गेमिंगचं विश्व सगळ्यांनाच भुरळ घालत असतं. कन्सोल गेमिंग सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. म्हणूनच हातातल्या स्मार्टफोनवर असलेले गेमिंगचे विविध पर्याय समजून घेतले तर आपला वेळ मजेत जाऊ शकेल.

परवा ट्रेनमधून प्रवास करत असताना एक आजोबा, साठी-सत्तरीचे असावेत माझ्या बाजूला बसले होते हातातल्या चांगल्या मोबाइलवर खूप वेळापासून काहीतरी करत होते, उत्सुकतेपोटी मी सहज म्हणून त्यांच्या मोबाइलमध्ये डोकावलो असता कार रेसिंगचा गेम अतिशय तल्लीन होऊन खेळत असल्याचं मला कळलं, साहाजिकच कुणालाही आश्चर्य वाटेल पण त्यांची ती थकलेली बोट अगदी सराईतपणे त्या मोबाइलच्या स्क्रीनवरून फिरत होती, आणि स्वत:च्या विजयोत्सवात त्यांच्या चेहऱ्यावर मंदसे स्मित उमटत होते, खरोखरच कधी काळी फक्त लहानांपुरतं मर्यादित असणारं हे गेमिंगचे विश्व आता फारच व्यापक झाले आहे. तुमचं वय, जात, धर्म, लिंग, बँक बॅलन्स यांपैकी कोणत्याच गोष्टी तुमच्या आणि गेमिंगच्या आड येत नाहीत. स्ट्रेस कमी करण्याचा हमखास उपाय म्हणजे गेम खेळणे, म्हणूनच की काय हल्ली ऑफिसवरून घरी परतताना ट्रेन-बसमध्ये कीतीही गर्दी असली (कित्येकदा गर्दीमुळे मोबाइल हातात पकडतादेखील येत नसतो) तरी लोक हमखास गेम खेळताना दिसतात. गेल्या वेळी आपण कन्सोल गेमिंगबद्दल आणि गेमिंगचं महागडा पर्याय असणाऱ्या कन्सोल्सबद्दल जाणून घेतले होते. यावेळी आपण आपल्या स्मार्टफोनवर गेमिंगचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत किंवा आपल्याला खरोखर गेमिंगची थोडीफार आवड असल्यास मोबाइल घेताना गेम्स चांगल्या प्रकारे खेळता येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी मोबाइलमध्ये पहाव्यात याबद्दल जाणून घेऊयात.

गेमिंगसाठी मोबाइल-
हल्ली साऱ्यांकडेच स्मार्टफोन असतात तसे पाहता सर्वच स्मार्ट फोन्समध्ये बरेचसे गेम्स चालतात. परंतु जर आपला मोबाइलची क्षमता गेमिंगसाठी जरा कमी असेल तर लवकर बॅटरी संपणे, थोडाच वेळ गेम खेळल्यावर मोबाइल लगेच गरम होणे, गेम अडकत अडकत चालणे अशा अडचणी हमखास येतात. त्यामुळे अशा अडचणी टाळायच्या असतील तर शक्यतो गेमिंगसाठी मोबाइल घेताना त्याची स्क्रीन साइझ, त्याची इंटर्नल मेमरी, उपलब्ध रॅम, थर्मल एफिशिएन्सी, प्रोसेसर, जीपीयू यांबद्दल जाणून घेणे आणि अर्थातच या साऱ्या बाबी योग्य असणे महत्त्वाचे असते.

स्क्रीन साइझ- स्क्रीन साइज पिक्सेलमध्ये मोजायची ठरवल्यास तर किमान ८०० ७ ४८० पासून ते अगदी २५६० ७ १४४० पर्यंत पिक्सेल साइझ असली तरी उत्तम ठरते स्क्रीन साइझ ही गेमिंग एक्सिपीअन्स उत्तम प्रकारे आपणांस उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते त्यामुळे गेमिंगसाठी फोन घेताना या बाबींचा विचार करणे आवश्यकच असते.

रॅम- जितका रॅम जास्त तेवढे गेमिंगसाठी उत्तम असते. उत्तम गेमिंग मोबाइल असण्यासाठी आपल्या मोबाइलचा रॅम कमीत कमी एक जीबी तरी असायलाच हवा त्यापेक्षा कमी रॅम असणाऱ्या मोबाइलमध्ये सबवे सफरसारखे गेम्ससुद्धा बहुतांश वेळी अडकत चालण्याची शक्यता असते. जर आपल्या मोबाइलमध्ये स्व्ॉपिंग सुविधा उपलब्ध असेल (सेव्ॉप चेक अ‍ॅप वापरून हे चेक करता येऊ शकते) तर आपण आपल्या मेमरी कार्डची मेमरी रॅम म्हणून वापरू शकता जेणेकरून आपल्या मोबाइलमध्ये जास्तीचा रॅम आपणास उपलब्ध होऊ शकेल

