lp58लिन्से अ‍ॅद्रिओ हिने दीर्घकाळ अफगाणिस्तानसारख्या युद्धाच्या छायेखालील प्रदेशात व्यतित केला. प्रामुख्याने नॅशनल जिओग्राफिकसाठी तिने चित्रण केले. अफगाणिस्तानच्या रेताड वाळवंट आणि पहाडांच्या भूमीत अडचणीत असलेल्या गरोदर महिलेचे हे चित्र या अडचणीची परिस्थिती तर कथन करतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या बुरख्याचा रंग आणि आकाशाचा रंग यामुळे या छायाचित्रात एक वेगळी काव्यात्मताही आली आहे. छायाचित्र नॅशनल जिओग्राफिकवरून साभार.

lp04