जम्मू-काश्मीर राज्यातील लडाख हा प्रदेश हिमालय आणि कोराकोरम या दोन महाकाय पर्वतशिखरांमध्ये येतो. लेह आणि कारगिल ही दोन लडाखमधील मोठी शहरे आहेत. लडाखमधील कोराकोरम, झंस्कार इ. पर्वतशिखरे ट्रेकिंगसाठी नेहमीचीच आहेत. अलीकडे मोटर बाइक टुरिझम लोकप्रिय होत आहे. हिमाचल व श्रीनगरहून जाणारे रस्ते साधारण मे-जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबपर्यंत चालू असतात. थंडीत बऱ्याचदा झोजीला पासकडे बर्फात रस्ते लुप्त होऊन जातात. लेहहून पेनोंग त्स्यो तलावाकडे येताना वाटेत लागणाऱ्या मोनेस्ट्री बघत तलावाजवळच होम-स्टे किंवा कॉटेजमध्ये राहता येते. रात्री आकाशातील बदलणारे रंग व शांत तलाव हे सगळेच वर्णनातीत. दर काही किलोमीटरनंतर निसर्गचित्र आणि त्यातील रंग दोन्ही सतत बदलत असते आणि हे सर्व जर पौर्णिमेच्या रात्री पाहता आले तर उत्तम. थिकत्स्ये मॉनेस्ट्री लेहजवळ आहे. नुब्रा व्हॅलीतील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे दिस्कीत मॉनेस्ट्री आणि उंचच उंच अशी बुद्धाची प्रसन्न मूर्ती, जी आसपासच्या सगळ्या परिसरातून दिसते. प्रसिद्ध लेह पॅलेसच्याच मागे चंबा मंदिर आहे. जवानांच्या सन्मानार्थ लेहमधील हॉल ऑफ फेम वॉर म्युझियम येथे आपल्याला जवानांच्या शौर्याच्या कथा, कारगिलचा इतिहास, त्या वेळेस वापरलेली सामग्री इ. गोष्टी पाहायला मिळतात.

लडाखमध्ये इको-टुरिझम ही सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारली आहे. तंबू आणि खाण्याचे सामान ओझी वाहून नेण्यापेक्षा तिथल्याच लोकांच्या घरी राहून त्यांच्या घरी शिजवलेले अन्नपदार्थ खाल्ले तर तेथील कुटुंबांना आíथक मदतीचा हातभार लागू शकतो. तिबेटियन थुकपा-मोमो इ. खाद्यपदार्थ इथे सगळीकडे मिळतात. लडाखमध्ये होम-स्टे प्रकार शासनाकडून जास्त प्रचलित केला जात आहे. लेहला विमानतळ असून तो दिल्ली, जम्मू, श्रीनगरला जोडलेला आहे. उधमपूर हे जवळचे रेल्वे स्थानक असून, सगळ्या मोठय़ा शहरांना जोडलेले आहे.

bjp creating strong atmosphere in tamil nadu and kerala for lok sabha election 2024
विश्लेषण: दक्षिणेतून भाजपला ४५ जागा? लोकसभेसाठी तमिळनाडू, केरळमध्ये जोरदार वातावरणनिर्मिती…
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

sonalischitale@gmail.com