मिझोराम हे ईशान्येकडील सात राज्यांतील एक छोटेसे राज्य. मिझोरामची राजधानी असलेले ऐजवाल हे गुवाहाटीपासून ५०६ किमी, शिलाँगपासून ४५० किमी आणि इम्फाळपासून ३७४ किमी दूर आहे.
सिलचर हे जवळचे रेल्वे स्टेशन असून ते
१८४ किमी अंतरावर आहे. सर्व रस्ते सिलचरमाग्रेच जातात. त्यामुळे रस्त्याने ऐजवाल गाठायला गुवाहाटीपासून दीड दिवस लागतो. गुवाहाटी व कोलकाता येथून विमानाने ऐजवालला येता येते.
मिझोराम हे हिरव्यागार डोंगररांगांनी व्यापलेले आहे. राज्याचे सर्वात उंच शिखर फावांगपुई (७०७५ फूट) हे म्यानमारच्या सीमेवर आहे. या डोंगररांगेला ब्ल्यू माउंटन म्हणून ओळखले जाते. राज्याची भाषा मिझो असल्याने येथील लोकांशी संपर्क साधताना भाषेची थोडी अडचण येते. मुख्य उत्पन्नाचे साधन शेती. तीही जंगल कापून काही काळासाठी करण्यात येते. येथे बांबूची लागवड मोठय़ा प्रमाणात होत असल्याने दैनंदिन गरजांसाठी बांबूचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे तेथे आपल्याला घरेही बांबूचीच पाहायला मिळतील. मिझो संस्कृतीतील दहा नृत्यप्रकारांपैकी चेराव म्हणजे बांबूनृत्य पर्यटकांसाठी पर्वणी असते. ऐजवालमधील झुलॉजिकल पार्क, म्युझियम प्रेक्षणीय आहे. तेथील बडा बाजार नावाची मुख्य बाजारपेठ प्रसिद्ध आहे. इथल्या हॉटेलांत चायनीजबरोबरच भात, भाकरी, वरण हमखास मिळते.
ऐजवालपासून ८५ किमीवर प्रेक्षणीय तामदिल तलाव, १५२ किमीवर ७५० फूट उंचीचा वांटावांग धबधबा व १३३ किमीवर दाम्पा अभयारण्य आहे. ऐजवालहून खुंआंगचेरा गाव, तेथील छोटे भुयार, रेईक शिखर व तेथील मिझो पर्यटन ग्राम असा एक दिवसाचा गाडीने भटकंतीचा कार्यक्रम करता येतो.
मिझोरामच्या भटकंतीसाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी उत्तम असतो. हे सीमावर्ती राज्य असल्याने येथे प्रवेशासाठी परवाना घ्यावा लागतो. हा परवाना दिल्ली, गुवाहाटी येथे मिझोराम सरकारच्या जनसंपर्क कार्यालयांबरोबरच ऐजवाल विमानतळावर मिळतो.
हृषीकेश यादव hrishikeshyadav@hotmail.com

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…