वन्यजीव पर्यटनाचा ट्रेंड आता चांगलाच रुजला आहे. प्राणीमात्रांबद्दल फारसे प्रेम नसणारे किमान वाघ पाहायला म्हणून का होईना पण सध्या वाइल्डलाइफ सफारीवर जाताना दिसतात. वाघच पाहायचा असेल तर त्यासाठी सर्वात उत्तम कालावधी म्हणजे एप्रिल आणि मे. या काळात जंगलातील अंतर्गत पाणीसाठे तुलनेने कमी होत असतात. त्यामुळे अनेक प्राणी दिसू शकतात. मात्र केवळ वाघ पाहणे म्हणजेच जंगल भटकणे नव्हे. तर नानाविध प्रकारचे पक्षी पाहण्यात देखील एक अनोखा आनंद असतो.
वाघांसाठी भारतातील अनेक अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यानं प्रसिद्ध आहेतच, पण बहुतांशवेळा मध्य भारतातील व महाराष्ट्रातील लोकप्रिय ठिकाणांवरच गर्दी दिसून येते. त्यापेक्षा थोडी वाट वाकडी केली तर उत्तर भारतात आणि ईशान्येकडे अनेक समृद्ध
जंगल आहेत.
एप्रिल-मे मध्ये येथे आपण वन्यजीव पर्यटनाचा आनंद वेगळ्या प्रकारे घेवू शकता. पण इशान्येकडे जाताना मे महिना टाळावा. तेव्हा तिकडे पावसाला सुरुवात होते. अर्थात या सर्वाची आत्तापासूनच तयारी करावी लागेल. तसेच अनेक अभयारण्यातील सफारींचे बुकींग हे हल्ली ऑनलाइन करता येते. त्यामुळे निराशा टाळायची असेल तर आत्ताच प्रवासाचं बुकिंग आणि सफारी बुकींग करावे. अरुणाचलप्रदेशमध्ये जाण्यासाठी विशेष परवानगी लागते. त्याची तयारी सुद्धा आतापासूनच करावी. बहुतांश अभयारण्य,
राष्ट्रीय उद्यान, टायगर रिझर्व यांच्या वेबसाइटस आहेत. तसेच त्या त्या राज्यांच्या पर्यटन महामंडळांच्या वेबसाईटवरदेखील अधिक माहिती मिळू शकते.

मार्च-एप्रिल
a5कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान – सिक्कीम
गोरुमारा राष्ट्रीय उद्यान – पं. बंगाल
मानस व्याघ्र प्रकल्प, काझीरंगा – आसाम,
फुलपाखरांसाठी पक्के अभयारण्य, नामदफा राष्ट्रीय उद्यान, मिश्मी हिल्स (खास पक्ष्यांसाठी) – अरुणाचल प्रदेश
लोकतक (सरोवर) राष्ट्रीय उद्यान (संपूर्ण जगात केवळ ६० इतकिच संख्या असलेली थामिन जातीची हरणं येथे पाहता येतील.) – मणीपूर
एप्रिल आणि मे
दाचिगम राष्ट्रीय उद्यान येथे हंगूल ह्य़ा रेड डिअर जातीची भारतात सापडणारी एकमेव प्रजाती पाहता येते. – काश्मिर
दाल लेक हे केवळ बोटींगसाठीच नाही तर पक्षीवैभव पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे – काश्मिर
ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यान – हिमाचल प्रदेश
कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, राजाजी राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड,
गिर राष्ट्रीय उद्यान आणि वेलावदर वन्यजीव अभयारण्य, मरिन नॅशनल पार्क, खेजडीया पक्षी अभयारण्य – गुजरात
रणथंबोर व्याघ्र प्रकल्प – राजस्थान,
कान्हा बांधवगड, पन्ना, पेंच व्याघ्र प्रकल्प – मध्यप्रदेश
ताडोबा, मेळघाट, नागझिरा, नवेगाव, बोर, उमरेड-करंडा – महाराष्ट्र
सुंदरबन व्याघ्र प्रकल्प – प. बंगाल
पक्ष्यांसाठी बिंसर वन्यजीव अभयारण्य – (कुमाऊ) उत्तराखंड
काली व्याघ्र प्रकल्प (दांडेली) पक्षी आणि प्राणी दोन्हीसाठी. मुख्यत पक्ष्यांसाठी खास – कर्नाटक
पेरियार राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, मुन्नार राष्ट्रीय उद्यान, पेरंबिकुलम राष्ट्रीय उद्यान – केरळ