६४ विद्या व कलांच्या यादीत आणखी एक आणि ६५वी कला म्हणजे शॉिपग! शॉिपग हीसुद्धा एक कला आहे, हे वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हो ही कलाच आहे. शॉिपग करताना खूप साऱ्या गोष्टींमधून नेमकी तुम्हाला आवडलेली आणि तुम्हाला सूट होणारी गोष्ट घ्यायची झाली तर पारखी नजर हवीच. परदेशात तर लाखो वस्तूंमधून आवडलेली वस्तू निवडायची तर आपण कसलेले ‘शॉपर्स’च असावं लागतं!

‘शॉिपगसाठी योग्य वेळ कुठली?’ हे कुंडली शोधून न मिळणारं उत्तर. लग्नकार्य, सण-उत्सवासाठी ठरवून शॉिपग करणं होतं. पण त्याहून कित्येक पटीने जास्त शॉिपग ‘जस्ट लाइक दॅट’ किंवा ‘सहजच’ या प्रकारामध्ये मोडते. कधी मूड नाही म्हणून, कधी एखादी गोष्ट अशीच आवडली म्हणून, कधी भविष्यात उपयोगी येईल म्हणून किंवा आत्ता सेलमध्ये स्वस्त मिळतेय तर घेऊन ठेवूयात या भावनेने शॉिपग हे सतत होतच असतं. मग ते गावच्या आठवडाबाजारातील असो वा दुबईतील अवाढव्य मॉल ऑफ एमिरेट्समधील. जगभरात तुमचा खिसा रिकामी करणारी, पण मन काठोकाठ आनंदाने भरणारी शॉपिंगची अनेक ठिकाणं ‘शॉपर्स पॅराडाइज’ म्हणून ओळखली जातात. तिथल्या हवेतच जणू शॉिपगचा गंध जाणवतो आणि कस्तुरीमृगाच्या गंधाप्रमाणे तो शॉपर्सना नकळत खेचून घेतो. चला तर मग आज अशाच शॉिपग स्पेशल देशांची मस्त भटकंती करू या.
थायलंड : दक्षिण-पूर्व आशियातील सिंगापूर, थायलंड, मलेशिया आणि हाँगकाँग हे देश म्हणजे शॉपर्ससाठी पर्वणीच. त्यातूनही थायलंडमधील शॉिपग म्हणजे अफलातून अनुभव ठरतो. ‘लोट्स’ असो वा बिग सी किंवा एमबीके ही सगळी मोठमोठी तीन-चार मजली मॉल्स म्हणजे अलिबाबाच्या गुहाच आहेत. किड्स सेक्शन, लेडीज सेक्शन, जेन्ट्स सेक्शन, टॉय सेक्शन, स्पोर्ट्स सेक्शन अशा अनेक सेक्शन्सनी हे मॉल्स गजबजून गेलेले दिसतात. ‘दोन करांनी घेऊ किती’ अशी आपली इथे अवस्था होते. तेथील रस्त्यावरील बाजार म्हणजे घासाघीस करून उत्तमोत्तम वस्तू खरेदी करण्याचे हक्काचे ठिकाण. खरेदीसाठी येथे ‘दिवस’ अपुरा पडतो म्हणूनच की काय येथील रात्रबाजार मध्यरात्री ३ वाजेपर्यंत गजबजलेले असतात. रस्त्यावर भरणारा सुमलून रात्रबाजार म्हणजे जणू रात्रीची एक मोठी जत्राच असते. बँकॉकच्या छोटय़ा छोटय़ा गल्यांमधील रस्त्यावर दुकाने थाटलेल्या लोकांकडे अनेक सुंदर गोष्टी मिळतात. शिवाय जगातील सगळ्यात मोठी जेम्स गॅलरीही थायलंडमध्येच आहे.
