नाशिकपासून २७ किलोमीटरवर ५४.४६ चौरस किलोमीटरचे ममदापूरचे राखीव क्षेत्र हे खास काळवीटांसाठी विकसित करण्यात आले आहे. भारतीय उपखंडाचं प्रतीक म्हणून ज्या काळवीटांकडे पाहिलं जातं, त्या काळवीटांना तेथे विस्तृत स्वरूपात नैसर्गिक अधिवास मिळाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या परिसरात हे क्षेत्र पसरलेले आहे. काळवीट हा फार लाजाळू, चपळ आणि देखणा प्राणी आहे. शुष्क मोकळी माळरानं आणि खडकाळ जमीन हेच काळवीटांचं आवडतं अधिवासाचं ठिकाण आहे.

काळवीट ही अतिशय धोक्यात असलेल्या २६ प्रजातींपकी एक प्रजात. नामशेष होण्याच्या स्थितीत असलेल्या या प्राण्याचे संरक्षण होऊन त्यात वृद्धी व्हावी म्हणूनच वन विभागाने पाच गावातील काही क्षेत्र राखीव घोषित केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात रेहकुरी येथे ही काळवीट अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर या तालुक्यांत तसेच सोलापूर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात आणि हरियाणातही काळवीटांचे अस्तित्व आढळते. या सर्वामध्ये येवला तालुक्यातील ममदापूर- राजापूर क्षेत्र हे काळवीटांसाठी योग्य असं ठिकाण आहे. इथे काळवीटांचा अगदी स्वच्छंद वावर आहे. येथे २५ पेक्षा अधिक कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सोलर बोअरवेल, गणवेशधारी वनकर्मचारी, पर्यटनासाठी पूरक सायकल अशा अनेक सुविधांनी हे अभयारण्य सुसज्ज करण्यात आले आहे. यातून स्थानिकांना रोजगारही मिळाला आहे. अगदी परवाच झालेल्या प्राणिगणनेमध्ये इथल्या काळवीटांच्या संख्येत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे एक शुभवर्तमान आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने काळवीटांचे जंगलातून बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  संपूर्ण भारतात सहा प्रकारचे कुरंगवर्णीय (अ‍ॅन्टीलोप) प्राणी आढळतात. त्यापकी महाराष्ट्रात चार जातींचा वावर आहे. या चार जाती म्हणजे नीलगाय, चौिशगा, चिंकारा आणि काळवीट. काळवीटाचे नर पिल्लू एक वर्षांचे झाले की त्याला शिंगे फुटतात. दुसऱ्या वर्षांपासून तो जसा प्रौढ होत जाईल तसतसा त्याच्या शिंगांना गोलाकार पीळ पडत जातो. तिसऱ्या वर्षांनंतर त्याला प्रौढ समजण्यात येते. त्याचा सुरुवातीचा गडद तपकिरी रंग नंतर अगदी काळा होतो. मात्र मानेचा आणि पोटाचा भाग पांढराच राहातो. मादी जन्मापासून फिकट तपकिरी रंगाची असते. तिच्या रंगात बदल होत नाही. काळवीट हा कळपाने राहणारा प्राणी, एका कळपात साधारणत: १५ ते ३० अशी संख्या असते. कळपात राहून सतत सावध राहणारे, हलकी चाहूल लागताच उंच झेप घेत धूम्म ठोकणारे काळे मृग (काळवीट) ममदापूरमध्ये सहज पाहायला मिळतात.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
Trimbakeshwar taluka, nashik district, water scarcity
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी टंचाईमुळे स्थिती बिकट
Successful experiment of pistachio farming in Solapur
सोलापुरात पिस्ता शेतीचा यशस्वी प्रयोग!

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य, रेणुका देवी मंदिर, चांदवडचा रंगमहाल, शिर्डी, येवल्याचे पठणी केंद्र, नस्तनापूरचे शनिपीठ, कोटमगावचे जगदंब देवी मंदिर, तात्या टोपेंची जन्मभूमी, अंकाई-टंकाई लेणी व किल्ला, माणिकपुंज धरण, सावरगाव-धानोऱ्याचा उभा हनुमान, लोहिशगचे शाकंभरीमाता मंदिर ही काही जवळची प्रेक्षणीय स्थळे आहेत. वेळ काढून तीही पाहता येतील. नांदगावला वन विभागाचे तर येवल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. नांदगाव, मनमाड, येवला येथे खासगी हॉटेल्सही उपलब्ध आहेत.

कसे जाल?

जवळचे रेल्वे स्थानक : मनमाड- ३५ किमी., नांदगाव २५ किमी, नगरसूल १५ किमी, शिर्डी ५२ किमी.

कधी जाल?

काळवीटांचा अधिवास बारमाही असल्याने येथे केव्हाही जाता येते. निरीक्षणासाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ उत्तम. ज्याला ब्लॅकबग सफारीचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी ममदापूरला जायलाच हवे.

आवाहन

भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात. अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता.

लोक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा वारसा असणारं मंदिर. कदाचित ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहीत नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.

आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८,  टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.

ई-मेल – lokbhramanti@gmail.com

drsurekha.mulay@gmail.com