01vijayमेष एक चांगले तर एक वाईट तुमच्या वाटेला येणार आहे. तुमची कल्पकता आणि मेहनत या दोन्हींचा तुम्हाला उपयोग होईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात काळाची गरज म्हणून नवीन कार्यपद्धती स्वीकारणे तुम्हाला भाग पडेल. चालू कामामध्ये खंड पडू देऊ नका. नोकरीमध्ये तुम्ही काम करत असलेल्या संस्थेतील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्याचा मागोवा घेऊन त्यानुसार तुमचा पवित्रा ठरवा. घरामध्ये अनपेक्षित कारणांमुळे जे खर्च होतील त्यामुळे तुमचे बजेट कोलमडून पडेल. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वास टाळावा. 

वृषभ मधाभोवती जशा मधमाश्या गोळा होतात तसा ज्यांचा मतलब तुमच्याकडे आहे त्या व्यक्ती तुम्हाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतील. व्यापार-उद्योगात कामकाज चांगले राहील. पशाचा आणि कामाचा ओघ वाढल्यामुळे तुमच्या मनामध्ये जादा पसा मिळविण्याचा मोह निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा यातील फरक एखाद्या कामाच्या निमित्ताने तुमच्या लक्षात येईल. घरामध्ये देणीघेणी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईकांशी रुसवे-फुगवे होण्याची शक्यता आहे.

मिथुन आíथकदृष्टय़ा ग्रहमान तुम्हाला चांगले आहे. नेहमीपेक्षा जास्त कमाई होण्याची चिन्हे दिसू लागल्याने काम करण्याचा तुम्ही आनंद घ्याल. व्यापार-उद्योगात खोटय़ा प्रतिष्ठेपायी एखादे अवघड काम स्वीकारण्याचा मोह होईल. ज्यांचा परदेशात व्यवहार आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध झाल्याशिवाय नवीन करार करणे टाळावे. नोकरदार व्यक्तींना अधिकारांचा गरवापर करण्याचा मोह होईल. घरामध्ये माझे ते खरे असा दृष्टिकोन ठेवू नका. विद्यार्थ्यांनी मोठय़ा व्यक्तीचा सल्ला लक्षात घ्यावा.

कर्क तुम्हाला खूप काम करावेसे वाटेल. पण तुम्ही परावलंबी असल्यामुळे नाइलाजाने त्याचे वाईट वाटून घेऊ नका. असे बेत एक-दोन आठवडे लांबवावे लागतील. व्यापार-उद्योगात कोणतेही नवीन करार करण्यापूर्वी त्यातील अटी आणि शर्तीचा नीट अभ्यास करा. नोकरीमध्ये एखाद्या निमित्ताने सहकाऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा यातील फरक लक्षात येईल. घरामधल्या व्यक्तींशी प्रेमाने वागाल, पण त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळणे कठीण आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पद्धतीने अभ्यास करावा.

सिंह आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा तुमची मर्यादा काय आहे हे लक्षात घेऊन तुम्ही काम केले तर त्याचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे इतरांवर न सोपवता शक्यतो स्वत:च हाताळा. एखाद्या तातडीच्या कामाकरिता तात्पुरते कर्ज घेणे भाग पडेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. आपल्या कामात चूक होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. घरामध्ये सगळ्यांचे मूड सांभाळणे तुम्हाला अवघड होईल. विद्यार्थ्यांनी त्यांचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित करावे.

कन्या या आठवडय़ात जे पसे खर्च होणार आहेत, ते अपरिहार्य पण चांगल्या कामाकरिता असतील. व्यवसाय-उद्योगात कामाचा डोंगर असेल. शिवाय ही कामे तुम्हाला वेळेत उरकायची असतील, पण यासाठी कामगारांची खुशामत करावी लागेल. त्याशिवाय कामाला गती येणार नाही. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि सहकारी यांच्या दुटप्पी आणि स्वार्थी वागण्याचा अनुभव येईल. घरामध्ये जोडीदाराच्या एखाद्या प्रश्नामुळे तुम्ही थोडेसे चिंतेत पडाल. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पद्धतीने अभ्यास केल्यास जास्त उपयोगी पडेल.

