सायकल टुरिंगची तोंडओळख करून घेतल्यानंतर आजच्या लेखात आपण त्याच्या काही प्रचलित प्रकारांविषयी जाणून घेणार आहोत. भारतासाठी सायकल टुरिंग हा प्रकार नवीन असला तरी परदेशात मात्र तो चांगलाच रुजलेला आहे. त्यामुळे टुरिंगचे विविध प्रकारही त्यांच्याच सवयी आणि आवडीनिवडीप्रमाणे तयार झाले असावेत. आता त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग होत असले तरी काही मूलभूत प्रकार सारखेच असल्याचं पाहायला मिळतं. खाली नमूद केलेल्या जवळपास सर्व प्रकारांचं अनुकरण भारतातही झपाटय़ाने होत आहे असं सध्याच्या ट्रेंडवरून दिसतंय. सायकल टुरिंगला वेळ, स्थळ आणि काळाची मर्यादा नाही. तसे काही नियमही ठरलेले नाहीत.

क्रेडिट कार्ड टुरिंग : कमीत कमी सामान आणि जास्तीत जास्त पसे स्वत:सोबत बाळगण्याचा हा प्रकार. हॉटेलमध्ये राहणं आणि तयार अन्न विकत घेण्यावर यामध्ये अधिक भर असतो.

Preity Zinta Made 120 Parathas
VIDEO : पंजाब किंग्जचा विजय प्रीती झिंटाला पडला होता महागात, संघासाठी बनवावे लागले होते १२० आलू पराठे
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज

अल्ट्रालाइट टुरिंग : या प्रकारात सायकलस्वार स्वयंपूर्ण असला तरी आवश्यक तेवढंच सामान स्वत:सोबत ठेवतो.

सेल्फ सपोर्टेड टुरिंग : सायकलस्वार आपल्यासोबत शिधा, जेवण बनवण्याचं सामान, तंबू अशा प्रकारच्या सर्व गोष्टी बाळगतात. तरीसुद्धा कमीत कमी आणि हलकं सामान सोबत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सायकल मोहीम : विकसनशील देश किंवा अतिशय दुर्गम भागांतून काही सायकलस्वार लांब पल्ल्याचं सायकलिंग करतात. यांच्या सायकलवर खाणं, सायकल दुरुस्तीचं सामान, तंबू अशा विविध वस्तू असतात. जेणेकरून कुणावर अवलंबून राहावं लागणार नाही.

वेगवेगळ्या रस्त्यांवरचं टुरिंग : एकाच सायकलवर वेगळ्या प्रदेशांतून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवरूनसायकलिंग करण्याचा हा प्रकार आहे. सायकल चालवण्याचा मनमुराद आनंद लुटणं हा यामागचा उद्देश असतो. सायकलस्वार अनेकदा कॅम्पिंग आणि सायकल दुरुस्तीचं कमीत कमी सामान बाळगतात.

सपोर्टेड टुरिंग : या प्रकारात सायकलस्वार केवळ सायकिलग करीत असतो आणि त्याला लागणारं सर्व सामान एका गाडीवर लादलेलं असतं. अशा प्रकारचं टुरिंग एखादी व्यक्ती वैयक्तिकरीत्या, सायकलस्वारांचा गट किंवा एखादी पर्यटन संस्थादेखील आयोजित करू शकते. पर्यटन संस्था एखाद्या स्थळाची किंवा प्रदेशाची माहिती देण्यासाठी या टुर्सचं आयोजन करतात.

एका दिवसाचं टुरिंग : आपल्या आनंदासाठी, तंदुरुस्तीसाठी किंवा एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी अशा प्रकारचं सायकिलग केलं जातं. हे एकटय़ानेही करता येतं किंवा गटानेही. साधारणपणे १०० किलोमीटर अंतर यामध्ये कापलं जातं. सायकलस्वार आपल्याला आवश्यक ते सामान सोबत ठेवतात किंवा मित्रांची अशा प्रकारमध्ये फार मदत होते. संस्थेसाठी सायकिलग करीत असल्यास खाण्याची, सुरक्षितता, औषधोपचार, इच्छित स्थळी पोहोचल्यावर तेथून माघारी आणण्याची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाते.

ओव्हरनाइट टुरिंग : सायकिलगपेक्षा यामध्ये कुठल्यातरी शांत, नयनरम्य ठिकाणी जाऊन कॅम्पिंग करणं हा उद्देश असतो. सायकिलग करीत दुपारी उशिरा निघून कॅम्प साइटवर रात्री पोहोचायचं, तिथे खायचं, निवांत झोपायचं आणि सकाळी पुन्हा उठून घरी परतायचं असा हा कार्यक्रम असतो. हे खूप कमीत कमी वेळेत आणि कमी नियोजनात करता येतं.

प्रशांत ननावरे – prashant.nanaware@expressindia.com