lp02वृषकेत साळसकरच्या या चित्राला यंदाच्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक कलाप्रदर्शनामध्ये इंडिया आर्ट फेस्टिव्हल बेस्ट पेंटिंग अ‍ॅवॉर्ड मिळाले. वृषकेतने पुण्याच्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस्मधून ललित कलेची पदवी संपादन केली आहे. त्याचप्रमाणे आजवर अनेक एकल आणि समूह प्रदर्शनांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. त्याच्या या चित्रातील पोत महत्त्वाचा आहे. डब्याच्या खालच्या बाजूस असलेला पोत, डब्यातील कडांचा छाया-प्रकाशाचा खेळ आणि झाकणाच्या पिवळ्या रंगाच्या परावर्तनानंतर निर्माण झालेला भास या सर्व गोष्टी वृषकेतने नेमक्या चितारल्या आहेत.

lp05