर जिल्ह्यतील खरोसा गावाजवळ एक चक्क जांभा दगडाचा डोंगर आहे. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात झालेल्या उलथापालथीमुळे या ठिकाणी या जांभ्या दगडाच्या डोंगराची निर्मिती झाली. ती का आणि कशी झाली, यावर भूगर्भशास्त्रज्ञांची अनेक मते आहेत. ती आपण बाजूला ठेऊ या. पण या भागात असलेल्या या वेगळ्याच प्रकारच्या लालसर रंगाच्या दगडाचे त्यावेळच्या लेणी खोदणाऱ्या कलाकारांना आकर्षण वाटले असेल आणि त्यातूनच या ठिसूळ दगडात त्यांनी लेणी कोरायचे आव्हान स्वीकारले असेल. इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात चालुक्य राजवटीत या लेण्यांची निर्मिती झाली असे मानले जाते.

लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोटय़ा डोंगरावर १२ लेणी आहेत. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. पहिले लेणे बौद्ध लेणे असून लेण्याच्या बाहेर स्तुपाचा उरलेला भाग पाहायला मिळतो. लेण्यात बुद्धाची मूर्ती आहे. दुसरे लेणे हे ब्राह्मणी (हिंदू) लेणे असून ते दोन मजली आहे. लेण्याच्या खालच्या आणि वरच्या मजल्यावर सभामंडप आणि गर्भगृह, प्रदक्षिणापथ अशी रचना पाहायला मिळते. लेण्याच्या भिंतीवर शिव, विष्णू, ब्रह्मा, द्वारपाल, शिविलग कोरलेली आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जिना आहे. जिन्याने वर गेल्यावर खांबांवर तोललेला भव्य सभामंडप आणि गाभाऱ्यात शिविलग पाहायला मिळते. तिसरे  महादेव लेणे हे महत्त्वाचे लेणे आहे. येथे शैव आणि वैष्णव पंथांचा मिलाफ झालेला पाहायला मिळतो. लेण्याच्या बाहेरच्या भिंतीवर डाव्या बाजूला शंकर आणि उजव्या बाजूला कोदंडधारी राम आणि लेणी बांधण्यासाठी दान देणाऱ्या दाम्पत्याचे शिल्प कोरलेले आहे. आतल्या बाजूला सभामंडपाच्या डाव्या भिंतीवर शिवाची गजासुरवध, उमामहेश्वर, रावणानुग्रह इत्यादी शिल्पे कोरलेली आहेत. तर उजव्या बाजूच्या भिंतीवर विष्णू अवतारातील गोवर्धन पर्वत उचलणारा कृष्ण, वराह, नृसिंह, वामन यांची शिल्पे कोरलेली आहेत. गाभाऱ्यात शिविलग आहे. गाभाऱ्याच्या दारावर द्वारपाल व नाग कोरलेले आहेत. गाभाऱ्याच्या िभतीवर राम-रावण युद्ध आणि अमृतमंथनाचे शिल्प कोरलेले आहे. पुढचे महत्त्वाचे लेणे म्हणजे लाकोले लेणे. यात महिषासुरमर्दनिी, गणेश यांची शिल्पे आहेत आणि गाभाऱ्यात विष्णूची मूर्ती आहे. याशिवाय सहाव्या-सातव्या लेण्यासमोर ठळकपणे दिसणारे हत्ती आपले लक्ष वेधून घेतात. लेण्यांच्या वरच्या बाजूला डोंगरमाथ्यावर रेणुकादेवीचे मंदिर आणि सीता न्हाणी नावाचा पाण्याचा साठा आहे. खासगी वाहनाने औसा किल्ला, खरोसा लेणी आणि निलंगा गावातील प्राचीन नीलकंठेश्वराचे मंदिर एका दिवसात पाहून होते.

कसे जाल?

लातूर-निलंगा-बिदर रस्त्यावर लातूरपासून ४३ किमीवर व औसापासून २३ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावापुढे डोंगरावर लेणी आहेत. एक पक्का रस्ता थेट डोंगरावरील लेण्यांपर्यंत जातो. रस्तामार्गे जाणे सोयीचे आहे.

अमित सामंत amitssam9@gmail.com

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील

bullock cart youth death marathi news
सांगली: शर्यतीवेळी बैलगाड्याच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू

Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा

Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’