03 March 2021

News Flash

ट्रेकिंग गिअर्स : सॅकची रचना

चांगल्या दर्जाच्या सॅक तयार करण्यात कुशल असलेल्या कंपन्या शरीराची रचना विचारात घेतात.

सॅक तयार करताना शरीररचनाशास्त्राचा अभ्यास करून सॅक तयार केली आहे की नाही हे पाहण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो.

सॅक घेताना सर्वात महत्वाची माहिती आपल्याला हवी ती म्हणजे शरीररचनाशास्त्राची (Anatomy). सॅक तयार करताना शरीररचनाशास्त्राचा अभ्यास करून सॅक तयार केली आहे की नाही हे पाहण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. शरीररचनाशास्त्राचा अभ्यास न करता तयार केलेल्या सॅक भटकंतीदरम्यान त्रासदायक ठरु शकतात. सॅक किती महागडी यापेक्षा ती तयार करताना शरीररचनाशास्त्राचा आधार कितपत आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
चांगल्या दर्जाच्या सॅक तयार करण्यात कुशल असलेल्या कंपन्या शरीराची रचना विचारात घेतात. मात्र त्याबद्दल सॅक वापरतान प्रत्येक भटक्यास त्याबद्दलची किमान मूलभूत माहिती असणे अत्यावश्यक आहे. याबद्दलच्या सर्वसाधारण माहितीसाठी काही संज्ञा समजून घ्याव्या लागतील.
हान्रेस सिस्टीम
सॅकसंदर्भात हान्रेस सिस्टीम म्हणजे ज्या गोष्टींच्या साहाय्याने सॅक शरीरावर अडकवली जाते त्या आणि त्याला सहाय्यभूत अशा सर्व गोष्टी. यात खांदा व कंबर यांवर वजन विभागण्यासाठी लावली जाणारी अंतर्गत फ्रेम, योग्य अंतरावर व योग्यरीत्या लावले गेलेले खांद्याचे बेल्ट, योग्यरीत्या लावलेले चेस्ट बेल्ट, चांगला दर्जा, भक्कम आणि चांगली पॅडींग असलेला वेस्ट बेल्ट. तसेच सॅकचा शरीराच्या ज्या भागांशी स्पर्श होत असेल त्या ठिकाणी योग्य ते पॅडींग असणे. त्याचबरोबर अपर आणि लोअर स्टॅबिलायझर बेल्टचाही यात समावेश होतो.
टोर्सो लेंग्थ
टोर्सो लेग्थ म्हणजे पाठिची लांबी. सॅकच्या संदर्भात पाठिची लांबी म्हणजे माकड हाड ते मानेतील सातवा मणका (C7) यांमधील अंतर. प्रत्येक गिर्यारोहकाची पाठिची लांबी वेगवेगळी असते. तुमच्या पाठिच्या लांबीशी जुळवून घेता येईल, अशी सॅकच्या खांद्याकडील बेल्टची रचना असायला हवी. आपण घेत असलेल्या सॅकमध्ये अशी सोय आहे की नाही ते पहावे. चांगल्या दर्जाच्या सॅकमध्ये खांद्याचा बेल्ट कमी-जास्त करून टोर्सो लेंग्थची लांबी कमी जास्त करण्याची
सोय असते.
इंटरनल स्टेव्हज
इंटरनल स्टेव्हज म्हणजे दोन चपटया आकाराचे दांडे. ते इंटरनल फ्रेममध्ये उभे बसविले जातात. त्यांचे स्थान मणक्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला एक असे असते. त्यांना पाठिच्या रचनेप्रमाणे योग्य तो आकार दिलेला असतो. साधारणपणे मजबूत अॅल्युमिनिअम किंवा अलॉयच्या फ्रेम वापरल्या जातात. मजबूत प्लॅस्टीक तसेच फायबर ग्लासपासूनही त्या बनविल्या जाऊ शकतात.
ashok19patil65@gmail.com

आवाहन – वाचक सहभाग
वाचक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा वारसा असणारं मंदिर. कदाचित ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहित नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या ठिकाणाची माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.
ऑफबीट क्लिक : हल्लीच्या भटकंतीत, भटकंती कमी आणि छायाचित्रण अधिक असंच झालंय. पण त्यापलिकडे जाऊन काहीतरी अनोखं फ्रेममध्ये उतरवणारे असतातच. कधी ती फ्रेम अचानक मिळते, तर कधी बरीच प्रतीक्षा करावी लागते. असं एखादं छायाचित्र तुमच्याकडे असेल तर लगेच आम्हाला पाठवा.
भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात. अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता.

आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०
ई-मेल – lokbhramanti@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 6:40 am

Web Title: sac designed
Next Stories
1 दुचाकीवरून : सायकल घेताना..
2 ग्रामीण पर्यटनाचा सिक्कीमानुभव
3 दुचाकीवरून : एक पॅडल मारून तर पाहा..
Just Now!
X