त्रिपुरा हे राज्य बांगलादेश व एका बाजूने आसाम व मिझोरामला लागून आहे. आगरतळा या राजधानीत विमानतळ आहे. नसíगक संपत्ती व ऐतिहासिक वारसा हे या राज्याचे वैशिष्टय़ आहे. राज्याचा भूप्रदेश १०० फूट ते ३००० फूट उंचीच्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे. समृद्ध जंगले, अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, खडकातील कोरीव काम, प्रस्तर शिल्प, हिंदू व बौद्ध धर्मस्थळे आणि विविध जमाती येथे आढळतात.

राज्यातील १९ जमातींपकी त्रिपुरी जमात सर्वात मोठी असून रेआंग जमातीची लोकसंख्या त्याखालोखाल आहे. जमातीया, नाओतिया, डार्लोग, हलाम, गारो, चकमा, काली या इतर जमाती राज्यात आहेत.आगरतळा येथील महाराजा राधाकीशोर यांनी सन १९०१ मध्ये बांधलेला उज्जयंता राजवाडा प्रेक्षणीय आहे. महाराजा कल्याण यांनी खोदकाम सुरू केलेला कामलासागर तलाव येथून २७ किमीवर आहे. या तलावाच्या काठावर १६ व्या शतकातील प्रसिद्ध काली मंदिर आहे. आगरतळापासून ३० किमीवर सिपाहीजाला अभयारण्य आहे.

आगरतळाहून ५५ किमीवर उदयपूर नगर आहे. येथे जवळच रुद्रसागर तलावात भव्य नीरमहाल बांधलेला आहे. हे पूर्व भारतातील एकमेव जलमहाल. गोमती नदीच्या काठावर वसलेले उदयपूर ही राजवाडे व तलावांची नगरी आहे. येथे पुरातन भूबनेश्वरी मंदिर, जगन्नाथ मंदिर आहे. येथून जवळच गोमती नदीच्या काठावरील टेकडीच्या कातळ भिंतीवर शिव, विष्णू, काíतक, महिषासुर मर्दनिी व इतर देवतांच्या भव्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. उदयपूरपासून ६१ किमीवर पिलक येथे ८व्या- ९व्या शतकातील हिंदू व बौद्ध वसाहतींचे पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत.  त्रिपुरा हे वेत व बांबूच्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे.

कधी जाल?

त्रिपुरात भ्रमंतीसाठी ऑक्टोबर ते मार्च कालावधी उत्तम असतो. उत्तम हवामान, हिरवीगार जंगले, संत्र्याच्या बागा, ऑचड व इतर फुलांनी बहरलेल्या निसर्गाचे वरदान लाभेला त्रिपुरा या काळात पाहता येईल.

– हृषीकेश यादव

hrishikeshyadav@hotmail.com