प्रोसेसर-आपल्या मोबाइलमध्ये उत्तम प्रोसेसर हीदेखील गेमिंग मोबाइल्ससाठी महत्त्वाची गरज आहे. सध्या अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रोसेसरपैकी काही प्रोसेसरची नावे, क्षमता पुढे देत आहे.
* Nvidia Tegra 4i/4/K1
* Qualcomm Snapdragon 400/600/800/801/805/810/S4 Plus/S4 Pro
* MediaTek MT6589
* Intel Atom Z25x0/Z35x0
* Samsung Exynos 42xx

यापैकी किंवा तत्सम प्रोसेसर आपल्या मोबाइलला गेमिंगसाठी उत्तम ठरवू शकतात.
जी.पी.यू- जीपीयू हीदेखील गेमिंगसाठी महत्त्वाची निकड असते. जीपीयू म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट हे असे हार्डवेअर असते ज्यामध्ये जलद गतीने काही गणिती प्रक्रिया करून एखादे चलचित्र अथवा ग्राफिक्स आपल्या मोबाइल अथवा संगणकाच्या स्क्रीनवर उत्तम रीतीने दाखविले जाते. त्यामुळे ज्या ज्यावेळी ग्राफिक्सशी संबंधित काम करावयाचे असेल तेव्हा आपल्या मोबाइल अथवा संगणकात जीपीयू किंवा ग्राफिक्स कार्ड सापीयूसह असणे आवश्यक ठरते. हल्ली एपीयू हे नवीन ऑप्शन उपलब्ध आहे ज्यात सीपीयू आणि जीपीयू एकाच हार्डवेअरमध्ये उपलब्ध असतात. पुढे काही जीपीयूची नावे आणि क्षमता देत आहे ते किंवा तत्सम जीपीयू आपल्या अ‍ॅन्ड्रॉइडला उत्तम गेमिंग मोबाइल बनवू शकते.

* ARM Mali-T6x4 Mp4
* Adreno 225 or higher
* PowerVR SGX543 MP2

बॅटरी क्षमता- मोबाइलवर गेम खेळताना सगळ्यात मोठा प्रश्न असू शकतो तो म्हणजे बॅटरीचा. परंतु गेम खेळताना कमी ब्राइटनेसमध्ये मोबाइल चालविल्यास बॅटरी जास्त काळ टिकू शकते. हल्ली पॉवर बँक उपलब्ध असल्यामुळे मोबाइलची बॅटरी हा तसा मोठा प्रश्न म्हणून जाणवीत नाही.
उपलब्ध मोबाइल-
असूस कंपनीचे Asus Zenfone  आणि Asus Zenfone 5  हे सहा ते दहा हजारांच्या रुपयांमधील उत्तम असे गेमिंग फोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तसेच त्यापेक्षा जास्त किमतीच्या फोन्समध्ये  HTC Desire 616, XOLO Play 6X-1000, Moto X, LG Nexus 5  हेदेखील काही चांगले ऑप्शन्स गेमिंग मोबाइलमध्ये सध्या उपलब्ध आहेत, शिवाय वर उल्लेखलेले निकष वापरून आपणही चांगला गेमिंग फोन सहजपणे निवडू शकतात.

खेळून पहावे असे काही गेम्स –
* आपण जर कार रेसिंगचे चाहते असाल तर  Asphalt8-airborne,  Real racing 3, Perfect shift हे काही गेम्स नक्की खेळून पहा शिवाय संगणकाच्या गेम्सवर सर्वात लोकप्रिय झालेला गेम म्हणजे Nfs- mostwanted  हादेखील खेळला नसाल तर नक्की खेळून पहा. यातील ग्राफिक्स आपणांस गेमिंगचा खरा आनंद देतील.
* एक वेगळा गेम म्हणून dumb ways to die हा गेम खेळून पहायला हरकत नाही यामध्ये आपल्या समयसूचकतेचा चांगला कस लागतो.
* फुटबॉल खेळाचे आपण चाहते असाल तर  fifa-15,  New star socer  हेदेखील गेम खेळून पहा
* जर आपण टेम्पल रन आणि सबवे सफर खेळून कंटाळला असाल तर एन्डलेस रनिंग प्रकारात आपण Lara Croft: Relic Run  हा गेम खेळून पाहायला हरकत नाही.
* अ‍ॅक्शन गेम्स प्रकारात देखील कित्येक गेम्स अ‍ॅन्ड्रॉइडवर उपलब्ध आहेत त्यात देखील हहए WWE Immortals, Brother in arms 3, Mortal combat-x   हे काही अॉप्शन्स नक्की ट्राय करून पहा

स्वत:चा गेम तयार करायचा आहे?
गेम तयार करणे हे अतिशय किचकट काम वाटते किंबहुना ते तसे असतेही. मोठमोठय़ा कंपन्या एखादा गेम तयार करण्यासाठी प्रचंड पैसे आणि उत्तमोत्तम क्षमता असणाऱ्या मंडळींना पाचारित असतात. परंतु आता तुमच्या आमच्यासारख्या माणसाला देखील स्वत:चा गेम तयार करता येऊ शकतो तेदेखील कोणतेही प्रोग्रामिंग न करता ॠंेी२३८’४२.ूे या वेबसाइटला एकदा भेट देऊन पहा यामध्ये आपण कसा स्वत:च्या मनातील गेम तयार करू शकतो याबद्दल मार्गदर्शन उपलब्ध आहे.