दोन महायुद्धांचा कालखंड वगळता शतकभराहून अधिक वर्षे प्रत्येक सायकलपटूची जिद्द, शारीरिक व मानसिक क्षमता, संयम, चिकाटी व सायकिलग कौशल्यांची कसोटी पाहणारी स्पर्धा म्हणजे आपल्या सर्वाना परिचित असेलली टूर-डी-फ्रान्स सायकल शर्यत. १९०३ पासून ही शर्यत म्हणजे जागतिक सायकिलग मालिकेतील सर्वोच्च प्रतिष्ठेची शर्यत आहे. आल्प्स पर्वतराजीमधील खडतर परंतु विलोभनीय डोंगराळ मार्ग, सूर्यफुलांच्या झुडपांमधून डोकावणारे रस्ते व नयनरम्य समुद्रकिनाऱ्याला स्पर्श करीत जाणारा मार्ग हे या स्पध्रेचे आकर्षण.

गेल्या आठवडय़ात आपण एकूणच सायकल स्पर्धाच्या इतिहासाविषयी जाणून घेतलं. परंतु, सायकिलगमध्ये टूर-डी-फ्रान्स या स्पध्रेला एक वेगळं अधिष्ठान आहे. २ जुलैपासून या स्पध्रेला सुरुवात होत आहे. त्यामुळे या लेखात स्पर्धेविषयी थोडं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. एकूण २१ टप्प्यांमध्ये पार पडणाऱ्या ३५१९ किलोमीटर लांबीची १०३ वी टूर-डी-फ्रान्स ही स्पर्धा यावर्षी २ ते २३ जुलैदरम्यान पार पडत आहे. फ्रान्स, कझाकस्तान, जर्मनी, अमेरिका, बेल्जियम, स्वित्झर्लँड, इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, रशिया, नेदरलँड आणि ग्रेट ब्रिटन या देशांचे तब्बल २२ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नॉरमॅन्डीतील सेंट मिशेल माऊंटच्या पायथ्यापासून स्पध्रेला सुरुवात होणार असून पॅरिसमध्ये चँटिली येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे.

Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा
minor girl kidnapped from chhattisgarh rape by railway head constable
इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून एकटीच आली; पण प्रियकराने मुंब्र्यात…

टूर-डी-फ्रान्स शर्यत सुरू करण्याचे श्रेय एल ऑटो या क्रीडाविषयक मासिकाला जातं. हे मासिक आर्थिक अडचणीत सापडलेलं असताना जिओ लेफेव्हरी या सायकिलगचं वृत्तांकन करणाऱ्या वार्ताहराने मासिकाच्या प्रसारासाठी सायकल स्पर्धा आयोजित करण्याची शक्कल शोधून काढली. त्यावेळी फ्रान्समध्ये लांब अंतराच्या व सहा-सात दिवसांच्या सायकल शर्यती खूप लोकप्रिय होत्या. मासिकाचे संपादक हेन्री डेसग्रेंज हे सायकलप्रेमी होते. त्यांनी ही संकल्पना उचलून धरली. मासिकाचे आर्थिक संचालक व्हिक्टर गॉडेस्ट यांनीसुद्धा या कल्पनेस होकार दिला आणि १ ते १९ जुल १९०३ रोजी पहिली टूर -डी- फ्रान्स शर्यत आयोजित करण्यात आली. सहा टप्प्यांची आणि २४२८ किलोमीटर लांबीची ही स्पर्धा मॉरीस गॅरीन याने जिंकली होती. हळूहळू या शर्यतीची लोकप्रियता वाढू लागली आणि आता जगातील अनेक देश आणि शेकडो सायकलस्वार या स्पर्धेत सहभागी होतात. अमेरिकेचा लान्स आर्मस्ट्राँग याने सलग सात वेळा विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र त्याने उत्तेजक सेवन केल्याची शंका निर्माण झाली. सखोल चौकशीनंतर १९९९ पासून त्याने या शर्यतीच्या वेळी उत्तेजक औषध सेवनाचा आधार घेतला आहे असे दिसून आले. त्याची सर्व पदके परत घेऊन त्याच्यावर स्पर्धेत सहभागी न होण्याची कायमची बंदी घालण्यात आली.

शर्यतीचा मार्ग फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, स्वित्र्झलड, स्पेन, इटली आदी देशांमधून जात असल्यामुळे प्रत्येक देशातील भिन्न हवामान, अवघड वळणे, बर्फाळ प्रदेशातील मार्ग, लोकांचा प्रतिसाद या पाश्र्वभूमीवर स्पर्धकांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची कसोटी ठरते. आल्प्स व पेरिनीस या दोन पर्वतांमधूनही ही शर्यत जाते. शर्यतीचे थेट प्रक्षेपण विविध वाहिन्यांद्वारे केले जाते आणि त्याचा आनंद १८८ देशांमधील चाहते घेत असतात. स्पध्रेचे संयोजन आता व्यावसायिक पद्धतीने केले जाते. पारितोषिकांची संख्याही वाढली आहे. प्रत्येक टप्प्यातील विजेता, एकूण विजेता, पर्वतराजीच्या टप्प्यातील विजेता, सर्वात वेगवान संघ, २५ वर्षांखालील युवा खेळाडू आदी अनेक पुरस्कार देण्यात येतात. प्रत्येक टप्प्यानंतर आघाडीवर असलेल्या खेळाडूला पिवळ्या रंगाचा जर्सी दिला जातो व ही जर्सी घालून सायकिलग करणे हे या खेळाडूसाठी खूप अभिमानाची बाब असते.

१९३० ते १९६० या कालावधीत प्रत्येक शर्यतीच्यावेळी सहभागी खेळाडूंची मिरवणूक काढण्याची प्रथा होती. खेळाडूंबरोबरच काही उत्साही प्रायोजक कंपन्यांच्या सजवलेल्या मोटारींचाही या मिरवणुकीत सहभाग असायचा. जगभरातील उत्साही छायाचित्रकार स्पध्रेची छायाचित्रे काढता यावीत यासाठी तंबू व अन्य सामुग्री घेऊन शर्यतीच्या मार्गाजवळ मुक्काम ठोकण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. अनेक जण पारंपरिक वेशभूषा करून सायकलपटूंना प्रोत्साहन देत असतात. सायकिलग क्षेत्रात संयम, चिकाटी व कठोर परिश्रमाची सत्त्वपरीक्षा घेणारी शर्यत म्हणून आजही टूर-डी-फ्रान्स शर्यतीस आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचे स्थान आहे.

prashant.nanaware@expressindia.com