टोकियो : जपानची राजधानी टोकियोमधील शॉिपग हा एक भन्नाट अनुभव असतो. खरं तर थायलंडसारखं टोकियो हे खरेदीत घासाघीस करता येणारं ठिकाण नाही. पण हे एक शॉिपग हब आहे. मुळातच जपानी लोक हे स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत खूपच उत्साही आहेत. त्यामुळे इथे शॉिपगसाठी गुची, सीके, प्राडा, जॉर्जओि, अरमानी, फेण्डी, कार्टअिर असे अनेक जगप्रसिद्ध ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत. िगझा हे टोकियोमधील शॉिपगचे मुख्य ठिकाण. बुटीक, कॅफेजपर्यंत सगळं काही इथे एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. िगझामध्ये ‘वीकेण्ड शॉिपग’साठी मोठमोठे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जातात. हाराजुकू अ‍ॅण्ड ओमोतेसॅन्दो येथील शॉिपगचा अनुभवही उत्तम. शॉिपग करता करता येथील शॉिपग मॉल्सचे इंटेरिअर पाहणे हासुद्धा एक अनोखा अनुभव ठरतो. िशकुजू हा भाग भल्या मोठय़ा शॉपिंग दालनामुळे आणि सर्वात मोठय़ा पुस्तकांच्या दुकानासाठी परिचित आहे. ‘जॅपनीज स्टेशनरी’ ही खरेदी करायलाच हवी अशी गोष्ट. सर्वोत्तम दर्जाची ही जॅपनीज स्टेशनरी देश-विदेशात लोकप्रिय आहे. पेन्सिल असो वा शार्पनर्स याचे येथे इतके वैविध्य बघायला मिळते की लहान मुलांपेक्षा आपणच त्याच्या प्रेमात पडतो.
मिलान : युरोपातील मिलानमध्ये शॉिपगचे वैशिष्टय़ म्हणजे बहुविध पर्याय. तुम्ही इथे ब्रॅण्डेड शॉप्समधून शॉिपग करू शकता, तसेच खुल्या बाजारात चालता चालता थांबून पटकन एखादी वस्तू घेऊ शकता. मिलानमधील शॉिपग होते ती मुख्यत्वे ब्रॅण्डेड कपडय़ांचे. कपडे, चपला-बूट, चामडय़ाच्या वस्तू येथे उत्तम मिळतात. ब्रेरा येथे चामडय़ाच्या वस्तूंसाठी भेट द्यावी तर मॉण्टे नेपोलिन येथे भव्य, पण महागडी बुटिक्स आहेत. कोर्सो वितोरियो एमॅन्युएल, कोर्सो ब्युनॉज् एरिज्, टोरिनो आणि कोर्सो दि पोर्ता टिसीनीज् ही मिलानमधील शॉिपगची लोकप्रिय ठिकाणं आहेत. जगात इतर कुठेही न आढळणारी एक अनोखी गोष्ट मिलानमध्ये आहे ती म्हणजे इथे ‘हाफ डे प्रायव्हेट फॅशन अ‍ॅण्ड शॉिपग टूर’. ही चार तासांची टूर प्रत्येकी ९५ युरोपासून सुरू होते.
न्यूयॉर्क : अमेरिकेतील शॉपिंग आनंददायी असण्याचे एक कारण म्हणजे त्यांचे चलन. फक्त ५० डॉलरमध्ये तुम्हाला मस्त ब्रॅण्डेड गॉगल मिळतो तर ५०० डॉलरमध्ये लुइस वॅटनची ब्रॅण्डेड पर्स किंवा इव्हििनग गाऊन. न्यूयॉर्कमधील शॉिपगसाठी सगळ्यात प्रसिद्ध असलेला रस्ता म्हणजे फिफ्थ अव्हेन्यू. हा जगातील सगळ्यात महागडा, पण उत्तम शॉिपग स्ट्रीट म्हणून ओळखला जातो. फिफ्थ अव्हेन्यूवर अनेक हॉलीवूडकर आणि बॉलीवूडकर मनसोक्त खरेदी करताना दिसतात. इथे शॉिपग करणे म्हणजे स्टेट्स सिम्बॉल समजले जाते.
या शहरांशिवाय शॉिपगसाठी जगभरातील इतर अनेक लोकप्रिय ठिकाणं आहेत. त्यात दुबई, हाँगकाँग, मलेशिया, व्हिएन्ना, कैरो, केपटाऊन, ब्युनोस एरीज्, बोस्टन, सेऊल, ऑस्लो, सिडनी, सिंगापूर आदींचा समावेश आहे.

कुठून काय खरेदी करावे ?
’ फ्रान्स : चीज, कॉफी, वाइन्स, परफ्युम, चॉकलेट, सौंदर्यप्रसाधने, कपडे
’ मॉस्को: घडय़ाळे, कॅमेरा, फर, ज्वेलरी टॉय आणि मॉस्कोची खास ओळख असलेल्या वूडन मात्रिओश्का डॉल्स.
’ इंग्लंड : सॉफ्ट टॉइज्, कपडे, सौंदर्यप्रसाधने, मातीची भांडी, सोव्हिनिअर्स आणि लंडन हॅरोडस् डिपार्टमेंटल स्टोअरमधील कुठलीही खरेदी.
’ दुबई : सोने, सुकामेवा, कारप्रेटस्, टॉइज्, परफ्युम्स, सोव्हेनिअर्स.
स्मृती आंबेरकर writersmruti@gmail.com