तूळ उत्तम बुद्धिमत्ता आणि कल्पकता हे दोन गुण तुमच्या राशीला वरदान आहेत. या आठवडय़ात थोडे व्यवहारी बना. प्रकृतीसंबंधी काही तक्रारी असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यापार-उद्योगात मध्यस्थांची मदत घेत असाल तर अधूनमधून त्यांच्यावरती लक्ष ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याविषयी काळजी वाटेल. एखादा जुना वाद नव्याने डोके वर काढेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेला तब्येतीचे तंत्र सांभाळणे आवश्यक आहे.

वृश्चिक आपलीच माणसे कधी कधी अशी का वागतात असे कोडे टाकणारे ग्रहमान आहे. त्यामुळे तुमचे विचार तुम्ही सावधतेने व्यक्त करणे चांगले. व्यापार-उद्योगात एखादी अफलातून कल्पना तुम्हाला मोहात टाकेल. त्यामध्ये मागचा-पुढचा विचार न करता रामभरोसे निर्णय घेण्यापूर्वी त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांची रीतसर परवानगी घेतल्याशिवाय महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. घरामधल्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यामुळे तुमचा मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे.

धनू इकडे आड तिकडे विहीर अशी तुमची परिस्थिती होईल. व्यावसायिक कामांकडे लक्ष दिले तर घरातील व्यक्तींना राग येईल. या उलट घरगुती कामात वेळ गेला की व्यवसाय-धंद्यात आपण कुठे तरी कमी पडतो ही भावना त्रास देईल. व्यापार-उद्योगात आíथक व्यवहार काळजीपूर्वक सांभाळा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेचे उल्लंघन होऊ देऊ नका. घरामध्ये एखाद्या जुन्या प्रश्नाकडे तुमचे दुर्लक्ष झाले असेल तर त्याची जाणीव होईल. ज्यांना रक्तदाब किंवा हृदयविकार आहे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.ॉ

मकर प्रतिकूल वातावरणामध्ये अत्यंत शांतपणे काम करणारी तुमची रास आहे. या आठवडय़ात कोणताही निर्णय घाईने घ्यायचा नाही असा निश्चय तुम्हाला फायदेशीर ठरेल. व्यापार-उद्योगात नवीन कामासंबंधी बोलणी करण्याऐवजी नित्यव्यवहारांना महत्त्व द्या. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचना आणि त्यांचे विचार कदाचित तुम्हाला पटणार नाहीत, पण त्याला विरोध केला तर त्यांना आवडणार नाहीत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या कलाने वागणे तुम्हाला जड जाईल. विद्यार्थ्यांनी स्मरणशक्तीवर ताण देऊ नये.

कुंभ एक चांगले तर एक वाईट तुमच्या वाटय़ाला येणार आहे. व्यापार-उद्योगात ज्यांनी तुम्हाला पसे द्यायचे कबूल केले होते त्यांनी त्यांचा शब्द न पाळल्यामुळे तुमची गरसोय होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी बोलताना शब्द हे शस्त्र आहे हे विसरून चालणार नाही. नाही तर केलेल्या कामाचे महत्त्व जाईल. घरामध्ये वाटण्या, पशासंबंधी काही प्रश्न अधांतरी राहिले असतील तर त्याकडे तुमचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि आप्तेष्टांशी जपून वागा.

मीन गेल्या काही आठवडय़ांमध्ये ग्रहांची तुम्हाला उत्तम साथ मिळाली त्यामुळे तुम्ही वेळप्रसंगी स्वत:च्या कुवतीबाहेर जाऊन जादा काम केले. आता व्यापार-उद्योगात भरपूर काम असल्यामुळे घडय़ाळ्याच्या काटय़ानुसार तुम्हाला काम करणे भाग पडेल. नोकरीमध्ये वरिष्ठ एकाच वेळी बरीच कामे सांगतील. ती पूर्ण करण्याकरिता तुम्ही जिवापाड मेहनत कराल. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तींच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वास टाळावा.
विजय केळकर